टोगोलँड : पश्चिम आफ्रिकेच्या गिनीच्या आखातावरील पूर्वीच्या जर्मनीचा संरक्षित प्रदेश. पहिल्या महायुद्धानंतर हा प्रदेश ग्रेट ब्रिटन व फ्रान्स यांत राष्ट्रसंघाचा ‘महादिष्ट प्रदेश’ म्हणून वाटण्यात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांचा विश्वस्त प्रदेश म्हणून तो त्यांच्याकडे राहिला. इंग्रजांनी आपल्या देखरेखीखाली असलेला टोगोलँडचा भाग जवळच्या घाना राज्यात ते राज्य निर्माण होताना समाविष्ट करून टाकला. फ्रेंचांनी आपल्या ताब्यातील टोगोलँडला १९६० मध्ये स्वातंत्र्य दिले. तो टोगो प्रजासत्ताक देश घाना व दाहोमी यांच्यामध्ये असून लॉमे ही त्याची राजधानी आहे.

लिमये, दि. ह.