जूनो : अलास्काची राजधानी व बंदर. लोकसंख्या १३,५५६ (१९७०). १९७० मध्ये डग्लस बेट याच्याशी संयुक्त झाल्यामुळे हे अमेरिकेतील क्षेत्रफळाने सर्वांत मोठे ८,०५० चौ. किमी. शहर बनले. हे गॅस्टिनो खाडीवर सित्काच्या ईशान्येस सु. १४४ किमी. असून रॉबर्ट्‌स (१,०९७ मी.) व जूनो (१,०७० मी.) पर्वतशिखरांच्या पायथ्याशी, बेटांच्या एका पट्ट्याने पॅसिफिकपासून सुरक्षित वसलेले आहे. बंदर वर्षभर बर्फमुक्त असते. मासेमारी, लाकूडतोड, सॅमन मासळी डबा बंद करणे, प्लायवुड फर, गोळा करणे हे येथील प्रमुख व्यवसाय

गॅस्टिनो खाडीवरील जूनोचे एक दृश्यअसून १९४४ पर्यंत येथे सोन्याच्या खाणीही होत्या. सोने सापडल्यामुळेच १८८० मध्ये जूनो व हॅरिस यांनी हे वसविले. आता ते हवाई वाहतुकीचे व पर्यटन व्यवसायाचेही केंद्र झाले आहे. येथे महाविद्यालय, ऐतिहासिक ग्रंथालय व संग्रहालय आहे.               

कुमठेकर, ज. ब.