कालिंपाँग : पश्चिम बंगाल राज्याच्या उत्तरेकडील दार्जिलिंग जिल्ह्यात संरक्षणद्दष्ट्या महत्त्वाचे ठाणे. लोकसंख्या २३,४३० (१९७१). हे तिस्ता नदीकाठी, सिक्कीम सीमेवर, तिबेटकडील जेलेप (ला) खिंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वसले असून, चिनी आक्रमणापूर्वी (१९६२) ही तिबेटची मुख्य बाजारपेठ होती. हे दार्जिलिंगच्या पूर्वेस ४८ किमी. असून, ईशान्य रेल्वेच्या सिलिगुडी प्रस्थानकापासूनही येथे जाण्यासाठी रस्ता आहे. समुद्रसपाटीपासून १,२१९ मी. उंचीवर हिमालयासन्निध असल्याने हे हवा खाण्याचे ठिकाण आहे. लोकरी व हातमाग कापड, विविध हस्तकलावस्तू इत्यादींची ही बाजारपेठ आहे.

ओक, शा. नि.