कार्लमार्क्सस्टाड : 1953 पर्यंतचे केमनित्स. पूर्व जर्मनी राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या 2,99,670 (1971). हे ओर पर्वताच्या पायथ्याशी, केमनित्स नदीकाठी असून ड्रेझ्डेनपासून लोहमार्गाने 81 किमी. पश्चिमेस आहे. जगातील एक मोठी कोळशाची खाण कार्लमार्क्सस्टाडजवळ असल्याने हे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र बनले आहे. येथे कापड, होजिअरी, यंत्रे, यांत्रिक हत्यारे, रसायने, सायकली, मोटारी, काचसामान इत्यादींचे उद्योग आहेत. तीस वर्षाच्या युध्दात आणि दुसऱ्या महायुध्दात शहराची खूप हानी झाली होती.

शाह, र.रु.