कँडल ट्री ऑफ पनामा :(लॅ. पामेंटिएरा सेरीफेरा कुल-बिग्‍नोनिएसी). हा लहानसा वृक्ष मूळचा पनामातील (मध्य अमेरिका) असून शोभेसाठीरस्त्याच्या दुतर्फा लावतात. भारतातही तो लावलेलाआढळतो. पाने संयुक्त त्रिदली व देठ सपक्ष असतो दले दीर्घवृत्ताकृती व टोकदार असतात. फुले खोडापासूनकिंवा फांद्यांपासून एकेकटी एप्रिल-जूनमध्ये येतात तीपांढरट गुलाबी असतात. संवर्त घंटाकृती वमहाछदाप्रमाणे पुष्पमुकुट मोठा, घंटाकृती, खाली रुंदनळीसारखा व वर पाच पसरट तरंगित पाकळ्यांचा केसरदले चार, दीर्घद्वयी किंजपुट दोन कप्प्यांचा आणिअनेक बीजकांनी भरलेला [→ फूल] बोंड लांबट, दंडाकृती, न तडकणारे, पांढरे, मेणबत्तीसारखे (त्यावरून इंग्रजी नाव पडले) व लोंबते असते. फळे पनामातील काही लोक खातात व तसेच गुरांनाही खाऊ घालतात. पाने, फळे व मुळे यांत हायड्रोसायानिक अम्‍लाचा अंश असतो.

कँडब ट्री ऑफ पनामा : (१) त्रिदली पाने, (२) खोडावर प्रत्यक्ष उगवणारी फुले, (३) लांब मेणबत्तीसारखे लोंबते फळ.

पहा : बिग्‍नोनिएसी.

देशपांडे, सुधाकर