कपिलधार : बीड जिल्ह्यातील निसर्गरम्य तीर्थक्षेत्र. बीड शहराच्या दक्षिणेस १९ किमी. मांजरसुंभा व तेथून दीड किमी.वर छोट्या टेकड्यांच्या दरीत दहा मी.उंचीवरून पडणाऱ्या जलप्रपाताच्या पायथ्याशी हे स्थान आहे. गर्द वनश्रीच्या सान्निध्यात येथे नन्नाथस्वामी या लिंगायताच्या सत्पुरुषाची टुमदार समाधी आहे.तुलसीविवाहाच्या वेळी येथे पाच दिवस यात्रा भरते.   

ओक, शा. नि.