काराकल सरोवर : पामीरच्या पठारावरील सरोवर. क्षेत्रफळ सु.३६४ चौ.किमी. हे ताजिकिस्तान या रशियाच्या प्रजासत्ताकाच्या गोर्नो-बदक्शान प्रांतात आहे. ते २७ किमी. लांब, २१ किमी. रुंद आणि २२६ मी. खोल आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची ३,९५६ मी. आहे. हे चीन-रशिया सरहद्‌दीजवळ, ऑश-खोरॉग महामार्गाच्या पश्चिमेस, खोरॉगपासून २१६ किमी. आहे.

लिमये, दि.ह.