कारकेमिश :सिरियामधील आलेप्पोच्या आग्नेयीस असलेले आणि युफ्रेटीसच्या पश्चिम तीरावरील नष्टप्राय स्थल. इ.स.पू. दुसऱ्या सहस्त्रकात ही मिटानी संस्कृतीची राजधानी होती. ती पुढे हिटाइट व ईजिप्शियनांकडून ॲसिरियाकडे आली. इ.स.पू.सु. ६०५ मध्ये बॅबिलोनियाचा राजा दुसरा नेब्युकॅडनेझर याने ईजिप्शियनांचा येथे मोठा पराभव करुन आशियातील त्यांची सत्ता संपुष्टात आणली. कारकेमिशच्या परिसरातील उत्खननात हायरोग्लिफिक,हिटाइट लिपींतील कित्येक अवशेष मिळाले आहेत.

शाह, र.रू.