कान्होपात्रा : (पंधरावे शतक). मराठी संत कवयित्री तिचा जन्म मंगळवेढे येथे झाला. तिची आई शामा ही वेश्या व प्रसिद्ध नर्तकी होती. आपलाच व्यवसाय मुलीने चालवावा अशी तिची इच्छा होती. तथापि कान्होपात्रेला ते पटले नाही. आणि ती पंढरपुरात जाऊन तेथे पिठ्ठल भक्तित व संताच्या संगतीत विरक्त जीवन जगु लागली. तिचे लावण्या तिला अनेकवेळेला त्रासदायक ठरले असावे, असे तिच्या अभंगांवरून दिसते. महिपती.त भक्तविजय (39.1-78) ग्रंथात तिचे चरित्र आले आहे. तिचे पंचवीस-तीस अभंगब उपलब्ध असुन ते स्फुट स्वरूपाचे आहेत. सुबोधता, आर्तता आणि आत्मनिष्ठता ही तिच्या अभंगाची वैशिष्ठ्ये होत.

जगताप, बापुराव