ॲड्रियन, एडगर डग्‍लस : (३० नोव्हेंबर १८८९– ). इंग्रद शरीरक्रियावैज्ञानिक. १९३२ सालच्या शरीरक्रियाविज्ञान व वैद्यक या विषयांच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांचे शिक्षण वेस्टमिन्स्टर शाळा व केंब्रिजचे ट्रिनिटी कॉलेज येथे होऊन १९१५ मध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी संपादन केली. त्यांचे सर्व कार्य केंब्रिज येथेच झाले. ते १९२९–३७ या काळात रॉयल सोसायटीमध्ये फाउलरटन संशोधक प्राध्यापक व १९३७–५१ या काळात केंब्रिजमध्ये शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक होते. १९५१ मध्ये ते ट्रिनिटी कॉलेजचे प्रमुख झाले. १९४२ मध्ये ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ ही उच्च पदवी त्यांना देण्यात आली व १९५० मध्ये ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष झाले. १९५५ मध्ये त्यांना ‘बॅरन’ (सरदार) करण्याच आले.

रॉजर डी कॉवुर्ली, कॅप्टन सेंट्री, अँड्रू फ्रीपोर्ट इ. संस्मरणीय व्यक्तिरेखा म्हणजे तत्कालीन इंग्रजी समाजातील व्यक्तींची प्रातिनिधिक चित्रेच होत. या व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून तत्कालीन जीवनावर त्याने भाष्य केले आहे. ‘नियतकालिक निबंध’ हा नवा साहित्यप्रकार स्टीलच्या लेखनातून आकारास आला होता. या साहित्यप्रकारास आगळे आणि वेधक स्वरूप देऊन त्यास परिपूर्णतेस नेण्यात ॲडिसनचा वाटा फार मोठा आहे. त्याच्या निबंधलेखनाने इंग्रजी गद्याच्या विकासास महत्त्वाचा हातभार लावला. खेळकर आणि सहदसुंदर भाषा हे त्याच्या निबंधांचे एक वैशिष्ट्य होते. त्या भाषेत कधी नर्मविनोद, तर कधी रुचेल इतपत उपहास आढळतो. त्याच्या काळाची वाङ्मयीन गरज त्याने समर्थपणे भागविली. त्याच्या आधीच्या पिढीला प्यूरिटन धर्मपंथीयांच्या दुराग्रही व नीरस जीवनदृष्टीचा छळवाद सोसावा लागला, तर त्याच्या पिढीला दुसर्‍या चार्ल्स राजाच्या नेतृत्वाखालील दरबारी व विद्याविभूषित मंडळींनी बुद्धिवादाच्या नावाखाली चालविलेला स्वैराचार पाहावा लागला. ही दोन्ही टोके टाळून मध्यम मार्गाने जाणे म्हणजेच बुद्धिवादी दृष्टिकोन स्वीकारणे होय, ही गोष्ट ॲडिसनने प्रभावीपणे पटवून दिली. १७११ ते १७१२ पर्यंत द स्पेक्टेटरचे अंक निघत होते. १७१४ त त्याचे पुनरुजीवन करण्यात आले आणि त्याच वर्षी ते कायमचे बंद पडले. द गार्डियन, द लव्हर, द रीडर या नियतकालिकांतूनही त्याने निबंधलेखन केले.

कवी आणि नाटककार म्हणून ॲडिसनचे कर्तृत्व विशेष लक्षात घेण्याजोगे नाही. तत्कालीन मुत्सद्दी आणि योद्धा मार्लबरो याने फ्रेंचांबरोबर केलेल्या ब्‍लेनिमच्या लढाईतील यशाचे गुणगान करणारी द कँपेन (१७०४) ही ॲडिसनची कविता त्या काळी थोडीफार प्रशंसिली गेली. त्याने लिहिलेल्या रॉझामंड (१७०७), केटो (१७१३) आणि द ड्रमर ऑर द हाँटेड हाउस (१७१६) या नाट्यकृतींपैकी केटोचा अपवाद वगळता एकही लोकप्रिय झाली नाही. केटोची लोकप्रियताही त्याच्या काळापलीकडे फारशी गेली नाही. लंडन येथे तो मरण पावला.

संदर्भ : 1. Aiken, Lucy, Life of Joseoh Addison, London, 1843. 2. Courthope, J. W. Addison, New York, 1884. 3. Lannering, Jan, Studies in the Prose Style of Joseph Addison, Cambridge (Massachusetts). 1952.

देवधर, वा. चिं.

ॲडिसन, टॉमस : (? एप्रिल १७९३ – २९ जून १८६०). ब्रिटिश वैद्य. त्यांचा लाँग बेंटन येथे जन्म झाला. एडिंबरो विद्यापीठात वैद्यकाचे शिक्षण घेऊन १८१५ मध्ये पदवी मिळविल्यानंतर ते गायच्या रुग्णचिकित्सागृहात १८२० मध्ये गेले व १८३८ मध्ये त्यांनी एफ. आर. सी. पी. ही पदवी मिळविली.

निष्णात शिक्षक, रोगनिदान पंडित आणि उत्तम वैद्य म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. अधिवृक्क ग्रंथीच्या विकृतीमुळे होणारा रोग आणि मारक पांडुरोग (रक्तातील तांबड्या पेशींचे, हीमोग्‍लोबिनाचे किंवा दोहोंचे प्रमाण अथवा रक्ताचे एकूण घनफळ कमी झाल्यामुळे होणारा रोग) यांचे उत्तम वर्णन त्यांनी प्रथम केले. म्हणून त्या रोगांना अनुक्रमे  ॲडिसन रोग आणि ॲडिसन पांडुरोग अशी नावे दिलेली आहेत.

रिचर्ड ब्राइट यांच्या सहकार्याने त्यांनी एलेमेन्ट्स ऑफ द प्रक्टिस ऑफ मेडिसीन हा ग्रंथ लिहिला. ब्रायटन (ससेक्स) येथे ते मृत्यू पावले.

कानिटकर, बा. मो.