शर : खगोलावरील खस्थ पदार्थाचे स्थान दर्शविण्यासाठी योजलेल्या आयनिक सहनिर्देशक पद्धतीमधील हा एक सहनिर्देशक आहे. खस्थ पदार्थापासूनचे केनीय अंतर म्हणजेच शर होय. हे अंतर अंशांत मोजतात. आयनिक वृत्ताच्या उत्तरेस ०ते + ९० असे (धन) आणि दक्षिणेस ० ते– ९० असे (ऋण) शर मोजतात. भोगांश हा आयनिक सहनिर्देशक पद्धतीमधील दुसरा सहनिर्देश आहे. 

पहा : ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति भोगांश.                    

ठाकूर, अ. ना.