वैरण : जनावरांना पोटभर अन्न म्हणून खाऊ घालण्यात येणाऱ्या वनस्पतीच्या अंशाला वैरण म्हणतात. जनावरांचा दैनंदिन आहारात वैरणीचे प्रणाम जास्त असते. जनावरांत पशुपक्षी यांच्या समावेश केला जात असला, तरी वैरण शब्द फक्त शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जनावरांना खाऊ घालावयाच्या चारा या अर्थाने वापरतात. जनावरांत गाय, बैल, म्हैस, घोडे, डुकरे, शेळ्या, मेंढ्या, उंट इ. पशू आणि कोंबड्या, बदके वगैरे पक्षी यांचा समावेश केला जातो. पशूंना वाळलेली आणि ओली (हिरवी) अशी दोन्ही प्रकारची वैरण खाऊ घालतात, पण पक्ष्यांना वाळलेली वैरण चालत नाही. त्यांना विशिष्ट प्रकारची लसूणघास, कांद्याची पात, कोबीचा पाला वगैरे ओली वैरण काही प्रमाणात खाऊ घालतात. ती त्यांना मानवते. ओली वैरण जास्त पाचक पौष्टिकही असते. पूर्वी जनावरांची संख्या मर्यादित असल्यामुळे नैसर्गिकपणे वाढणाऱ्या गवतावर त्यांचा निर्वाह होऊ शकत असे, पण अलीकडे जनावरांची संख्या अफाट वाढल्यामुळे निरनिराळ्या प्रकारची लिके व गवते आणि इतर वनस्पती यांची पद्धतशीर लागवड करून वैरणीचे उत्पादन वाढविणे आवश्यक झाले आहे. ही पिके आणि गवते हंगामी किंवा बहुवर्षायू (अनेक हंगाम टिकणारी) असतात.
सामान्यपणे वैरण पुढील चार-पाच उदगमांपासून मिळविली जाते : (१) ज्वारी, बाजरी, भात यांसारख्या धान्यपिकांची कणसे किंवा ओंब्या काढून घेतल्यावर उरलेली ताटे (२) लसूणघास, क्लोव्हर, बरसीम वगैरे शिंबी (शेंगा येणाऱ्या) कुलातील वनस्पतींची सपर्ण ओली ताटे (३) स्वीड, सलगम, गाजरे वगैरे पिकांपासून मिळणारा ओला पाला त्यांची पोसलेली मुळे (४) कापीव गवतासाठी राखून ठेवलेली सरकारी कुरणे आणि खाजगी मालकीच्या डोंगराळ भागातील गवती राने यांमधील कापून, वाळवून व साठवून ठेवलेले गवत आणि (५) अंजन, शेवरी, कडू निंब, सुबाभूळ वगैरे झाडांचा हिरवा पाला, उसाची वाडे वगैरे.
धान्यपिकांपासून गैरण : या पिकांपासून बरीच वैरण मिळते. या वैरणीत पिकाच्या जातीप्रमाणे पौष्टिकतेत फरक आढळतो. ज्वारीच्या वाळलेल्या वैरणीला कडबा, बाजरीच्या वाळलेल्या वैरणीला सरमाड आणि भाताच्या वैरणीला पेंडा किंवा पिंजर अशी महाराष्ट्रात नावे दिली आहेत. यांमध्ये पौष्टिकतेच्या दृष्टीने अनुक्रमे कडब्याचा पहिला, सरमाडाचा दुसरा आणि पेंढ्याचा तिसरा क्रमांक लागतो. ज्वारी, बाजरी, मका, ओट, सातू इ. धान्यपिकांपासून ओल्या वैरणीचे उत्पादन करतात, पण भात आणि गहू या पिकांपासून सहसा करीत नाहीत. ज्वारी, बाजरी, ओट, सातू, मका वगैरे धान्यपिके (विशिष्ट जाती) मुद्दाम वैरणीसाठी पाण्याखाली पेरली जातात. त्यांच्याप्रमाणे गिनी गवत, ऱ्होड्स गवत, पॅरा गवत, फेस्कू गवत, बंटी, मक्चारी, सुदान गवत आणि इतर गवते (कुंदा, कोद्रा, भादली) मुद्दाम पाण्याखाली लागवड करून त्यांच्यापासून ओल्या वैरणीचे उत्पादन घेतात.
मका : वैरणीच्या दृष्टीने ज्वारीच्या खालोखाल मक्याला महत्त्व आहे. या पिकाच्या संपूर्ण ताटात कोणत्याही अवस्थेत विषारी पदार्थ नसतो, म्हणून पिकाच्या कोणत्याही अवस्थेत ते गुरांना चारता येते. त्याची वाढ जलद होते. सुकलेल्या वैरणीत पौष्टिकता नसते. ओल्या वैरणीने जनावरांची कार्यक्षमता वाढते, कामाची जनावरे जास्त काम करतात. दुभती जनावरे जास्त दूध देतात. ६० किग्रॅ. मक्याच्या बियांत ६-८ किग्रॅ. चवळीचे बी मिसळून पेरल्यास हेक्टरी २८,०००–३३,००० किग्रॅ. वैरण मिळते. फक्त मकाच पेरल्यास हेक्टरी २०,०००-२५,००० किग्रॅ. इतकीच वैरण मिळते. [→मका].
ओट : ओल्या वैरणीच्या हिवाळी पिकासाठी हेक्टरी ६५ किग्रॅ. बी पेरतात. पेरल्यापासून ३ महिन्यांनी पिकाला गव्हाप्रमाणे ओंब्या येतात त्यावेळी पीक कापून जनावरांना चारतात. ओटबरोबर वाटाण्याचे बी मिसळून पेरल्यास उत्पादन जास्त येते व चाऱ्याची पौष्टिकता वाढते. ओल्या चाऱ्याचे हेक्टरी २५,००० ते ३८,००० किग्रॅ. उत्पादन येते. वेस्टर्न-११, केंट, क्रेग आफ्टरली, ग्रीन मौंटन, फूलधाम एस-२६८८, आल्जेरियन, खारसाई या याच्या सुधारलेल्या जाती आहेत. [→ ओट].
ब्ल्यू पॅनिक किंवा माले गवत : हलक्या जमिनीत शेताच्या बांधावर वाढणारे कोरडवाहू पीक १५०–२०० सेंमी. उंच वाढते. पाणभरतेही लावता येते. ४-६ कापण्यांत मिळून हेक्टरी २५,००० ते ३७,००० किग्रॅ. ओली वैरण मिळते. लागवड ४६ x ४५ सेंमी. हमचौरस अंतरावर ठोंबे लावून करतात. ती बरीच वर्षे टिकते. सुधारलेली जात एस-२९७.
नेपियर गवत व बाजारी यांच्या संकरापासून जायंट नेपियर गवत तयार केले जाते. त्यापासून हेक्टरी सु. ७,००,००० किग्रॅ. हिरवी वैरण मिळते. बारीक नेपियर गवत : (पेनिसेटम पॉलीस्टॅकीआन). ही जात अवर्षणाला प्रतिकारक असल्यामुळे कोरड्या प्रदेशांकरिता योग्य आहे. हिची ताटे बारीक असून ती १·५ ते १·८ मी. उंच वाढतात. हेक्टरी ३३,६०० किग्रॅ. हिरवी वैरण मिळते. पुसा जायंट नेपियर, एनबी-२१, ईबी-४(गजराज), एनबी-५, कोईमतूर ह्या याच्या सुधारलेल्या जाती होत. [→गजराज गवत].
अंजन : भारताच्या काही भागांत चांगल्या वैरणीचे हे महत्त्वाचे पीक घेतात. बायागती व कोरडवाहू पीक म्हणून हे लावतात. कोरडवाहू पिकापासून २-३ आणि बागायती पिकापासून ६–८ कापण्या मिळून वर्षात साधारणपणे १५,००० ते २६,००० किग्रॅ. ओली वैरण मिळते. ती पौष्टिक असते आणि गुरे आवडीने खातात. कोरडवाहू पीक हेक्टरी २०–२६ किग्रॅ. बी मुठीने फोकून शेतात पेरतात. बागायती पिकासाठी तयार केलेल्या शेतात ६० सेंमी. अंतरावर सऱ्या काढून सऱ्यामधील वरंब्यावर ३० सेंमी. अंतरावर रोपे लावतात. पिकात जनावरे चरावयाला सोडली, तरी त्यामुळे पिकाचे नुकसान होत नाही. [→अंजन-२].
मारवेल : हे बळकट मुळ्यांचे १·२ मी. उंचीचे कोरडवाहू पीक आहे. पिकामध्ये जनावरे चारली, तरी पिकाचे नुकसान होत नाही. लागवड ठोंबे लावून करतात. मारवेल–८ आणि मारवेल–९३ या सुधारलेल्या जाती असून त्यांचे उत्पादन हेक्टरी २६,००० ते २८,०००किग्रॅ. ओली वैरण इतके मिळते. ही गुरांना आवडते, पण मेंढ्यांना तेवढी आवडत नाही. [→मारवेल].
पॅरा गवत : (बफेलो ग्रास, मॉरिशय ग्रास, वॉटर ग्रास) याचे मूलस्थान ब्राझील असून १८९४ साली ते प्रथम पुण्यात आणण्यात आले. मुंबईला आरे दूध वसाहतीत हे लावले आहे. बहुवर्षायू व जोमाने १·८ मी. उंच वाढणारे हे गवत आहे. याची पाने गर्द हिरवी व रसदार असतात. हे सर्व प्रकारच्या जमिनीत (पाणथळ सोडून) उष्ण व दमट हवामानात चांगले वाढते. शेताच्या व कालव्याच्या बांधावर हे वाढते. कडक थंडीत हे वाढत नाही. नेपियर गवताप्रमाणे ६० सेंमी. अंतरावरील ओळीत याचे बेणे लावतात. सिंचनाची सोय असल्यास लावणीसाठी मार्च महिना योग्य आहे. नाहीतर पावसाळ्याच्या सुरुवातीला लावणी करावी. याला भरपूर पाणी लागते. सांडपाण्यावर हे घेता येते. लावणीनंतर पहिली कापणी ३ महिन्यांनी आणि त्यानंतरच्या कापण्या ३०–३५ दिवसांच्या अंतराने मिळतात. आरे दूध वसाहतीत हेक्टरी २,७५,००० किग्रॅ. हिरवी वैरण मिळते. सुरूवातीला गुरे हे गवत खात नाहीत म्हणून इतर वैरणीत मिसळून कोवळे गवत त्यांना देतात. [→पॅरा गवत].
ऱ्होड्र्स गवत : (क्लोरिस गयाना). हे बहुवर्षायू गवत ०·९ ते १·२ मी. उंच वाढते. याचे भरपूर बी मिळते. हेक्टरी पेरणीत ४·५ ते ८ किग्रॅ. बी लागते. बागायती जमिनीत किंवा जास्त पावसाच्या प्रदेशात ११ ते १३ किग्रॅ. बी वापरावे. तीन महिन्यांनी पहिली कापणी आणि १महिन्याच्या अंतराने नंतरच्या कापण्या अशा दर वर्षी १२ कापण्या मिळतात. हेक्टरी बागायती पिकापासून ३७,००० किग्रॅ. व जिरायत पिकापासून १७,५०० किग्रॅ. हिरव्या वैरणीचे उत्पादन मिळते. [→र्होपड्स गवत].
मोशी : (गोहाय). हे निसर्गतः वाढणारे महाराष्ट्रातील महत्त्वाचे गवत आहे. उत्पादन हेक्टरी सु. ८,००० ते १२,००० किग्रॅ. ओली वैरण एवढे असते. ही वैरण वाळवून गंजित रचूनही ठेवता येते.
कोष्टक क्र. १. चारापिके : लागवड
तपशील |
बरसीम १ |
चवळी २ |
लसूणघास ३ |
रानमूग ४ |
स्टायलो हेमाटा ५ |
जमीन |
मध्यम ते भारी |
मध्यम |
मध्यम ते भारी |
मध्यम ते भारी |
मध्यम ते हलकी |
पूर्वमशागत |
नांगरणी, कुळवणी २-३ |
नांगरणी, कुळवणी २-३ |
नांगरणी, कुळवणी ३-४ |
कुळवणी-१ |
नांगरणी, कुळवणी-१ |
पेरणीची वेळ |
ऑक्टोबर -डिसेंबर |
फेब्रुवारी-मे, जून-ऑगस्ट |
ऑक्टोबर-डिसेंबर |
जून-ऑगस्ट |
जून-ऑगस्ट |
पेरणीचे अंतर |
२०. सेंमी |
२५ सेंमी. |
२० सेंमी. |
६० सेंमी. |
५० सेमी. किंवा फोकून |
सुधारलेल्या जाती |
जे. बी. १ मेस्कावी, वरदान |
को-१, ईसी-४२१६ एचएफसी-४२-१ फॉस-१, सी-१५२ नं. ९९८ |
सिरसा-९, स्थानिक पुना-१ बी |
— |
— |
हेक्टरी बी (किग्रॅ.) (पेरणीपूर्वी बियांना जीवाणू खत चोळावे) |
३० |
५० |
२५–३० |
८ |
१२-१५ |
खते हेक्टरी (किग्रॅ) |
१५ नायट्रोजन, १२० फॉस्फरस, ४० पोटॅशियम (पेरणीपूर्वी) |
१५ नायट्रोजन, ९० फॉस्फरस, ३० पोटॅशियम (पेरणीपूर्वी) |
१५ नायट्रोजन, १६००–२०० फॉस्फरस, ४०-८० पोटॅशियम, ( पेरणीपूर्वी) |
५० फॉस्फरस (जुलै ते ऑगस्ट) |
५० फॉस्फरस (जुलै ते ऑगस्ट) |
हेक्टरी उत्पादन (क्विंटल) |
८००- १,००० (३ कापण्या) |
२००-२५० (१ कापणी) |
१,०००-१,१०० (एका वर्षात ९-१० कापण्या ३-४ वर्षे टिकते) |
२००-३०० (१ कापणी) |
२५०-३५० (२ कापण्या) |
कोष्टक क्र. १. चारापिके : लागवड (पुढे चालू) |
|||||
तपशील |
बाजरी ६ |
मका ७ |
ज्वारी ८ |
टिओसींट ९ |
ओट १० |
जमीन |
हलकी ते मध्यम |
मध्यम ते भारी |
मध्यम |
मध्यम |
मध्यम ते भारी |
पूर्वमशागत |
नांगरणी, कुळवणी २-३ |
नांगरणी, कुळवणी २-३ |
नांगरणी, कुळवणी २-३ |
नांगरणी, कुळवणी २-३ |
नांगरणी, कुळवणी २-३ |
पेरणीची वेळ |
मार्च-एप्रिल, जून-ऑगस्ट |
मार्च-एप्रिल, जून-ऑगस्ट, ऑक्टोबर-नोव्हेंबर |
मार्च-एप्रिल, जून-ऑगस्ट, ऑक्टोबर-नोव्हेंबर |
मार्च-एप्रिल, जून-ऑगस्ट, |
ऑक्टोबर-डिसेंबर |
पेरणीचे अंतर |
२५ सेंमी |
२५ सेंमी. |
२५ सेंमी. |
२५ सेंमी. |
२५ सेंमी. |
सुधारलेल्या जाती |
जायंट बाजरा, राजको के. ६७४, ६७७. एल. ७१, ७४ |
कंपोझीट मांजरी, ऑफ्रिकन टॉल, गंगासफेद-२, गंगा-५. विजय, डेक्कन डबल हायब्रीड |
मालदांडी, निळवा, एम. पी. चारी, पी. सी.- ६, रिओ रुचिरा (आरएस. ११-४) |
शिरसा |
केंट, एचएफओ २१२ बी, ओएस-६, ओएस-७, यूपीओ-९४, नं २६८८ |
हेक्टरी बी (किग्रॅ.) |
१० |
७५ |
५० |
५० |
१०० |
खते हेक्टरी (किग्रॅ) |
७०-१२० नायट्रोजन, २०-३० फॉस्फरस (पेरणीपूर्वी) |
८०-१२० नायट्रोजन, ३०-४० फॉस्फरस (पेरणीपूर्वी) |
९०-१२० नायट्रोजन, ३० फॉस्फरस (पेरणीपूर्वी) |
८० नायट्रोजन, ३० फॉस्फरस (पेरणीपूर्वी) |
९०-१२० नायट्रोजन, ३० फॉस्स्फरस (पेरणीपूर्वी) |
खते उत्पादन (क्विं) |
४५०-५५० |
४५०-५५० |
३५०-४५० |
३५०-४०० |
४५०-५०० |
कुडझू : जमिनीची मशागत करून हेक्टरी २०–२६ टन शेणखत घालतात. तिच्यात मुळावलेले वेलाचे तुकडे मे-जूनमध्ये लावतात आणि पाणी देतात. दोन-तीन महिन्यांनी वेल भरपूर वाढल्यावर पहिली कापणी करतात. वर्षातून ३-४ कापण्या मिळून हेक्टरी २०,००० ते २६,००० किग्रॅ. पर्यंत ओली वैरण मिळते. लागवड बरीच वर्षे टिकते. कुडझूचे वेल जमिनीवर पसरतात, त्यामुळे पावसाने होणारी जमिनीची धूप थांबते. [→कुडझू].
सोयाबीन : वैरणीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे पीक. पावसाळ्याच्या सुरुवातीला हेक्टरी ७६–८० किग्रॅ. बी पेरतात. पिकापासून हेक्टरी २०,०००–२६,००० किग्रॅ. ओली वैरण मिळते. [→सोयाबीन].
गवार : (स्यामोप्सिस टेट्रॅगोनोलोबा). भारतात गुजरात, पंजाब वगैरे भागांत खास चाऱ्यासाठी देखील हे पीक लावतात. तेंव्हा ते स्वतंत्रपणे एकटे किंवा ज्वारीच्या अगर मक्याच्या पिकाबरोबर मिश्र पीक म्हणून पेरतात. स्वतंत्र पिकापासून हेक्टरी १७,००० ते २०,००० किग्रॅ. ओली वैरण मिळते. महाराष्ट्रात मात्र केवळ चाऱ्यासाठीच हे पीक घेण्याची प्रथा नाही. [→ गवार].
वरील पिकांशिवाय उडीद, शेवरी इ. द्विदल धान्यांची पिके तुरळक जागी वैरणीसाठी लावतात.
चाऱ्याची इतर पिके : तृणधान्य व शिंबा जातीच्या वनस्पतींखेरीज काही कंदमुळाच्या पिकांचाही उपयोग जनावरांच्या वैरणीसाठी केला जातो. अशी पिके म्हणजे गाजर, स्वीड, सलगम वगैरे. यांची शेती सर्वसाधारण वैरणीच्या पिकांच्या शेतीपेक्षा जास्त काळजीपूर्वक कराबी लागते. त्यामुळे उत्पादन खर्च जरा जास्त येतो. या पिकांचा पाला आणि कंदमुळे हे सर्व भाग वैरणीसाठी वापरतात. त्यांच्यामध्ये पाण्याचे प्रमाण जवळजवळ ७५ टक्क्यांपर्यंत असते व स्टार्च २० टक्के असते. त्यांच्यामधील अन्नसत्त्वे पचनास हलकी असतात, परंतु हा चारा प्रमाणाबाहेर जनावरांच्या खाण्यात आल्यास त्यांची पचनशक्ती बिघडून ती धेंडाळतात म्हणून वैरण योग्य प्रमाणात खाऊ घालण्याची काळजी घ्यावी लागते. या हिरव्या वैरणीत कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे अ व ड यांची उणीव असते. या वैरणीच्या पिकांबद्दलची थोडक्यात माहिती पुढे दिली आहे.
गाजर : याचे हेक्टरी ६–८ किग्रॅ. बी मुठीने फोकून पेरतात किंवा पायभरीनेही पेरतात. याचा हंगाम रब्बी असून पेरल्यापासून ३ महिन्यांनी गाजरे तयार होतात. हेक्टरी ३०,०००–४०,००० किग्रॅ. गाजरे मिळतात. ही गाजरे जनावरांना खाऊ घालतात. यात अ हे जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते. इतर जीवनसत्त्वे कमी असतात. [→गाजर].
सलगम : जनावरांच्या वैरणीसाठी हे पीक हिवाळी हंगामात सऱ्या मधून किंवा वाफ्यांमधून लावतात. हेक्टरी उत्पन्न ३०,००० ते ४०,००० किग्रॅ. पर्यंत येते. [→ सलगम].
बीट : यूरोपीय देशांत हे पीक प्रामुख्याने साखर पैदाशीसाठी लावतात परंतु खास वैरणीसाठी उपयुक्त अशाही याच्या काही जाती आहेत. इतर कंदमुळांप्रमाणे बीटही जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास पचनक्रिया बिघडून जनावरे धेंडाळू लागतात. म्हणून बीटाबरोबर पुष्कळसे वाळलेले गवत खाऊ घालतात. [→ बीट].
भारतात कुरणातील गवत वाढू देऊन ते योग्य अवस्थेत आल्यावर कापून घेऊन त्या ठिकाणावरच वाळवितात. ते योग्य प्रकारे वाळले म्हणजे त्याच्या पेंढ्या बांधतात. कुरणातच दाबयंत्राच्या साहाय्याने ठराविक आकारमानांचे त्यांचे गठ्ठे किंवा बिंडे बांधतात. संरक्षणाच्या आणि हाताळण्याच्या दृष्टीने बिंडे बांधणे सोयीस्कर आणि किफायतशीर होते. ती नीट साठवून पुढे मागणीप्रमाणे त्यांची विक्री केली जाते. हे बिंडे तारा वापरून बांधले जातात. गवत जनावरांना चारण्यापूर्वी त्यातील तारेचे तुकडे वेचून काढून घेतात. ते जनावरांच्या पोटात गेल्यास ती दगावण्याचा संभव असतो. हेक्टरी मिळणारे गवताचे उत्पादन जमिनीचा कस आणि पावसाचे प्रमाण यांवर अवलंबून असते. सामान्यत: मारवेलचे हेक्टरी १०-१२ हजार किग्रॅ.पर्यंत उत्पन्न मिळते.
झाडांचा कोवळा पाला : काही विशिष्ट झाडांचा कोवळा पाला वैरण म्हणून वापरला जातो. भारतातील अशी झाडे म्हणजे जंगलात वाढणारे अंजन वृक्ष, पिंपळ, वड, कडू निंब, सुबाभूळ तसेच बागायतात किंवा नदीकाठच्या मळीच्या जमिनीत लावलेली शेवरी वगैरे होत. या झाडांच्या कोवळ्या सपर्ण डहाळ्या ओली वैरण म्हणून जनावरांना खाऊ घालतात. अंजनाचा आणि शेवरीचा पाला पौष्टिक वैरण समजली जाते.
याप्रमाणे वरील पाच उदगमांपासून जनावरांसाठी लागणारी वैरण मिळविली जाते. यांपैकी काही भाग हंगामातच गुरांना खाऊ घातला जातो. बाकीचा भाग उन्हाळ्यासारख्या गैरहंगामी दिवसांत उपयोगी पडावा म्हणून पेंढ्या किंवा बिंडे बांधून सुरक्षितपणे रचून ठेवला जातो.
गंज रचणे : गंज गोल किंवा चौकोनी आकाराची रचतात. गंज उंचवट्याच्या जागी कठीण जमिनीवर लावतात म्हणजे पावसाच्या पाण्याने वैरणीचे नुकसान होत नाही. गंजीत पाणी शिरून वैरण खराब होऊ नये म्हणून काही भागांत ती बाहेरून मातीने लिंपतात.
वैरणीचे तुकडे करून बंदिस्त जागेत साठविणे : ज्वारीचा कडबा कापण्याच्या यंत्राने बारीक (२–२·५ सेंमी. लांबीचे) तुकडे (कुट्टी) करून बंदिस्त खोलीत सुरक्षितपणे साठवितात. यामुळे साठवणीला जागा कमी लागते. बारीक तुकडे केल्यामुळे जनावरे ते आवडीने खातात व वैरण वाया जात नाही.
तीन बाजूंनी बंदिस्त उंच इमारत तयार करून तिच्यात वैरण रचून ठेवतात. तिला इंग्रजीत डचर्बान म्हणजे वैरण कोठार वा भागर म्हणतात. इंग्लंड-अमेरिकेत हा प्रकार रुढ आहे. भारतातही अलीकडे त्याचा उपयोग केला जात आहे. काही ठिकाणी गोठ्यांच्या माळ्यांमधून वैरण साठवितात. महाराष्ट्रात भाताचा पेंढा असा साठवितात. यात वैरण सुरक्षित राहून ती गुरांना खाऊ घालणे सोपे जाते. अशा प्रकारे साठविलेल्या वैरणीचे आगीपासून संरक्षण करण्याची योग्य व्यवस्था करणे जरूर असते.
मुरघास तयार करणे : पावसाळ्यात ओली वैरण कापून विशिष्ट पद्धतीने मुरवून टिकविण्याच्या पद्धतीला मुरघास म्हणतात. मुरघासासाठी वापरण्यात येणाऱ्या पेवाला इंग्रजीत ‘सायलो’ अशी संज्ञा असून त्यावरून मुरघासासाठी ‘सायलेज’ ही संज्ञा रुढ झाली आहे. हिरव्या चाऱ्याच्या टंचाईच्या वेळी जनावरांना मुरघास विशेष उपयुक्त ठरतो. मुरघास तयार कर अण्याच्या खास पद्धतींचे सविस्तर वर्णन मराठी विश्वकोशातील ‘मुरघास’ या नोंदीत करण्यात आले आहे.
दाणावैरणीचे गुरांना महत्त्व : वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीरातील सु. ९८% भाग कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन, कॅल्शियम व फॉस्फरस या घटकांपासून बनलेला असतो. बाकीचा भाग इतर खनिजांपासून बनलेला असतो. जनावरे निरनिराळ्या वनस्पती खाऊन जगतात. वनस्पती सूर्यप्रकाश, हवा, जमिनीतील खनिज पदार्थ या घटकांवर जगून वाढतात. ह्या कारणाने त्यांनी शरीरात जमा केलेले घटक त्याच्यावर जगणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात समाविष्ट होतात. म्हणून जनावरांना जोपासण्यासाठी खाऊ घातलेल्या दाणावैरणीला फार महत्त्व प्राप्त होते. [→ पशुखाद्य].
निरनिराळ्या प्रकारच्या जनावरांना त्यांच्या वैयक्तिक वजनाप्रमाणे दर १००किग्रॅ. वजनाला २ किग्रॅ. ओली वैरण प्रत्येकी दररोज खाऊ घालावी लागते. वैरणीत चरबरीतपणा जास्त व अन्नसत्त्व कमी म्हणून शरीर पोसण्याची गरज भागविण्याकरीता जनावरांना ती जास्त प्रमाणात खावी लागते. जनावरांना काम करण्यासाठी आणि दूध, लोकर, मांस उत्पादनासाठी संतुलित आहार द्यावा लागतो. तो ओली किंवा वाळलेली वैरण आणि निरनिराळ्या धान्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांचा बनविलेला खुराक (भरडा), सरकी, चुनी, फोल, पेंड वगैरे लहान जनावरांना जास्त दूध, कोवळी वैरण आणि सहजी पचणारे भुसा, चुणीसारखे पदार्थ देतात. दुभत्या जनावरांना रोज प्रत्येकी देत असलेल्या दुधाच्या ४०ते ६० टक्के भरडा देतात. दाणावैरणीपासून जनावरांना प्रथिन, जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थ मिळतात. त्यामुळे त्यांचा खालीलप्रमाणे फायदा होतो.
प्रथिनामुळे शरीराची झीज भरून निघते. शरीराला उष्णता व ताकद मिळते. शरीरात मांस, दूध, अंडी वगैरेंसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांची उत्पत्ती होऊ शकते. जीवनसत्त्वांमुळे शारीरिक वाढ होते व शरीरस्वास्थ टिकून राहते. खनिज पदार्थांमुळे हाडे, दात बळकट बनतात. त्यांच्यामुळे ग्रंथीमधून अन्नपचन रस स्त्रवण्याच्या क्रियेत मदत होते. खनिज पदार्थांना जनावरांचा पोषण कार्यात फार महत्त्व असते.
दाणावैरणीच्या आहाराचा योग्य प्रकारे उपयोग होण्यासाठी जनावरांना दररोज भरपूर स्वच्छ पाणी पिण्यासाठी पुरविणे अगदी जरूर असते. खाल्लेले अन्नपदार्थ पाण्यात विरघळून त्यांतील अन्नांश सर्व शरीरभर पसरतो. पाण्याने शरीराला लवचिकपणा येतो व शरीराचे तापमान स्थिर राहते.
वैरणीचे रासायनिक संघटन : जनावरांना त्यांचे शरीरस्वास्थ ठीक राहावे आणि त्यांच्याकडून मेहनतीचे काम तसेच मांस, दूध वगैरे प्रथिनयुक्त अन्नपदार्थ शरीरात उत्पन्न करण्याचे काम व्यवस्थितपणे व्हावे यांसाठी दाणावैरण योग्य प्रमाणात देणे जरूर असते. समतोल आहार जनावरांना देता यावा म्हणून देशात उपलब्ध असलेल्या पिकांच्या आणि गवतांच्या वैरणी कोणत्या प्रमाणात द्याव्या, त्यांच्या जोडीला उपलब्ध असलेले खुराकाचे पदार्थ (जोंधळा, बाजरी, उडीद, मूग, हरभरा वगैरे), सरकी, निरनिराळ्या गळिताच्या धान्यांपासून मिळालेल्या पेंडी कोणत्या प्रमाणात द्याव्यात हे ठरविण्याकरीता त्यांच्यामध्ये निरनिराळी पोषक द्रव्ये किती प्रमाणात आहेत हे निश्चित माहीत असणे श्रेयस्कर असते. त्या माहितीवरून उपलब्ध असलेल्या वैरण प्रकारावरून जनावरासाठी समतोल आहार बनविण्याकरीता झुराकाचे कोणते पदार्थ किती प्रमाणात घ्यावे हे सुलभपणे ठरविता येते. म्हणून कोष्टक क्र.२ व ३ मध्ये निरनिराळ्या प्रकारच्या वैरणी, झाडपाला, दाणे-पेंडी वगैरे खुराकाच्या पदार्थांच्या रासायनिक संघटनांची व घटकांची आकडेवारी दिली आहे. [→ पशुखाद्य].
कोष्टक क्र. २. वैरणीचे रासायनिक संघटन
वैरण |
कच्च्या स्वरुपातील प्रथिन % |
कच्च्या रूपातील तंतू % |
नायट्रोजनरहित अर्क % |
वसा % |
रक्षा % |
ठिकाण |
धान्याच्या पिकापासूननची वैरण |
||||||
ज्वारीचा कडबा |
३·८७ |
३३·६८ |
५३·७८ |
१५६·६ |
७·११ |
पंजाब |
४·३ |
३·६६ |
४७·४९ |
१·१६ |
८·०६ |
बंगलोर (कर्नाटक) |
|
४·८५ |
३३·०७ |
५२·७६ |
१·५४ |
७·८२ |
गुजरात |
|
४·५५ |
३३·३७ |
५२·५६ |
१·५४ |
७·९२ |
पुणे |
|
मका |
५.०५ |
२६.९० |
५९.३० |
१.४६ |
७.२९ |
आणंद (गुजरात) |
८.१८ |
२७.२२ |
५१.८५ |
०.९३ |
११.८२ |
पुणे |
|
८.६३ |
२४.७२ |
५६.१८ |
१.४९ |
८.९३ |
गोकाक (कर्नाटक) |
|
ओट |
६.४४ |
२८.७२ |
५३.२० |
२.३१ |
९.३३ |
पंजाब |
५.३२ |
३४.२१ |
४७.०६ |
२.४८ |
१०.९३ |
आणंद |
|
५.२४ |
२७.३४ |
५५.८२ |
३.५० |
८.१० |
पुणे |
|
बाजरी |
१०.५६ |
२७.९६ |
५०.१५ |
२.१२ |
९.२१ |
पंजाब |
७.६५ |
३६.०७ |
४३.४० |
१.८८ |
११.०० |
आणंद |
|
३.७५ |
३२.७२ |
५१४.६२ |
१.३५ |
१०.५६ |
पुणे |
|
भाताचा पेंढा |
५.७५ |
२९.४९ |
४१.६८ |
२.१५ |
१८.२९ |
आणंद |
वैरणीची द्विदल पिके |
||||||
बरसीम |
१५.४५ |
२६.०६ |
३५.८८ |
२.३६ |
२०.७५ |
बिहार |
१७.३५ |
२५.९१ |
४०.६९ |
१.८९ |
१४.१६ |
पंजाब |
|
१४.८४ |
२४.५७ |
४२.०५ |
२.६४ |
१८.८० |
आणंद |
|
१८.६० |
२२.६० |
४२.१० |
२.५० |
१४.४० |
पुणे |
|
लसूणघास |
१८.३९ |
२२.७८ |
४६.२८ |
२.७० |
९.७४ |
— |
२०.७५ |
२२.९२ |
४०.५८ |
३.४२ |
९.७४ |
आणंद |
|
२०.२८ |
२५.६७ |
३६.१० |
३.१२ |
१२.३३ |
हिस्सार (पंजाब) |
|
गवते |
||||||
अंजन |
४.८७ |
३२.९१ |
५१.२१ |
०.८३ |
१०.१८ |
मीरत (उ. प्रदेश) |
५.७३ |
३६.६९ |
४४.२५ |
१.४२ |
११.९१ |
पंजाब |
|
६.३८ |
३३.३० |
४९.७१ |
०.६८ |
९.७३ |
होसूर (कर्नाटक) |
|
३.२१ |
३७.१८ |
५०.४० |
०.७४ |
८.४८ |
म्हैसूर (कर्नाटक) |
|
फुली गवत |
३.८५ |
३६.९१ |
४१.९५ |
०.९८ |
१६.३१ |
अहमदनगर |
३.८१ |
३६.९८ |
४५.६४ |
१.१५ |
१२.४९ |
तळेगाव |
|
२.७५ |
३७.७८ |
४२.८१ |
१.४३ |
१५.४० |
औरंगाबाद |
|
मशागतीखालील गवते |
||||||
गिनी गवत |
४.७६ |
४२.१० |
३९.६९ |
१.१५ |
१२.३० |
बंगलोर |
५.५६ |
४१.१४ |
३६.७५ |
१.२० |
१५.३५ |
पुणे |
|
मारवेल |
६.२३ |
३०.२८ |
४७.१५ |
२.३३ |
१४.०० |
पुणे |
ऱ्होडस गवत |
१२.३३ |
२७.२८ |
४५.८४ |
२.४१ |
१२.१४ |
बंगलोर |
गजराज गवत |
६.१६ |
२८.०७ |
४७.४७ |
१.८९ |
१६.७० |
पंजाब |
९.४२ |
२८.५५ |
४६.२१ |
१.९१ |
१६.५९ |
आणंद |
|
नेपियर गवत |
१०.१५ |
३०.५० |
४१.०० |
२.११ |
१६.५९ |
पंजाब |
पॅरा गवत |
११.९८ |
२८.२२ |
४५.७० |
२.८९ |
११.२१ |
बंगलोर |
सूदान गवत |
७.२५ |
२४.८१ |
५५.१४ |
१.९५ |
१०.८५ |
आणंद |
झाडांचा पाला |
||||||
बाभूळ |
७.०४ |
३३.३२ |
५१.१६ |
२.५६ |
५.९० |
पंजाब |
कडू निंब |
१५.३६ |
१२.७३ |
५५.५४ |
४.१७ |
११.२० |
आणंद |
१५.८७ |
१७.६८ |
५०.७३ |
५.०९ |
१०.६३ |
हिस्सार |
|
१४.८९ |
१५.४२ |
५४.२८ |
५.२६ |
१०.१५ |
सौराष्ट्र |
|
१६.१२ |
२०.६९ |
५२.०६ |
३.४० |
७.७३ |
इझतनगर |
कोष्टक क्र. ३. वैरणीतील पचनास योग्य घटक व पौष्टिकता
खाद्यातील पचनीय अन्नांश |
|||||
वैरण |
कच्च्या रूपातील प्रथिन % |
शर्करामय भाग % |
वसा % |
पौष्टिक प्रमाण |
ठिकाण |
ज्वारी कडबा |
२·२५ |
४६·७९ |
०·४६ |
२१·३० |
पुणे |
१·११ |
५१·७८ |
०·५२ |
४७·७० |
बंगलोर |
|
०·९७ |
५२·०२ |
०·६० |
५४·९० |
पंजाब |
|
१·१७ |
५३·२३ |
०·९० |
४७·२० |
आणंद |
|
मका |
४·६८ |
६०·९४ |
०·९६ |
१५·०० |
ल्यालपूर (पंजाब) |
ओट |
१०·५० |
५३·७९ |
१·०७ |
५·४० |
पंजाब |
९·१० |
५४·८५ |
१·९० |
६·४९ |
पुणे |
|
बाजरी सरमाड |
४.३१ |
४३.२७ |
१.४२ |
१०.८० |
ल्यालपूर |
गव्हाचा भुसा |
८.७२ |
५९.१० |
१.१४ |
७.१० |
पुसा (पंजाब) |
हरभरा चुणी |
१४.३३ |
६३.२७ |
१.९६ |
४.७० |
बंगलोर |
सरकी |
१२.४९ |
३४.६५ |
१८.५० |
६.१० |
ल्यालपूर |
शेंगदाणा पेंड |
४६.३९ |
१४.५९ |
७.९७ |
०.७० |
बंगलोर |
खोबऱ्याची पेंड |
२२.८१ |
४२.१२ |
८.२० |
२.७० |
ल्यालपूर |
तिळाची पेंड |
४२.६० |
२३.३६ |
९.३२ |
१.०० |
बंगलोर |
गवार भरडा |
३२.२३ |
३९.९३ |
२.९६ |
१.४० |
ल्यालपूर |
तांदळाचा कोंडा |
६.७६ |
३५.१५ |
१०.०० |
८.५२ |
चेन्नई (तमिळनाडू) |
पहा : कुरण कोंडा गवते पशुखाद्य पेंड मुरघास.
संदर्भ : १. Maynard, L. A: Loosli, J. K. Animal Nutrition, Tokyo, १९५६.
२. Narayan, T.R Dabadhao, P.M. Forage Crops of India, New Delhi, १९७२.
३. जोशी, भा. पं. चारा-पिके, पुणे, २०००. ४. ठोंबरे, शिवाजी खुस्पे, व. सी. चारा-पिके पुणे, २०००.
चव्हाण, ई. गो ओक, भा. ग. पावगी, वि. चिं.
“