वर्ति : (वात आयुर्वेद). (१) मलावरोध असताना औषधी वात गुदद्वारात घालून शौचास करवितात. वातावरोधात व तज्‍जन्य रोगांतही हा उपचार करतात. (२) डोळ्याच्या रोगनाशक औषधांची वात उगाळून अंजन करतात. (३) व्रणात औषधांनी माखलेली कापडाची वात बसवतात. (४) धूम्रपानाच्या औषधांची पोकळ वात करून चिरुटासारखी पेटवून धूर पितात.

जोशी, वेणीमाधवशास्त्री