जोनरॉबिन्सन, जोन व्हायोलेट : (३१ ऑक्टो.१९०३−५ ऑगस्ट १९८३). सुविख्यात ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापिका तसेच केन्सप्रणीत अर्थशास्त्र-सिद्धांताच्या पुरस्कर्त्या जन्म सरे परगण्यातील कँबर्ली येथे वरिष्ठ मध्यमवर्गात झाला. वडील मेजर जनरल सर फ्रेड्ररिक मॉरिस−हे पुढे लंडन विद्यापीठाच्या क्वीन मेरी महाविद्यालयाचे प्राचार्य बनले. आईचे नाव हेलेन मार्गरेट मार्श.

जोन रॉबिन्सन यांचे शिक्षण सेंट पॉलस् गर्ल्स स्कूल व गिर्टन महाविद्यालय, केंब्रिंज येथे झाले. येथे झाले. तेथे त्या ‘गिलख्रिस्ट स्काँलर’ म्हणून प्रसिद्धी पावल्या. १९२५ मध्ये त्यांनी अर्थशास्त्र ट्रायपॉस परीक्षेची द्वितीय श्रेणीत पदवी मिळविली. १९२६ मध्ये केब्रिंज विद्यापीठातील एडवर्ड ऑस्टिन जी. रॉबिन्सन या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांशी त्यांचा विवाह झाला. काही काळ (१९२६−२८) भारतात घालवून हे नवपरिणित दांपत्य केंब्रिजला परतले. जोन यांनी १९३१−७१ एवढा प्रदीर्घ काळ केब्रिंज विद्यापीठात अर्थशास्त्राचे अध्यापन केले. (उपअधिव्याख्यात्या १९३१ अधिव्याख्यात्या १९३७−४९, प्रपाठिका १९४९−६५, प्राध्यापिका १९६५−७१). स्टॅनफर्ड विद्यापीठात त्या १९६९ मध्ये अर्थशास्त्राच्या विशेष प्राध्यापिका बनल्या. १९६५ मध्ये न्यूनहॅम महाविद्यालयांत त्यांना सन्माननीय अधिछात्रवृत्ती मिळाली. अशा प्रकारचा सन्मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला होत.

जोन रॉबिन्सन ह्यांच्यावर जॉन मेनार्ड केन्स, प्येरो खाफा, मायकेल कालेकी व रिचर्ड कॅहन या अर्थशास्त्रज्ञांचा मोठा प्रभाव पडला. विशेषतः द इकॉनॉमिक्स ऑफ इंपरफेक्ट कॉपिटिशन या आपल्या पहिल्या महत्त्वाचा ग्रंथाच्या प्रस्तावनेत कॅहन यांचे ऋण त्यांनी विशेषत्वाने मान्य केले आहे.

अर्थशास्त्राला जोन रॉबिन्सन यांची सर्वाच बहुमोल देणगी म्हणजे ‘अपूर्ण स्पर्धासिद्धांत’ ही होय. १९२६ मध्ये स्राफा यांनी प्रकाशित केलेल्या लॉज ऑफ रिटर्न्स अंडर कॉपिटिटिव्ह कंडिशन्स या क्रांतिकारी लेखाचा आधार घेऊन जोन रॉबिन्सन यांनी १९३३ मध्ये मार्शलीय अर्थशास्त्र बाजूला सारून त्या जागी अपूर्ण स्पर्धासिद्धांताची उभारणी केली. द इकॉनॉनिक्स ऑफ इंपरफेक्ट कॉपिटिशन या आपल्या पहिल्या ग्रंथात प्रकाशनामुळे (१९३३) त्या ग्रंथात त्यांनी मार्शल यांच्या स्पर्धात्मक विश्लेषणाऐवजी मूल्य (किंमत) सिद्धांताचे मक्तेदारीच्या अनुषंगाने विश्लेषण केले. वस्तू सर्वार्थाने समान असतात, हे पुर्ण स्पर्धेचे गृहीतकृत्य वास्तव जीवनात क्वचितच प्रत्यक्षात येते. बाजारात मिळणाऱ्या वस्तू ह्या रंग, आकार, वास, वेस्टन आदी बाबतीत थोड्याफार भिन्न असतात. या वस्तुभेदामुळे वास्तव बाजार म्हणजे पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी या दोन्ही अवस्थांचे मिश्रण असते, असे जोन रॉबिन्सन यांचे प्रतिपादन होते. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ एडवर्ड चेंबरलिन (१८९९−१९६७) यांनी या सिद्धांताचे अधिक विस्तृत विवेचन केले आहे. ‘सीमांत परिव्यय’ (मार्जिनल काँस्ट), ‘सीमांत आय’ (मर्जिनल रेव्हेन्यू) ‘एकक्रयण’ (खरेदीदाराची मक्तेदारी मॉनॉप्सनी) ह्या अतिशय महत्त्वाचा संज्ञा जोन रॉबिन्सन यांनी वापरात आणल्या. ‘श्रम’ या घटकाचा परामर्श घेताना त्यांनी कामगार संघटना व किमान वेतन कायदा यांचे महत्त्व विशद केले आहे.

केंब्रिज विद्यापीठात १९३० च्या पुढील काळात अर्थशास्त्रज्ञांत झालेल्या चर्चासत्रात जोन रॉबिन्सन यांनी विशेष भाग घेतला, या चर्चासत्रांत जोन रॉबिन्सन यांनी विशेष भाग घेतला या चर्चेमुळे केन्स यांच्या आर्थिक सिद्धांताचा विकास होण्यास चालना मिळत गेली. केन्सप्रणीत आर्थिक सिद्धांताचे अध्यापन करीत असतानाच जोन रॉबिन्सन यांनी अनेक ग्रंथ, अभ्यासमार्गदर्शिका, पुस्तिका लिहिल्या. यामागे त्यांचा अर्थशास्त्राच्या अभ्यासकाखेरीज अन्य वाचकालाही अर्थशास्त्रसिद्धांत समजावेत, असा हेतू होता. १९४०−४५ च्या सुमारास त्यांनी अर्थशास्त्रीय सिद्धांताच्या विवेचनामध्ये मार्क्सप्रणीत अर्थशास्त्रावर अधिक भर दिल्याने ॲन एसे ऑन मार्क्सिप्रणीत इकॉनॉमिक्स (१९४२), मार्क्स, मार्शल अँड केन्स (१९५५) या ग्रंथांवरून दिसून येते. रॉबिन्सन यांचे अपारंपरित विचार तसेच बिगर भांडवलशाही राष्ट्रांविषयी त्यांना वाटणारी सहानुभूती व आस्था यामुंळे आयुष्यभर त्या वादग्रस्त व्यक्तिमत्त्व ठरल्या प्रथम त्यांच्या विचारसरणीवर मार्शल यांचा, त्यानंतर केन्स यांचा व अखेरीस मार्क्सचा प्रभाव पडल्याने दिसते.

जॉन मेनॉर्ड केन्स यांच्या द जनरल थिअरी ऑफ एम्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी (१९३५) या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या लेखनात जोन रॉबिन्सन यांनी मोठे सहकार्य दिले. इंट्रोडक्शन टू द थिअरी ऑफ एम्पलॉयमेंट, (१९३७) या आपल्या ग्रंथात त्यांनी केन्स यांच्या वरील ग्रंथातील संकल्पनांचे प्रथमच सुबोध पद्धतीने विश्लेषण केलेले हाच ॲक्युम्युलेशन ऑफ कँपिटल (१९५६) या यांच्या ग्रंथात स्पष्टपणे दिसतो. इकॉनॉमिक फिलॉसफी (१९६३) या ग्रंथात आर्थिक मूल्ये ही अभिन्न नसल्यास त्यांनी प्रतिपादिले आहे.

जोन रॉबिन्सन हयांनी चीनसहित अनेक देशांना भेटी दिल्या. चायना : ॲन इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह (१९५८) द कल्चरल रेव्हलूशन इन चायना (१९६९) व इकॉनॉमिक मँनेजमेंट इन चायना (१९७५) हे त्यांचे चीनवरील ग्रंथ बरेच गाजले. त्यांचे एसेज इन थिअरी आँफ इकॉनॉमिक ग्रोथ (१९६२), फ्रीडम अँड नेसेसिटी (१९७०), इंट्रोडक्शन टू मॉर्डन इकॉनॉमिक्स (१९७३, सहलेखन जॉन ईटवेट), कलेक्टेड इकॉनॉमिक पेपर्स खंड १ ते ५ (१९५१−७१) (१९८०), हेही त्याचे महत्त्वाचे ग्रंथ मानण्यात येतात. याशिवाय त्यांचे लेख व शोधनिबंध अनेक ख्यातनाम आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

जोन रॉबिन्सन आपल्या पतीसमवेत १९२६−२८ या काळात भारतात आल्या होत्या. त्यांना भारताबद्दल आस्था व प्रेम होते. जलद व समन्यायी विकासाकरिता भारताने लोकसंख्या समस्येचे निरसन केले पाहिजे, असे त्यांनी आवर्जून प्रतिपादिले होते. साप्रत प्रचंड प्रमाणावरील बेकारी व अर्धबेकारी या समस्या संबध जगाला भेडसावीत आहेत, ही गोष्ट आपल्या सामाजिक व आर्थिक संस्थामधील वैगुण्य व त्रुटी यांची निदर्शक असल्यास त्यांचे मत होते.

जोन रॉबिन्सन यांनी अर्थशास्त्र विषयासाठी अपूर्ण स्पर्धा, केन्सप्रणीत साकलिक अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यापार, मार्क्सप्रणीत अर्थशास्त्राचे विश्लेषण, विकास सिद्धांत, आर्थिक तत्त्वज्ञान अशा अर्थशास्त्राचे अनेक क्षेत्रांचे महत्वाचे योगदान केले आहे. आधुनिक अर्थशास्त्राच्या अनेक क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान केले आहे. आधुनिक भांडवलशाहीचे योगदान केले आहे. आधुनिक भांडवलशाहीचे त्यांनी जे मर्मग्राही विश्लेषण केले, त्यावरून त्यांच्या स्वतंत्र विचारप्रणालीचा प्रत्यय येतो.

जोन रॉबिन्सन यांचे लंडन येथे दीर्घकालीन आजारानंतर बेशुद्धावस्थेतच निधन झाले.

गद्रे, वि. रा.