राष्ट्रीय इमारत बांधकाम निगम : राष्ट्रीय स्तरावर विविध प्रकल्पांच्या उभारणीकरिता केंद्र सरकारने स्थापन केलेला निगम. त्याची स्थापना १९६० मध्ये झाली. त्याची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत : प्रकल्पांची बांधकामे कार्यक्षमतापूर्वक आणि काटकसरीने नेमून दिलेल्या वेळात पार पाडणे, (२) विशेष प्रकारची बांधकामे करणे, (३) सुदूर आणि दुर्गम प्रदेशांत बांधकामे करणे, (४) पर्यवेक्षणाची जबाबदारी अंगावर घेऊन प्रकल्पाच्या बांधकामासंबंधीच्या पर्यवेक्षण आणि अभियांत्रिकी जबाबदाऱ्यांतून निगमाच्या ग्राहकांना मुक्त करणे, (५) कर्मचाऱ्यांचे शोषण न करता नमुनेदार बांधकाम करणारी संस्था अशा प्रकारे कार्य करणे आणि (६) बांधकाम व संलग्न क्षेत्रांत समंत्रणा पुरविणे.

निगमाच्या भारतात ४५ व भारताबाहेर १२ शाखा आहेत. निगमाने निवासस्थान-समूह आणि कार्यालय-समूह बांधणे यांशिवाय इतर बऱ्याच खास क्षेत्रांत प्रावीण्य मिळविले आहे. यांत गगनचुंबी इमारती, पूल, जमिनीत उभे वासे ठोकणे, प्लवमार्ग, सागरी बांधकाम, भुयारी लोहमार्ग, उंच चिमण्या, पूर्वप्रतिबलित काँक्रीटची कामे, कारखान्यांसाठी इमारती इत्यादींचा समावेश होतो. निगमाचा नियोजन विभाग नियोजन ते संपूर्ण बांधकाम अशी ‘चावी-फिरवा’ (टर्न-की प्रोजेक्ट्स) प्रकारची कामे अंगावर घेतो. त्याला इराकमध्ये ‘बगदाद अल्कियाम अल् अकाशत लोहमार्गा’साठी औद्योगिक इमारती व प्रमुख स्थानके बांधण्याचे ६२·६ कोटी रुपयांचे सर्वांत मोठे काम मिळाले आहे. कुवेत, सिरिया इ. मध्यपूर्व देशांत लहानमोठी कामे निगम करीत आहे.

निगमाची आर्थिक परिस्थिती व व्यवहार पुढील कोष्टकामध्ये दिले आहेत.

(अ) भांडवल व त्याचा उपयोग (कोटी रुपये)

१९८१-८२

१९८२-८३

भाग भांडवल

९·०

१०·०

राखीव निधी

१·५

३·२

संचयित घसारा

१७·२

१७·५

कर्जे

६२·५

९५·६

एकूण भांडवल

९१·२

१२६·३

स्थावर मालमत्ता

३२·५

४३·१

खेळते भांडवल आणि इतर उपयोग

५७·१

८३·०

तूट

१·६

०·२

(ब) उत्पन्न व खर्च

कार्यजन्य उत्पन्न

८०·६

१०१·३

किरकोळ उत्पन्न

२·७

१·७

एकूण उत्पन्न

८३·३

१०३·०

उत्पादन खर्च

६९·४

८३·९

इतर खर्च

६·०

६·५

एकूण खर्च

७५·३

९०·४

नफा

८·०

१२·६

व्याज

७·६

९·२

कर तरतूद

०·१

२·१

निव्वळ नफातोटा

०·३

१·३

पेंढारकर, वि. गो.