योगवाही : (आयुर्वेद). अन्य द्रव्य संयोगाने त्या द्रव्याचे गुणवहन करणारे ते. वायू हा तेजाशी संयुक्त होऊन उष्ण तीक्ष्ण होऊन दाह करतो व जलगुणाशी शीत संयुक्त होऊन शीत निर्माण करतो. मध, तूप, पारा, तिळाचे तेल ही सर्वश्रेष्ठ योगवाही आहेत. त्यांतही तूप व पारा ही अग्र्य आहेत. म्हणून तूप कफकर असूनही चित्रकादी द्रव्यांच्या संस्काराने संयोगाने कफनाशक होते. तसेच पाराही ज्या द्रव्यांचा संस्कार त्याच्यावर केला जाईल त्यांचे गुण घेऊन ते वाढवितो.

जोशी, वेणीमाधवशास्त्री