आसव व अरिष्ट : (आयुर्वेद). वनस्पतींचा रस घेऊन त्यात गुणांच्या अपेक्षेने गूळ, साखर किंवा मध किंवा कोणतेही दोन वा सर्व घालून त्यात धायटीची फुले घालून, भांड्याचे तोंड बांधून धान्याची रास इत्यादींमध्ये ते ठेवावे राशीतील सारख्या उष्णतेने औषधी द्रव्यांचा संयोग पचनाने होतो. सरासरी महिन्यात आसवाचे गुण निर्माण होतात.

आसव जीर्ण रोगावर फार उपयुक्त असते. ते जितके जुने तितके अधिक गुणकारी असते. आसव औषधिमद्याचाच सौम्य प्रकार आहे. अरिष्ट काढ्यापासून तयार होते, आसवाप्रमाणेच निर्माण पद्धती व गुण आहेत. फक्त आसवापेक्षा अरिष्ट हलके व अधिक अग्निदीपक असते.

जोशी, वेणीमाधवशास्त्री