मृगशृंगभस्म : (आयुर्वेद). सांबराच्या शिंगाचे भस्म. हृद्रोगावर साधे, स्वस्त औषध. 

शुद्धी : प्रवाळशुद्धीप्रमाणे. भस्म : मातीच्या संपुटात मातकापड करून अग्नि देणे. पांढरे स्वच्छ पिठासारखे होईपर्यंत अग्नी द्यावा. अनुपान: दूध, मांस, तूप, माहळूंगाचा पाक विशेषतः हृदयविकारावर चांगला. गुण :हृदयवेदना व रोग, ओला खोकला, श्वास, अस्थिक्षय व मांसक्षय यांवर उपयुक्त.

जोशी, वेणीमाधवशास्त्री