भात:(हिं. चावल, धानगु. डांगर क. अक्की सं. शालि, तंडूल, व्रीही इं. पॅडी, राइस लॅ. ओरिझा

आ. १. भात : (१) मुळे, (२) आवरक (खोडास वेढणारा पानाचा तळभाग), (३) पान, (४) परिमंजरी (लोंबी).

सटायव्हा कुल-ग्रॅमिनी). भात ही संज्ञा शिजविलेल्या तांदळासाठी व टरफलासहित तांदळाला आणि त्याची निर्मिती करणाऱ्यावनस्पतीलाही वापरली जाते (उदा., भाताचे शेत).

भात हे पूर्वापार खाद्यान्नांपैकी एक असून ते जगातील निम्म्याहून अधिक लोकांचे प्रमुख अन्न आहे तसेच ते अंटार्क्टिका वगळता सर्व खंडांत लागवडीत आहे. भारतातील जवळजवळ ७५%लोकांच्या आहारात भाताचा समावेश असतो. भारतातील एकूण तृणधान्यांच्या वापरापैकी सु. ५०%वापर तांदळचा होतो (गव्हाचा सु. १६%होतो).

वनस्पतीवर्णन :भात हे वर्षायू (एक हंगाम जगणारे) अथवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) गवत आहे परंतुत्याला मूलक्षोड (जमिनीत आडवे वाढणारे खोड) नसते. उंची ०.६ ते १.९ मी. असून तिला तळावून अनेक फुटवे निघतात व ते वाढून तिला झुबकेदारपणा येतो. प्रकाराप्रमाणे फुटवे कमीजास्त येतात. पाने अरुंद पट्टीसारखी लांबट (३०-५० ×१.२-२.५ सेंमी.) व एकाआड एक असतात. ती काहीशी लोमश (केसाळ) असून त्यांच्या कडांवर काटेरी केस असतात. पुष्पबंध (फुलोरा) खोडावर अग्रस्थ (टोकाला) असलेलापरिमंजरी प्रकारचा असतो. कणिशके (फुलोऱ्यातील एकेक) सर्वसाधारणरणे एकएकटी परंतु काही वेळा दोन ते साताच्या झुबक्यात असतात. कणिशकांची संख्या ५०-६० पासून २०० ते ३०० पर्यत असते व ज्या वेळी संख्या जास्त असते त्या वेळी ती बहुधा लहान आकारमानाची व गर्दी करून असतात. प्रत्येक कणिशकात दोन लहान व दोन मोठी बाह्यतुषे, एक परितुष, एक अंतस्तुष व दोन लघुतुषे यांनी वेढलेले एक पूर्ण फूल येते. त्यात फक्त सहा केसरदले, एक किंजपुट, आखूड किंजल व दोन केसाळ किंजल्क असतात [⟶फूल]. बहुधा स्वपरागण परंतु वाऱ्याच्या साहाय्याने क्वचित परपरागण घडून येते [⟶परागण]. फळ सस्यफल (ज्यातील फलावरण व बीजावरण परस्परांना चिकटलेली असतात असे फळ), शुष्क, एकबीजी व न तडकणारे असते त्यावरील परितुषावर कमीअधिक लांबीचा राठ केस (प्रशूक) असतो [⟶ग्रॅमिनेलीझग्रॅमिनी]. फळ (दाणा अथवा साळ) ५ ते १४.५ मिमी. लांब व १.९ ते ३.९ मिमी. रुंद असते. लांबी व रुंदी यांच्या गुणोत्तरानुसार दाण्याच्या आकार व आकारमान ही ठरविली जातात. दाणा दोन्ही टोकांस तीक्ष्ण व मधे फुगीर असतो. रंगाने तो पिवळट, तपकिरी, लाल किंवा काळा असतो. दाणाच्या आतील सर्व भाग बीजाने (तांदळाने) व्यापलेला असतो. तांदूळ सर्वसाधारपणे पांढरा, क्वचित लाल, जांभळा अथवा तपकिरी रंगाचा असतो. ( ‘ग्रॅमिनी’या नोंदीतील आकृती पहावी).


ओरिझा वंशातील जाती व उपजाती :ग्रॅमिनी कुलातील ओरिझा वंशातील एकूण २० ज्ञात जातींपैकी सटायव्हा जातीत भाताच्या वनस्पतीचा समावेश केला जातो. याच वंशातील पेरेनिस ही जाती जगभर जंगली अवस्थेत आढळते या बहुवर्षायु जातीपासूनच लागवडीतील जाती, उपजाती व प्रकार उगम पावले असावे, असे मानण्यात येते. ओरिझा  सटायव्हा ही जाती जगभर लागवडीत असून भाताच्या लागवडीखालील जवळजवळ सर्व क्षेत्र या जातीचे आहे. ओ. ग्लॅबेरिमा ही जाती फक्त आफ्रिकेत थोड्या प्रमाणावर लागवडीत आहे. इतर सर्व जाती जंगली आहे. ओरिझा वंशातील निरनिराळ्या जातींतील वंध्यत्वाचा विचार करुन ओ. सटायव्हा जातीच्या दोन उपजाती (इंडिका व जॅपोनिका) प्रथम मान्यताप्राप्त झाल्या. इंडिका ही उपाजती उष्ण कटिबंधात लागवडीत असून जॅपोनिका ही ३० उ. व ३० द. अक्षांशांच्या पलीकडील उपोष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत पिकवितात. जॅपोनिका उपजातीतील प्रकारांच्या तांदळाचा भात चिकट होतो व इंडिकाच्या प्रकारांचा मोकळा होतो. चीनमध्ये दोन्ही उपजातींची लागवड करतात. इंडिका व जॅपोनिका उपजातींतील प्रकारांच्या गुणधर्माच्या मधले गुणधर्म असलेली जावानिका ही तिसरी उपजाती अलीकडे शास्त्रज्ञांनी मान्य केली आहे. या उपजातीचे प्रकार मुख्यत्वेकरुन इंडोनेशियात लागवडीत आहेत. प्रकारांची विविधता इंडिकात अधिक, जॅपोनिकात कमी आणि जावानिकात त्याहीपेक्षा कमी आहे. सर्वसाधारणपणे इंडिका उपजातीतील प्रकारांची उगवण मंद गतीने होते, दाणे रुंदीपेक्षा लांबीला जास्त असतात, पेरणीपासून पीक तयार होण्यास जास्त दिवस लागतात व खोड कमजोर असते. जॅपोनिका उपजातीतील प्रकारांचे गुणधर्म या उलट असतात. जावानिका उपजातीतील प्रकारांची झाडे उंच, जाड खोडाची व फुटवे फार कमी येणारी असतात. लोंब्या (परिमंजरी) लांब असून कणिशकांवर कुसळे असतात व दाणा भरड असतो. उत्पन्नही कमी येते. इंडिकाचे प्रकार मॉन्सून वाऱ्यामुळे पडणाऱ्या पावसाच्या प्रदेशात लागवडीस योग्य आहेत. जॅपोनिका उपजातीला समशीतोष्ण कटिबंधातील व जापानिकाला विषुववृत्तीय प्रदेशातील हवामान मानवते.

 

मूलस्थान :भात हे तृणधान्य मूळचे आग्नेय आशियातील असावे असे मानतात. दक्षिण भारतातील उष्ण कटिबंधीय प्रदेशात भाताची (ओरिझा सटायव्हा) उत्पत्ती होऊन नंतर त्याचा पूर्वेकडे चीनमध्ये व पश्चिमेकडे इराण व ईजिप्तमध्ये प्रवेश झाला असावा. कारण तेथील भौगोलिक परिस्थिती (दलदलीचे प्रदेश, डोंगराळ प्रदेश व अधून मधून येणारे मोठे पूर) भाताच्या वाढीस अनुकूल आहे. शिवाय भारतात भाताच्या जंगली जाती पुष्कळ आहेत आणि जंगली जाती व लागवडीतील जाती यांच्या मधले प्रकार (मध्यस्थ) पुष्कळ आहेत. भारतातील भाताचे लागवडीतील प्रकार (सु. ६,०००) जगातील कोणत्याही देशातील प्रकारांपेक्षा संख्येने अधिक आहेत. फिलिपीन्समधील इंटरनॅशनल राइस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ३०,००० प्रकार जमविण्यात आलेले आहेत. तथापि त्यांपैकी फारच थोडे मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली आहेत.

 

 उत्परिवर्तन (आनुवंशिक लक्षणांमध्ये अकस्मात घडून येणारे बदल) व प्रकारांतील विविधता घडून येण्यास आणि नवीन प्रकार उद्‍भवण्यास आवश्यक ती बाह्य परिस्थिती आग्नेय आशियात (भारतात अथवा इंडोचायनात) असून तेथे फार प्राचीन काळापासून शेती आढळून येते.

 

भातासंबंधी जगातील सर्वांत प्राचीन पुरावा इ. स. पू. ३५०० च्या सुमाराचा असून नान नोक था (थायलंड) येथील उत्खननात त्या काळातील मातीच्या भांड्यांच्या तुकड्यांवर भाताच्या तुसांचे ठसे सापडले आहेत. तसेच सिंधू नदीच्या खोऱ्यातील हडप्पा व मोहें-जो-दडो येथील संस्कृतीच्या (इ. स. पू. सु. २३००) दक्षिणेकडील विस्तारातील लोथल (गुजरात) येथील उत्खननात भाताच्या टरफलाचे अवशेष व दाण्यांचे चिखलावरील ठसे आढळून आले आहेत. हस्तिनापुरातील उत्खननात (इ. स. पू. सु. १००० – ८००) कार्बनीभूत भाताचे दाणे व टरफले आढळून आली आहेत.

 

भारतीय वैदिक वाड्मयात (इ. स. पू. २५०० – ५००) यज्ञांच्या संदर्भात तांदळाचे उपयोग, भाताचे प्रकार (लवकर व उशीरा येणारे) यांचे उल्लेख असून शेतीच्या प्रक्रियेचे वर्णन आहे. महाभारत (इ. स. पू. सु. ३००), चरकसंहिता (इ. स. सु. दुसरे शतक), सुश्रुतसंहिता (काळ अनिश्चित) या ग्रंथात तांदळाच्या काही प्रकारांचे वर्णन दिलेले आहे.

 

बाह्य परिस्थिती, उत्खननातील पुरावे व प्राचीन वाङमयातील उल्लेख यांवरुन भारतातील भाताची लागवड फार पुरातन आहे, हे सिध्द होते आणि आग्नेय आशियात व विशेषतः द. भारतात भाताची उत्पत्ती झाली असावी, असे अनुमान काढल्यास ते चुकीचे ठरु नये. तथापि भाताच्या लागवडीतील जातींच्या उत्पत्तिस्थानाबद्दल शास्त्रज्ञांत एकमत नाही.


क्षेत्र व उत्पादन :जग : भात हे उष्ण कटिबंधातील पीक आहे, असे सर्वसाधारणपणे मानले जाते परंतु सध्या ते अंटार्क्टिका वगळता इतर सर्व खंडांत लागवडीत आहे.जगातील लगावडीखालील तृणधान्यांत गव्हानंतर भाताच्या पिकाचे क्षेत्र आहे. १९७८ च्या आकडेवारीप्रमाणे जगातील भाताचे एकूण क्षेत्र १४.५१ कोटी हेक्टर होते. त्यापैकी सु. ९० % क्षेत्र आशिया खंडात असून चीन व भारत या दोन देशांत मिळून ते ४८%होते. जगात भाताचे सर्वांत जास्त क्षेत्र (२५%) भारतात व त्याखालोखाल ते चीनमध्ये (२३%) होते. क्षेत्राच्या बाबतीत जरी भारताचा प्रथम क्रमांक असली, तरी हेक्टरी उत्पादनात त्याचा क्रमांक बराच खाली आहे. चीनमध्ये ९९% भाताचे क्षेत्र सिंचाई खाली आहे, तर भारतात ते फक्त ३०% आहे. भात पिकविणाऱ्या प्रमुख देशांतील १९७८ मधील भाताचे क्षेत्र व उत्पादन कोष्टक क्र.१ मध्ये दिले आहे.

 

कोष्टक क्र. १. जगातील भात पिकविणाऱ्याप्रमुख देशांतील भाताचे क्षेत्र व उत्पादन(१९७८). 

       

देशउत्पादन 

क्षेत्र(हजारहेक्टर) 

उत्पादन(हजार टन) 

हेक्टरी(किग्रॅ.) 

इंडोनेशिया 

८,८१२ 

२५,७३९ 

२,९२१ 

चीन 

३७,२९० 

१,३०,४७२ 

३,५३४ 

जपान 

२,५४० 

१६,००० 

६,२५० 

थायलंड 

८,२८८ 

१७,००० 

२,०५१ 

फिलिपीन्स 

३,७५८ 

६,९०७ 

१,८३८ 

बांगला देश 

१०,००० 

१८,८९८ 

१,८९० 

ब्रह्मदेश 

५,२०० 

१०,५०० 

२,०१९ 

ब्राझील 

५,५५२ 

७,२४२ 

१,३०४ 

भारत 

४०,००० 

७९,०१० 

१,९७५ 

व्हिएटनाम 

४,८८९ 

९,८८० 

२,०२१ 

एकूण जागतिक 

१,४५,१३०  

३,७६,४४८ 

२,५९४ 

भारत : भारतात इतर कोणत्याही पिकापेक्षा भाताखाली जास्त क्षेत्र आहे. १९७९-८० साली भारतात भाताखाली ३८९.८ लक्ष हेक्टर क्षेत्र होते व ते लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या सु.२६ %, तृणधान्याखालील क्षेत्राच्या ३८ % व एकूण अन्नधान्याखालील क्षेत्राच्या सु ३१ % होते. त्या वर्षी तांदळाचे एकूण उत्पादन ४२१.९ लक्ष टन होते व ते एकूण तृणधान्याच्या उत्पादनाच्या ४२ % व एकूण अन्नधान्याच्या उत्पादनाच्या ३९ % होते. त्या आधीच्या म्हणजे १९७८- ७९ वर्षातील भारतातील भात पिकविणाऱ्या प्रमुख राज्यांतील भाताचे क्षेत्र व उत्पादन कोष्टक क्र. २ मध्ये दिले आहे.

कोष्टक क्र. २ भारतातील भात पिकविणाऱ्याप्रमुख राज्यांतील भाताचे क्षेत्र व उत्पादन (१९७८ – ७९). 

राज्य 

क्षेत्र 

(हजार हेक्टर) 

उत्पादन 

(हजार टन तांदूळ 

हेक्टरी उत्पादन 

(किग्रँ. तांदूळ) 

आंध्र प्रदेश 

३,९२३ 

७,३०१ 

१,८६० 

आसाम 

२,२४१ 

२,१७२ 

९७० 

ओरिसा 

४,३७२ 

४,४०२ 

१,००७ 

उत्तर प्रदेश 

५,०९८ 

५,८९६ 

१,१६४ 

कर्नाटक 

१,१४६ 

२,३०३ 

२,००९ 

केरळ 

८०७ 

१,२४१ 

१,५३७ 

गुजरात 

४५९ 

५३५ 

१,१६५ 

तमिळनाडू 

२,७१३ 

६,१०७ 

२,२१२ 

पंजाब 

१,०५३ 

३,०७३ 

२,९१८ 

प. बंगाल 

४,६३२ 

६,२९५ 

१,३६० 

बिहार 

५,५८६ 

५,५०९ 

९८७ 

मध्य प्रदेश 

४,७२९ 

३,४८२ 

७३६ 

महाराष्ट्र 

१,४९८ 

२,२०१ 

१,४७६ 

हरियाणा 

४६३ 

१,२४१ 

२,६८० 

एकूण भारत 

४०,१९६ 

५३,८२९ 

१,३१४ 

भारतात १९५० – ५१ साली भाताचे क्षेत्र ३०८.१ लक्ष हेक्टर आणि उत्पादन २०५.७६ लक्ष टन (तांदूळ) होते. ते वाढत वाढत १९७८ – ७९ साली ४०२ लक्ष हेक्टर क्षेत्र आणि ५३८.३० लक्ष टन उत्पादन झाले. भाताच्या क्षेत्रात वाढ, पाणीपुरवठा असलेल्या क्षेत्रात भाताची वर्षातून दोन पिके घेण्याकडे वाढता कल, जास्त उत्पन्न देणाऱ्या प्रकारांची लागवड, खतांचा वाढत्या प्रमाणावर वापर, पाणीपुरवठ्याची वाढती उपलब्धता, पीक संरक्षण या सर्व कारणांमुळे २८ वर्षात एकूण उत्पादनात सु. २.६ पट वाढ झाली.


महाराष्ट्र :कोष्टक क्र.२ वरुन दिसून येईल की, देशातील भाताचे क्षेत्र व उत्पादन यांच्याशी तुलना करता महाराष्ट्रात ३.७% क्षेत्र आणि ४.८८% उत्पादन असून हेक्टरी तांदळाचे उत्पादन १,४७६ किग्रॅ. आहे. तपशीलवार उपलब्ध असलेल्या १९७५ – ७६ च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात त्या वर्षी भाताखाली १४.१६ लक्ष हेक्टर क्षेत्र होते व २२. ८६ लक्ष टन तांदळाचे उत्पादन झाले. राज्यातील सर्व जिल्ह्यात कमी – जास्त प्रमाणात भाताचे उत्पादन होते. क्षेत्र आणि उत्पादन यांच्या दृष्टीने भंडारा, चंद्रपूर (चंद्रपूर व गडचिरोली), ठाणे, रायगड (कुलाबा), रत्नागिरी (रत्नागिरी व सिंधुदुर्ग) आणि कोल्हापूर हे सहा जिल्हे महत्त्वाचे आहेत. या सहा जिल्ह्यांत त्या वर्षी क्षेत्र (हजार हेक्टर) व तांदळाचे उत्पादन (हजार टन) पुढील प्रमाणे होते : भंडारा २३८.२ व ४४८.८, चंद्रपूर २५१.२ व ४१८.०, ठाणे १४०.३ व २८५.८, रायगड १४०.१ व २३५.८, रत्नागिरी १४७.८ व २३२.१, कोल्हापूर ८५.८ व १७२.२. राज्यातील तांदळाच्या एकूण उत्पादनापैकी ७८.४ % उत्पादन वरील सहा जिल्ह्यांत झाले. इतर जिल्ह्यांपैकी पुणे,नासिक, नागपुर,उस्मानाबादपरभणी, नांदेड, सांगली व सातारा हे उत्पादनाच्या उतरत्या क्रमाने भात पिकविणारे महत्त्वाचे जिल्हे असून त्यात ४% पासून १% पर्यंत उत्पादन झाले.वर उल्लेख केलेल्या सहा महत्त्वाच्या जिल्हांतहेक्टरी उत्पादन (किग्रॅ) पुढीलप्रमाणे होते : भंडारा १,८८४, चंद्रपूर १,६६४, ठाणे २,०२८, रयागड १,६८३, रत्नागिरी १,५७०, कोल्हापूर २,००६.

 

प्रकार :जगात भाताचे तीस हजारांपेक्षा जास्त प्रकार आहेत. एकट्या भारतात ५,००० ते ६,००० प्रकार आहेत, असे मानण्यात येते. भारतात लागवडीत असलेले बहुसंख्य प्रकार ओरिझा सटयव्हा जातीच्या इंडिका उपजातीत मोडतात. या उपजातीत मुख्यत्वेकरुन लांब दाण्याचे प्रकार असतात परंतु मध्यम लांब व आखूड दाण्याचे प्रकारही त्यात आहेत. या सर्व प्रकारांत आकारवैज्ञानिक (संरचना व आकार यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या दृष्टीने असलेले) व शरीरक्रियावैज्ञानिक गुणधर्मांचे भेद मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. पेरणीपासून कापणीपर्यंत लागणाऱ्या कालावरुन भारतातील भाताच्या लागवडीतील प्रकारांचे चार गट करण्यात आले आहेत : (१) अतिहळवे : ११० अगर त्यापेक्षा कमी दिवस, (२) हळवे : ११० ते १४० दिवस, (३) गरवे : १५० ते १७० दिवस आणि (४) अतिगरवे : १८० अथवा जास्त दिवस. हे वर्गीकरण सापेक्ष असून देशाच्या सर्वच भागांत ते जसेच्या तसे लागू होणार नाही. निरनिराळ्या प्रकारांत पेरणीपासून कापणीपर्यंतचा काळ ६० पासून २०० दिवसांचा असतो. गट क्र. २ व ३ हे फार महत्त्वाचे आहेत. गट क्र.४ मधील प्रकार खोल पाण्यात वाढणारे असल्यामुळे तो फारसा महत्त्वाचा नाही. मर्यादित अथवा अनिश्चित पाण्याच्या उपलब्धतेमुळे लवकर तयार होणाऱ्या (हळव्या) भाताच्या प्रकारांना भारतात विशेष महत्त्व आहे. वर्षांतून भाताची एकापेक्षा जास्त पिके पिकविणाऱ्या प्रदेशांसाठीही असे प्रकार उपयुक्त असतात.

आ. २. भाताच्या दाण्याचे आकारमान : (१) लांब. (२) मध्यम लांब, (३) बुटका,

वर्षातील निरनिराळ्या हंगामांत लावण्यासाठी योग्य असे प्रकार उपलब्ध असून वर्षात देशाच्या कोणत्या ना कोणत्या तरी भागात भाताचे पीक लागवडीखाली असतेच. एका टोकाला कमी पावसाच्या अथवा पाणी देण्याच्या सोयी उपलब्ध नसलेल्या भागात लागवडीयोग्य असे प्रकार आहेत, तर दुसऱ्या या टोकाला आसाम आणि पं. बंगालमध्ये ३ ते ५मी. खोल पाण्यात वाढणारे प्रकार आहेत. लवणांचे प्रमाण कमीजास्त असलेल्या निरनिराळ्या जमिनींत लागवडीस योग्य असे प्रकार आढळून येतात. समुद्रसपाटी अथवा समुद्रपाटीच्या खाली १ते ३ मी. खोलीवरील (केरळ राज्य) भागापासून १.३०० ते १,७०० मी.पर्यंतच्या निरनिराळ्या उंचीवरं आणि तापमानांत वाढणारे प्रकार आहेत. भाताच्या वनस्पतीच्या निरनिराळ्या भागांवरील रंगद्रव्य, झाडाची उंची (०.७५ पासून ६ मी.पर्यंत), लांबीचे आकारमान, दाण्याचे आकारमान, रंग, तांदळाचा रंग व वास या बाबतींत निरनिराळ्या भाताच्या प्रकारांत भिन्नता आढळून येते.स्थानिक प्रकारांबरोबर संशोधनातून निर्माण होणारे प्रकार वाढत्या संख्येने लागवडीत येत आहेत. स्थानिक सुधारित प्रकारांपैकी फारच थोडया प्रकारांना विशेष महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे आणि त्यात महाराष्ट्रातील कोळंबा या प्रकारच्या निवड पद्धतीने निर्माण केलेल्या सुधारित वाणांचा समावेश होतो. तामिळनाडूतील जीईबी-२ हा सुधारित प्रकार त्या राज्याखेरीज भारतात मोठया प्रमाणावर लागवडीत आहे व भारताबाहेरही (विशेषेकरून प. आफ्रिकेत व बांगला देशात) त्याचा प्रसार झाला आहे.


 महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केलेले सुधारित प्रकार: भारतात भाताचे सुधारित प्रकार निर्माण करण्याचे काम अनेक वर्षे चालू आहे. महाराष्ट्रात स्थानिक व्यापारी प्रकारांतून निवड पद्धतीने अनेक सुधारित वाण लागवडीसाठी देण्यात आले आणि अनेक वर्षे ते लागवडीत आहेत परंतु स्थानिक प्रकारांत पुढील उणिवा प्रामुख्याने दिसून येतात: ते उंच वाढतात, जास्त खत दिल्यास ते लोळतात आणि त्यामुळे उत्त्पन्नात घट येते. खताची (विशेषतः नायट्रोजनची) मात्रा जास्त प्रमाणात दिल्यास त्या प्रमाणात उत्त्पन्नात वाढ दिसून येत नाही. यासाठी भाताच्या अधिक उत्पादन देणाऱ्या प्रकारांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. १९६४ मध्ये तैवान (फार्मोसा) हून तायचुंग स्थानिक १ व १९६६ साली फिलीपीन्समधून आय. आर. ८ या प्रकारांची आयात करण्यात आली. हे दोन्ही प्रकार कमी उंचीचे, न लोळणारे व नायट्रोजनयुक्त खतास प्रतिसाद देणारे आहेत. देशांतील स्थानिक सुधारित प्रकारांशी वरील विदेशी प्रकारांचा संकर करून स्थानिक सुधारित प्रकारांपेक्षा दीड ते दोन पट उत्पन्न देणारे प्रकार निर्माण करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेल्या भाताच्या पूर्वी प्रसारित झालेल्या स्थानिक सुधारित प्रकारांची माहिती सारांश रूपाने खाली दिली आहे. अलीकडील काही वर्षात प्रसारित झालेल्या अधिक उत्पन्न देणाऱ्या प्रकारांची माहिती विस्ताराने कोष्टक क्र.३ मध्ये दिली आहे.

कोष्टक क्र. . महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस कलेले अधिक उत्पादन देणारे  भाताचे प्रकार 

प्रकार

पेरणीपासून तयार होण्यासाठी लागणारे दिवस

हेक्टरी उत्पादन (क्विंटल)

कोणत्या रोग व किडीला प्रतिकारक

कोणत्या रोगअप्रतिकारक(बळी  पडतो)

इतर वैशिष्टये

तायचुंग  

स्थानिक – 1

२०-१२५ 

४०-५०

रपा(साधारण)

कडा करपा, खोडकिडा, तुडतुडे 

गाद माशी व लष्करी अळी.

दाणा(तांदुळ)बुटका, पांढराव जाड 

आयआर ५  

(पंकज)

१४५-१५०

५०

कडा करपा (थोड्या प्रमाणात 

करपा, खोडकिडागाद माशी 

पाणथळजमिनीस योग्य,

दाणा पांढरा जाड, थोडा  लांबट 

आयआर ८ 

१३०-१३५

५०-५५

कडा करपा 

गाद माशी वलष्करी  अळी.

दाणा पांढरा जाड, थोडा  लांबटपीक लोळत नाही. 

जया 

१२५-१३०

५५-६०

करपा व तुडतुडे (साधारण प्रतिकारक) 

खोडकिडा, गाद माशी, कडा करपा. 

दाणा पांढरा, जाडा भरडा, लांबटपीक लोळत नाही. 

कर्जत-१८४ 

१००-११५

३०-३५

 

कडा करपा,काजळी, करपा,खोडकिडा, गादमाशी, लष्करी अळी. 

दाणा पांढरा पारदर्शक मध्यमप्रतीचा पीक

लोळत नाही. 

रत्नागिरी 

११०-११५ 

३५-४० 

काजळी, कडा, खोड- किडा, लष्करी अळी, तुडतुडे, गाद  माशी. . 

दाणा बारीक,पांढरा पारदर्शक   व लांबट. 

आयआर २०

१२५-१३०

४०-५०

खोडकिडा (अल्प प्रमाणात) 

कडा करपा.

दाणा लांबट मध्यमप्रतीचा, कठीण व पारदर्शक  

आयआर २२

१२०-१२५

४५-५०

करपा

— 

दाणा आयआर २० पेक्षा लांबट, कठीण व पारदर्शक

पद्मा

१०५-११०

४०-४५

— 

कडा करपा, करपा, खोडकिडा. 

दाणा पांढरा, आखूड व जाड.

जगन्नाथ

१४५-१५०

५०

करपा, कडा करपा, खोडकिडा व गाद माशी.

दाणा मध्यम प्रतीचा, लांबट, पांढरा.

साबरमती

११५

४०-४५

करपा (थोड्या प्रमाणात) 

कडा करपा, खोडकिडा, गाद माशी व तुडतुडे.

दाणा लांबट, साधारण वासाचा.

जमुना

११५

४०-४५

करपा

कडा करपा, खोडकिडा, तुडतुडे.

दाणा बारीक लांबट, विनवासाचा.

बाला

१००

४०-५०

कडा करपा व टिक्का (काही प्रमाणात)

— 

दाणे खडत (झडत) नाहीत.

कृष्णा

११५-१२०

४०

करपा, टिक्का, खोडकिडा.

— 

रत्ना

१०५-११०

४०-५०

करपा, कडा करपा, टिक्का, गाद माशी या सर्वांना काही प्रमाणात प्रतिकारक, खोडकिडीस प्रतिकारक.

कोष्टक क्र. ३. महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस कलेले अधिक उत्पादन देणारे  भाताचे प्रकार (पुढे चालू) 

विजया 

१३५ 

५५ 

करपा (प्रतिकारक), टिक्क, तुंग्रो व्हायरस, खोडकिडा यांना काही प्रमाणात प्रतिकारक 

— 

दाण्याची प्रत आय. आर. ८ व जयापेक्षा चांगली. 

कावेरी

१००-११०

४०-५०

खोडकिडा व तुडतुडे (काही प्रमाणात)

कडा करपा, गाद माशी

दाणा आखूड, जाडा व पांढरा.

कांची

१०५-११०

४५

तुडतुडे व गाद माशी (काही प्रमाणात).

कडा करपा, खोडकिडा

प्रकाशास असंवेदनशील, काही प्रमाणात लोळणारी दाणा पांढरा व जाड

आय.ई.टी. १९९१ (सोना)

१२५-१३०

५५-६०

कडा करपा, तंग्रो व्हायरस (काही प्रमाणात)

दाणा लांब, बारीक, पारदर्शक, शिजण्यास उत्तम, वरीलप्रमाणे.

आय.ई.टी. १०३९ (जयंती)

१३०-१३५

५५-६०

वरीलप्रमाणे

कर्जत १४-७

१३५-१४०

५०

करपा

कडा करपा

दाणा लांब, पांढरा, बारीक, पारदर्शक.

रत्नागिरी-६८-१-१

१४०-१४५

५0-५५

करपा, कडा करपा

दाणा लांब, जाड व पांढरा,

रत्नागिरी-७११-४-१

१२०

४0-४५

दाणा, पांढरा, बारीक, लांब व  पारदर्शक.

आर. पी. ४-१४

१३०-१३५

५०

बारीक तांदूळ. उन्हाळी हंगामात १२५ दिवसांत येतो.

पुसा-३३

१०५-११०

४०-४५

सुवासिक, मध्यम जाड तांदूळ.

कर्जत-३५-३

९०

३०

करपा

कडा करपा

दाणा बारीक लांबट, पांढरा व पारदर्शक वरकस जमिनीसाठी योग्य.

राधानगरी १८५-२

१०५-११०

३०-३५

करपा, कडा करपा, खोडकिडा, तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी

दाणा जाड व पांढरा. मुरमुरे आणि पोह्यासाठी उपयुक्त.

कर्जत-७-३-११-२ (आय.आर.८´कोळंबा-४२)

१४५-१५०

४५-५०

करपा

कडा करपा (साधारण प्रमाणात).

                                                                           खार जमिनीसाठी शिफारस केलेले प्रकार

एम. के. ४७-२२ 

१२५ 

२८ 

— 

कडा करपा 

दाणा जाड व पांढरा १५८ सेंमी. उंच वाढणारा व लोळणारा प्रकार. 

एस. आर. ३-९

१२५

२८

कडा करपा

दाणा बारीक, पांढरा व तेलकट उंच वाढणारा व लोळणारा प्रकार.

दामोदर

१४०

४०

कडा करपा (काही प्रमाणात)

दाणा जाड व पांढरा न लोळणारा प्रकार.

स्थानिक सुधारित प्रकार:(१)कोकण विभाग: कोळंबा ४२, कोळंबा ५४०, झिनिया ३१, झिनिया १४९, हळवी कोळपी ७०, कडा ६८-१, भडस १३०३ आणि एम्. के. ४७-२२. कोळंबा आणि झिनिया प्रकारांची लागवड भारी जमिनीत केली जाते. तांदूळ बारीक व सतेज असून १२५ ते १५० दिवसांत हे प्रकार तयार होतात. हेक्टरी उत्पन्न ३० ते ३५ क्विंटल मिळते. भडस १३०३ हा जाड व पांढऱ्या दाण्याचा भारी जमिनीत लागवडीस योग्य असा प्रकार आहे. हळवी कोळपी हा हलक्या जमिनिसाठी व उन्हाळी पिकासाठी उपयुक्त असून ११० ते ११५ दिवसांत तयार होतो. एम्. के. ४७-२२ हा प्रकार खाऱ्या जमिनीत लावला जातो. तांदूळ पांढरा व जाड असतो.


(२) मावळ व दक्षिण सिंचाई विभाग:आंबेमोहर १०२,१५७ व १५९, बासमती ३७०, कृष्णसाळ, चिमणसाळ ३९, कमोद २५३ व दोडगा ६२७. आंबेमोहोर, बासमती व कृष्णसाळ हे प्रकार सुवासिक तांदळाचे असून पुणे व सातारा या जिल्ह्यांच्या मावळ भागात अथवा दक्षिण सिंचाई विभागात त्यांची लागवड करतात. हेक्टरी उत्पादन १५ ते ३० क्विंटल मिळते. आंबेमोहोर १५७ व १५९ हे विशेष नावाजलेले प्रकार आहेत. कमोद २५३ हाही नावाजलेला प्रकार नासिक व अहमदनगर या जिल्ह्यांच्या मावळ भागात लागवडीत आहे. दाणा पांढरा, बुटका व सुवासिक असतो. तयार होण्यास १४० ते १४५ दिवस लागतात व हेक्टरी उत्पादन १५ ते २० क्विंटल मिळते.

 

(३) मराठवाडा विभाग: एच्. आर. १९ व २२ आणि तुळजापूर-१ हे प्रकार पेर भात पद्धतीसाठी योग्य आहेत. तुळजापूर-१ हा प्रकार फक्त ११२ ते ११५ दिवसांत तयार होतो व हेक्टरी उत्पादन १२ क्विंटल मिळते.

 (४) विदर्भ विभाग:ई. बी. २७, आर.८ (लुचई), आर.(सुल्टुगुरूमुटिया), आर. १५ (चिनोर), आर. १२ (बानसपत्री) व भोंदू परेवा ११६, ई. बी. २७ हा प्रकार कोरडवाहू शेतीसाठी योग्य असून ९५ ते १०० दिवसांत तयार होतो व उत्पादन हेक्टरी १२-१५ क्विंटल मिळते. आर. ८ हा प्रकार चांदा व भंडारा या जिल्ह्यांत भारी जमिनीत लागवडीत आहे तयार होण्यास १५५ ते १६० दिवस लागतात व उत्पादन १८ ते २० क्विंटल येते. दाणा मध्यम बारीक पांढरा. आर. ३ हा पावसाच्या पाण्यावर येणारा मध्यम जाड दाण्याचा, १२५ ते १३० दिवसांत तयार होणारा प्रकार असून त्याचे उत्पादन १८ ते २० क्विंटल येते. आर. १५ (चिनोर) व आर. १२ (बानसपत्री) हे बारीक सुवासिक तांदळाचे प्रकार चांदा व भंडारा या जिल्ह्यांत लागवडीत आहेत. आर. १५ चे हेक्टरी उत्पादन १८ ते २० क्विंटल आर. १२ चे २० ते २५ क्विंटल मिळते. तयार होण्यास १३५ ते १५० दिवस लागतात. भोंदू परेवा हा बागायतीखाली सर्व प्रकारच्या जमिनीत लागवडीस योग्य असून १४५ दिवसांत तयार होतो. त्याचे हेक्टरी उत्पादन २५ ते ३० क्विंटल येते.

 

हवामान:भाताचे पीक हे मुख्यतः उष्ण व दमट हवामानातील पीक आहे परंतु ते दक्षिणेस ४० अक्षांशापासून (ऑस्ट्रेलिया) उत्तरेस ५० अक्षांशापर्यंत (चीन) आणि केरळ राज्यातील कुट्टेनाड प्रदेशात समुद्रसपाटीखालील भागापासून सु.२,००० मी. उंचीपर्यंत (जम्मू व काश्मीरचा भाग) पिकवितात. मात्र जगातील भाताचे बहुतेक पीक विषुवृत्तापासून ४० उ. अक्षांशापर्यंत आणि ७० ते १४० पू. रेखांशाच्या पट्टयामध्ये आहे. भारतात हे पीक८ पासून ३५उ.अंक्षांशांपर्यंत लागवडीत आहे. हे पीक विविध प्रकारच्या हवामानात होत असले, तरी ते वाढत असताना सरासरी तापमान २५ ते ३५ सें. असणे आवश्यक असते. २५ से. खाली तापमान असलेल्या प्रदेशात हे पीक क्वचितच चांगले येते. तसेच ८०% च्या वर हवेतील आर्द्रता या पिकाला पोषक ठरते. भातशेतीस लागणारे पाणी पावसापासून अथवा नद्यांच्या व तलावांच्या कालव्यांमधून मिळते. विभागून पडणारा १,५०० मिमी. पाऊस या पिकाला पुरेसा होतो. याहीपेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात हे पीक घेतात परंतु बहुतांशी ते शेताच्या खोल भागात जेथे पावसाचे पाणी साठते अशा जागी अथवा पाणी देण्याची सोय असेल अशा जागी घेतात. भारतातील भाताच्या फक्त सु. २५% क्षेत्राला खात्रीचा पुरवठा होतो. आसाम, प. बंगाल, दक्षिण बिहार आणि ओरिसा या जास्त पावसाच्या प्रदेशात लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी सु. ८०% क्षेत्र भाताचे असते. जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे पावसाचे प्रमाण कमी होते आणि भाताचे क्षेत्र एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३० ते ४०% असते आणि ते आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या समुद्र किनाऱ्याच्या पट्टीत विशेषकरून आढळून येते. मध्य व उत्तर भारतात भाताचे पीक पाऊस अनुकूल असलेल्या भागातच होते.


हंगाम:या पिकाचे औस, अमन आणि बोरो असे प्रमुख तीन हंगाम असून महाराष्ट्रातील काही भागात उन्हाळी हंगामात भाताचे पीक घेतात. औस हंगाम १०० ते ११० दिवसांचा असतो वपीक मे-जूनमध्ये पेरून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कापतात. अमन हंगाम १४० पासून १८० दिवसांचा असून पेरणी जून-जुलैमध्ये व कापणी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करतात. भारतातील भाताच्या पिकाचा हा मुख्य हंगाम आहे. बोरो हंगाम १०० ते ११० दिवसांचा असून पीकनोव्हेंबर-डिसेंबर अथवा पीक डिसेंबरमध्ये करतात. भारतातील भाताच्या पिकाचा हा मुख्य हंगाम आहे. बोरो हंगाम १०० ते ११० दिवसांचा असून पीक नोव्हेंबर-डिसेंबर अथवा डिसेंबर-जानेवारीत पेरून मार्च-एप्रिलमध्ये कापतात. महाराष्ट्रात ठाणे, रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर व भंडारा या जिल्ह्यात ओढयाच्या अथवा कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी हंगामात मुख्य पिकानंतर दुसऱ्या भाताचे पीक घेतात व त्याला ‘वायंगण’असेही नाव आहे. पेरणी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करून कापणी प्रकाराप्रमाणे १००-१३५ दिवसांत करतात. भारतातील विस्तृत प्रमाणातील क्षेत्रात दरवर्षी ५-६ महिन्यांत तयार होणारे भाताचे फक्त एकच पीक घेतात व त्यानंतर जमीन पड राहते. जेथे पाणी देण्याची सोय असते तेथे त्याच जमिनीत वर्षातून दोन अगर तीन पिके घेतात आणि त्यातील एक हळवे व दुसरे मध्यम गरवे असते. आसाम, प. बंगाल, बिहार बिहार, ओरिसा, तमिळनाडू व केरळ या राज्यांत वर्षातून तीन, आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांतदोन आणि मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब व जम्मू-काशमीर याराज्यांत एक याप्रमाणे पिके येतात परंतु गरवे प्रकार मात्र ठराविक हंगामात घेतात.

आसामच्या सपाट प्रदेशात भाताच्या औस (कोरवाहू) आणि अमन (शेतातील पाण्याची पातळी वाढेल त्याप्रमाणे उंच वाढणारा)अशा दोन प्रकारांचे बी एकत्र मिसळून फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान पेरतात. औस पीक जून अथवा जुलैमध्ये पुराचे पाणी शेतात पसरण्यापूर्वी कापणीस येते. अमन पीक पुराचे पाणी ओसरल्यावर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कापणीस येते. सरासरी पर्जन्याच्या वर्षात दोन्ही पिकांचे उत्पन्न मिळते.जास्त पावसामुळे पुराचे पाणी शेतात नेहमीपेक्षा लवकर पसरते त्यावर्षी औस पीक नाश पावते परंतु अमनचे पीक मात्र भरपूर मिळते. सरीसरीपेक्षा कमी पावसामध्ये अमन पीक फार कमी मिळते परंतुअशा वेळी औस पिकामुळे शेतकऱ्याला भाताचे काही उत्पन्न मिळते.

जमीन: भाताचे पीक निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत येते. मात्र जमिनीच्या प्रकाराप्रमाणे भाताचे प्रकार लावण्यात येतात. काही प्रकार चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत चांगले वाढतात, तर काही प्रकार प. बंगाल व ओरिसातील दलदलीच्या प्रदेशात वाढतात. ५.५ पासून ८ पर्यंत pH मूल्य [⟶पीएच मूल्य] असलेली जमीन सर्वसाधारणपणे भाताच्या पिकाला चांगली समजली जाते परंतु केरळमध्ये pH मूल्य ३ असलेल्या अम्लधर्मीय ‘कारी’ जमिनीत आणि पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशात pH मूल्य १० पर्यंत असलेल्या क्षारधर्मी (अल्कलाइन) जमिनीत भाताची लागवड करतात.

 

भारतातील भाताच्या जमिनीचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:(१) गाळाच्या जमिनी, (२) जांभा दगडापासून बनलेल्या जमिनी, (३) क्षारधर्मी जमिनी आणि (४) काळ्या जमिनी. जेथे पाणी देण्याची सोय असेल तेथे तांबडया जमिनीतही भाताचे पीक घेतात. भाताचे सर्वांत जास्त क्षेत्र गाळाच्या जमिनीत आहे. कोणत्या प्रकारच्या जमिनीत भाताचे पीक किफायतशीरपणे घेता येईल हे ठरविताना पाणीपुरवठा ही सर्वांत महत्त्वाची बाब विचारात घेणे आवश्यक असते.


फेरपालट:भारतातील बहुतेक राज्यांत भातानंतर भाताचेच पीक घेण्यात येते. जेथे पाणीपुरवठयाची सोय चांगली असते अशा काहीभागात एकाच शेतात दोन अगर तीन भाताची पिके घेण्यात येतात. पाण्याची सोय चांगली असलेल्या व शेतातील पाण्याच्या निचऱ्याची सोय असलेल्या काही भागांत ऊस, हळद, केळी यांसारखी नगदी पिके भाताबरोबर फेरपालटात तीन-चार वर्षांनी घेतात. भाताचे पीक काढून घेतल्यावर हरभरा, वाल, वाटाणा, मसूर, मूग, उडीद व कुळीथ यांसारख्या डाळींच्या वर्गातील एखादे पीक घेणे हा सर्वसाधारण प्रघात आहे. बरसीम, बटाटा, भाजीपाला, ताग, नागली, कापूस ही पिके देशाच्या काही भागात भाताबरोबर फेरपालट घेतात. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतातच फेरपालट पद्धतीचा अवलंब करतात. लावणी पद्धतीत भात कापल्यावर शेत रिकामेच असते. भाताला कोणतेच खत देत नाहीत अशा शेतात भातानंतर जमिन पड ठेवल्यामुळे उत्पन्न कमी मिळाले, तरी उत्पादनात खंड पडत नाही.

बांध बंदिस्ती:भात खाचरे समपातळीत ठेवून भाताचे पीक वाढत असताना त्यात २ ते ५ सेंमी. पाणी खेळते ठेवणे आवश्यक असते. यासाठी खाचराला चारही बाजूंनी बांध घालून आतील जमीन समपातळीत आणतात. किनाऱ्यालगतच्या खाऱ्या जमिनीमध्ये खाडीतील खारे पाणी खाचरात येऊ नये यासाठी संरक्षक बांध घालावे लागतात.

पूर्व-मशागत: भाताच्या बहुतेक जमिनी मॉन्सूनचा पहिला पाऊस झाल्यावर हलक्या नांगराने नांगरतात आणि कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करतात. नंतर त्यात शेणखत अथवा कंपोस्ट मिसळतात. ओलावा धरून ठेवणाऱ्या जमिनी भाताचे पीक काढल्यावर नांगरून त्यांत वाल, मसूर, वाटाणा, हरभरा वगैरे पिके घेतात. भारी चिकण-मातीच्या जमिनी उन्हाळ्यात नांगरल्याने उत्पन्नात घट येते असे आढळून आले आहे. अशा जमिनीत प्रथम पाणी सोडून चिखलणी करतात.

लागवडीच्या पद्धती:जमिनीची प्रत, भाताचा प्रकार, हंगाम, वार्षिक पर्जन्यमान व त्याची विभागणी, पाणी देण्याची सोय वगैरे गोष्टींवर भाताच्या लागवडीची पद्धत आधारलेली असते. भारतात परिस्थितीप्रमाणे निरनिराळ्या लागवडीच्या पद्धती प्रचलित आहेत. त्यांची दोन प्रमुख गटांत विभागणी करता येते: (१) पेरणी पद्धत व (२) लावणी पद्धत अथवा स्थलांतर पद्धत. या दोन्ही पद्धतींत स्थानिक परिस्थितीप्रमाणे फेरफार केलेल्या लागवडीच्या पद्धतीही भारताच्या निरनिराळ्या भागांत प्रचलित आहेत. लावणी पद्धतीचा वापर भारतात विस्तृत प्रमाणावर केला जातो. पेरणी पद्धत कमी महत्त्वाची असून त्या पद्धतीत उत्पन्नही कमी मिळते.

 

पेरणी पद्धत:डोंगरमाथ्यावर अथवा डोंगराच्या उतरणीला असलेल्या अथवा पाणीपुरवठयाची सोय नसलेल्या आणि मध्यम पर्जन्यमानाच्या प्रदेशात ही पद्धत आढळून येते. अशा प्रदेशात पावसाचे पाणी शेतात साठून राहत नाही. वार्षिक पर्जन्यमान व त्याची विमागणी या गोष्टीवर या पद्धताचे यश अवलंबून असते. या लागवडीच्या पद्धतीने ९० ते १२० दिवसांत तयार होणारे भाताचे प्रकार लावण्यात येतात व ते रूक्षताविरोधी असतात. त्यांच्या मुळांची वाढ चांगली होते. तांदूळ भरड प्रतीचा, जाडा रुंद व मोठया आकारमानाचा असून काही प्रकारांत तो लाल असतो परंतु अशा प्रकारचा तांदूळ आहारासाठी कमी प्रतीचा असतोच असे नाही. नांगरून भुसभुसीत केलेल्या शेतात ५ ते ७.५ सेंमी. पाऊस झाल्यावर बी फोकून अथवा पाभरीने २२ ते ३० सेंमी. अंतरावर ओळीमध्ये पेरणी करतात. नांगराच्या तासात टोकण पद्धतीनेही पेरणी काही ठिकाणी केली जाते. महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा जिल्ह्याचा पूर्वभाग, सांगली, धुळे, जळगाव, उस्मानाबाद व नांदेड या जिल्ह्यांत आणि चंद्रपूर, भंडारा व नागपूर या जिल्ह्यांच्या काही भागात पेरणी  पद्धत प्रचलित आहे. पावसाच्या अपेक्षेने कोरडया जमिनीत वर वर्णन केलेल्या तीनपैकी एका पद्धतीने काही ठिकाणी आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठया प्रमाणात लागवड केली जाते.


लावणी अथवा स्थलांतर पद्धत:खात्रीशीर पाणीपुरवठा असलेल्या भागात ही पद्धत प्रचलित असून तीत प्रथम रोपवाटिकेत (वाफ्यात) रोपे तयार करून नंतर ती आधी नांगरून चिखल केलेल्या शेतात लावतात. या पद्धतीत पेरणी पद्धतीपेक्षा पुष्कळच जास्त उत्पन्न मिळत असल्यामुळे भारतात हीच पद्धत सर्वसाधारणपणे जास्त प्रमाणावर रूढ आहे. पिकाचा काळ चार ते सहा महिन्यांचा असतो. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, प. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशाचा काही भाग व महाराष्ट्रातील संपूर्ण कोकणपट्टी, पुणे, सातारा, नासिक व कोल्हापूर जिल्ह्यांचा पश्चिम भाग, दक्षिण कालव्याखालील नगर जिल्ह्याचा भाग, नागपूर, चांदा, भंडारा या जिल्ह्यांतील बहुतेक भाग व नांदेड जिल्ह्याचा काही भाग येथे ही पद्धत प्रचलित आहे. या पद्धतीचे (१) रोपे तयार करणे व (२) रोपांची लावणी असे दोन भाग पडतात.

 

 (१) रोपे तयार करणे : (अ) स्थानिक पद्धती :(अ) राब पद्धत: महाराष्ट्रातील कोकण व मावळ भागात रोपे तयार करण्यासाठी प्रथम जमीन भाजण्याची पद्धत बऱ्याच वर्षापासून प्रचलित आहे व त्या पद्धतीला ‘राब भाजणे’असे म्हणतात. राब भाजण्यासाठी गुरांचे शेण व जंगलातील झाडांच्या फांद्या वापरतात. प्रथम शेणाचे बारीक पुंजके राबाच्या जागेवर पसरतात. शेण संपूर्ण वाळल्यावर त्यावर गवताचा थर देतात व वरून वाळलेला पालापाचोळा पसरतात. पालाचालोळ्याच्या थरावर थोडा शेणाचा काला पसरून वरून मातीचा पातळ थर देतात. मातीमुळे राब सावकाश जळण्यास मदत होते. वारा नसताना किंवा मंद असताना वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने राब पेटवितात. तो सावकाश जळत राहतो त्यामुळे खलील ५ ते ७ सेंमी. शेताच्या मातीचा थर संपूर्ण भाजून निघतो. त्यातील कीड, रोगजंतू व तणांचे बी जळून नष्ट होते आणि जमीन सच्छिद्र झाल्यामुळे रोपांची वाढ चांगली होते. राबाच्या राखेचा खत म्हणून उपयोग होतो. राब पद्धतीचे वरील फायदे असले, तरी या पद्धतीत सेंद्रिय खत देणारे पदार्थ जळून जातात व जमिनीला त्यापासून सेंद्रिय खताचा पुरवठा होत नाही. संशोधन केंद्रावरील प्रयोगांवरून असे सिद्ध झाले आहे की, राब न भाजता केवळ खताचा वापर करून भाताची चांगली रोपे तयार करता येतात. मात्र अशा रीतीने तयार केलेल्या रोपांत तणांचा उपद्रव जास्त असतो. त्यासाठी तणनाशकांचा वापर करणे आवश्यक असते.

 

 (अ) नागपूर, चंद्रपूर व भंडारा या जिल्ह्यांत राब भाजण्याची पद्धत नाही तेथे रोपे तयार करण्यासाठी नांगरून भुसभुशीत केलेल्या जमिनीत वाफ्याच्या एक आर क्षेत्रात ५०० किग्रॅ. शेणखत अथवा कंपोस्ट मिसळतात. काही शेतकरी एक आर क्षेत्राला १.५ ते २ किग्रॅ. अमोनियम सल्फेट देतात.

(अ) तमिळनाडूत व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत रोपे तयार करण्यासाठी प्रथम वाफ्यात चिखल करून त्यात हेक्टरी सु. ९,००० किग्रॅ. या प्रमाणात हिरवा पाला मिसळतात आणि त्यात मोड आलेले बी पेरतात. तीन आठवडयांनंतर वाफ्यात पाणी देण्याचे बंद करतात व जमीन वाळू देतात. त्यामुळे रोपे वाळू लागतात व करपल्यासारखी दिसतात. अशी रोपे दोन ते तीन आठवडयांनंतर उपटून त्यांच्या जुडया बांधून त्या चिखल केलेल्या शेतात दोन दिवस ठेवतात. या अवधीत त्यांना भरपूर प्रमाणात नवीन मुळे फुटतात. नंतर ही रोपे लावणी पद्धतीप्रमाणे लावण्यात येतात. या पद्धतीमुळे उत्पन्नात घट न येता दोन आठवडे अगोदर पीक तयार होते, असे दिसून आले आहे. पेरणीपूर्वी अथवा पेरणीनंतर पाणीपुरवठा अपुरा पडतो अशा भागात या पद्धतीचा अवलंब करतात.

 

(अ) सिंचाईची सोय असलेल्या व भरपूर पावसाच्या प्रदेशातभाताची रोपे तयार करण्यासाठी प्रथम शेतात पाणी भरून नांगराने चिखल तयार करतात व त्यात हिरवा पाला अथवा अन्य सेंद्रिय खते मिसळून त्यावर फळी फिरवून चिखल दाबून शेत समपातळीत आणतात. नंतर शेतात १ ते १.५ मी. रुंद व जरूरीप्रमाणे लांब आणि काहीसे उंच वाफे तयार करतात व त्याभोवती पाण्यासाठी ३० सेंमी. रुंदीचे पाट काढतात. मोड आलेले भाताचे बी वाफ्यावर फोकून पेरतात व मधून मधून पाणी मारून वाफ्यात बेताची ओल कायम ठेवतात. बी चांगले उगवून आल्यावर वाफ्यातील पाण्याची पातळी   हलके हलके वाढवितात व रोपे १५ सेंमी. उंच झाल्यावर वाफ्यात सतत २ ते ३ सेंमी. पाणी ठेवतात.

 हेक्टरी बीजाचे प्रमाण:एक हेक्टर भातशेतीसाठी ७-१० आर क्षेत्रातील रोपे लागतात व त्यासाठी बारीक दाण्याचे सु. ३७.५ किग्रॅ. व जाड दाण्याचे सु. ५० किग्रॅ. बी राब केलेल्या अथवा बिनराबाच्या क्षेत्रात फोकून पेरतात व हलक्या लाकडी नांगराने जमिनीत मिसळतात. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाअगोदर धूळ वाफेवर पेरणी करतात व पाणी देण्याची सोय असलेल्या ठिकाणी बी पेरल्यावर पाणी देतात.

 

उगवणीसाठी अनुकूल परिस्थिती :भाताचे बी उगवण्यासाठी इष्टतम तापमान सु. ३०0 से. असते परंतु ५0 से. पासून ४७0 से. पर्यतच्या तापमानात ते उगवू शकते. जमिनीत जलांशाचे प्रमाण २७% च्या पेक्षा अधिक असल्यास बी उगवून येते. १५ सेंमी. पाण्याखालीही ते उगवू शकते. भाताची रोपे पाण्यात बुडालेल्या स्थितीत सु. ५० दिवसांपर्यत जिवंत राहतात.

 

हळव्या भाताच्या प्रकारांचे बी पीक तयार झाल्यावर ताबडतोब अथवा दोनपासून सहा आठवडयांच्या ⇨प्रसुप्तावस्थेनंतर (विश्रांती काळानंतर) उगवते.गरव्या प्रकारांचे बी तयार झाल्यावर तीन ते चार महिन्यांचा काळ जावा लागतो.

 

(आ) रोपे करण्याची सुधारित पद्धत:महाराष्ट्रात भाताच्या लागवडीच्या सुधारित पद्धतीनुसार भाताची रोपे पुढीलप्रमाणे तयार करतात. प्रथम शेतात १.२० मी. रुंद व ७.५ सेंमी. उंचीचा गादीवाफा तयार करतात. वाफ्याची लांबी रोपे लावण्याच्या क्षेत्राप्रमाणे किती असावी ते ठरवितात. एक आर क्षेत्रात एक गाडी अथवा ५०० किग्रॅ. चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्टखत मातीत मिसळतात आणि त्यावर चाळलेल्या कंपोस्ट खताचा सु. १.५ सेंमी. जाडीचा थर पसरतात. नंतर २ ते ३ किग्रॅ. अमोनियम सल्फेट वाफ्यावर पसरून ते मातीत हळूवारपणे मिसळतात. पेरणीसाठी सुधारित प्रकाराचे शुद्ध बी वापरतात. बारीक प्रकारांचे बी हेक्टरी १५ किग्रॅ. व जाड प्रकारांचे २० ते २५ किग्रॅ. या प्रमाणात घेऊन ते प्रथम ३% मिठाच्या द्रावणात १० मिनिटे बुडवून ढवळतात व वर तरंगणारे पळिंज (हलके बी) काढून टाकतात. खाली बसलेले जड बी स्वच्छ पाण्यात दोन अगर तीन वेळा धुतात. धुतलेले बी स्ट्रेप्टोसायक्लिनाच्या द्रावणात (०.६ ग्रॅ. स्ट्रेप्टोसायक्लिन+ २२.५ लि. पाणी) बारा तास बुडवून ठेवतात. नंतर ते द्रावणातून काढून सावलीत वाळविल्यावर त्याला १% पारायुक्त कवकनाशक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणारे द्रव्य) १० किग्रॅ. बियांना २५ ग्रॅ. या प्रमाणात चोळतात. अशा प्रकारे प्रक्रिया केलेले बी वाफ्यात ७.५ सेंमी. अंतरावर ओळी काढून पातळ पेरतात. पेरणीनंतर दोन ते तीन आठवडयांनी एक आर वाफ्याच्या क्षेत्राला २ ते ३ किग्रॅ. अमोनियम सल्फेट देतात. तसेच ३ ग्रॅ. स्ट्रेप्टोसायक्लिन आणि ३०० मिलि. २०% प्रवाही एंड्रीन १२० लि. पाण्यात मिसळून रोपांवर फवारतात किंवा ५०% ताम्रयुक्त कवकनाशक २५ ग्रॅ. % आणि ३०० मिलि. २०% एंड्रीन १२० लि. पाण्यात मिसळून फवारतात.

 

(२) रोपांची लावणी : (स्थलांतर). (अ) स्थानिक पद्धत : ज्या शेतात रोपे लावावयाची त्या शेताची पूर्व-मशागत करून ते लावणीसाठी तयार करतात. पीक काढून घेतल्यावर उन्हाळ्यात शेत वारंवार नांगरतात. जेथे पाण्याची सोय असेल तेथे हिरवळीचे पीक घेऊन लावणीपूर्वी ते शेतात मिसळतात. ही सोय नसल्यास शेणखत अगर कंपोस्ट हेक्टरी ३७ ते ५० गाडया मिसळतात.

 

कोकणात रोपास ‘आवण’म्हणतात व त्याच्या लावणीत ‘आवणी’म्हणतात. आवणीसाठी खाचरात पाणी सोडून देशी लाकडी नांगराने नांगरट करतात. त्याला ‘चिखलणी’म्हणतात. जुलैमध्ये जोराचा पाऊस सुरू होताच चिखलणी करतात. आवणीसाठी चांगला मऊ चिखल करणे आवश्यक असते. यानंतर फळी फिरवून चिखल सपाट करतात. फळीच्या खालच्या बाजूस १० ते १२ सेंमी. अंतरावर लाकडी खुंटया अगर लोखंडी खिळे बसविलेले असतात. त्यांच्यायोगे नांगरटीने मोकळे झालेले परंतु गाडले न गेलेले गवत गोळा करून चिखलात गाडता येते व पुढे त्याचे खत होते. चिखलणीसाठी ट्रॅक्टरसारखी अवजारेही उपलब्ध आहेत. कोकणाच्या भातशेतीसाठी खास तयार केलेल्या हलक्या लोखंडी नांगरानेही चिखल चांगला होतो. फळी फिरविल्यावर शेत आवणीसाठी तयार होते.

 

भाताच्या प्रकारांप्रमाणे २० ते ५० दिवसांची रोपे लावणीसाठी वापरतात. चार ते पाच महिन्यांत तयार होणाऱ्या प्रकारांसाठी ३० ते ४० दिवसांची आणि तीन ते चार महिन्यांत तयार होणाऱ्या प्रकारांसाठी २० ते २५ दिवसांची रोपे वापरतात. तायचुंग स्थानिक-१ आणि आय. आर. ८ यांसारख्या जास्त उत्पन्न देणाऱ्या प्रकारांची रोपे २३-२७ दिवसांपेक्षा जास्त वाढू देत नाहीत. रोपे उपटण्यापूर्वी वाफ्यात पाणी सोडून मुळांना धक्का न लागेल अशा रीतीने ती उपटतात आणि त्यांच्या १५० ते २०० रोपांची एक याप्रमाणे जुडया बांधून मुळांकडील माती पाण्यात धुवून लावणीसाठी तयार केलेल्या शेतात नेतात. रोपे त्याच दिवशी अगर दुसऱ्या दिवशी एका जागी दोन ते चार याप्रमाणे चिखलात तिरकी रोवतात. हळव्या प्रकारांत एका जागी दोन रोपे १० ×१० सेंमी. अथवा १५ ×१५ सेंमी. अंतरावर लावतात. गरव्या जातीसाठी एका जागी तीन ते चार रोपे ३० ×१५ सेंमी. अंतरावर लावतात. भारी जमिनीत ३० ×३० सेंमी. अंतरावर एका जागी चार-पाच रोपे लावतात. स्थानिक लावणीच्या पद्धतीत एका जागी १०-१५ रोपे लावतात परंतु एवढया रोपांची जरूरी नसते. तसेच स्थानिक पद्धतीत रोपे नियमित अंतरावर लावली जात नाहीत व पुढे-मागे असल्यामुळे पिकात कोळपणी करता येत नाही.


(आ) सुधारित पद्धत:भाताच्या सुधारित लागवडीच्या पद्धतीत रोपांची लावणी स्थानिक पद्धतीप्रमाणे न करता ती रांगांतून करतात (याला ‘जपानी पद्धत’ असेही म्हणतात). शेताच्या दोन टोकांना लाकडी खुंटया रोवून त्यांना दोरी बांधतात व दोरीवर ठराविक अंतरावर खुणेसाठी सुतळी बांधतात आणि खुणेखाली चिखलात रोपे लावतात. नंतर दोरी उचलून दुसऱ्या रांगेवर धरतात व अशा रीतीने सर्व शेतात रोपांची लावणी केली जाते. हळव्या (१२० दिवस अथवा कमी दिवसांत तयार होणाऱ्या) प्रकारांसाठी दोन ओळीत २५ सेंमी. व रोपांत १० सेंमी. अंतर एका जागी तीन ते चार रोपे लावतात. गरव्या प्रकारांत हे अंतर अनुक्रमे २५ सेंमी. व १५ ते २० सेंमी. ठेवून एका जागी दोन ते तीन रोपे लावतात. लावणी ओळीत केल्याने आंतरमशागत करणे सोईचे जाते, पीक तुडविले जात नाही, खत सारख्या प्रमाणात देता येते व पिकावर औषधे फवारणे सोपे होते.

 

या पद्धतीत रोपे प्रथम सावकाश उपटून त्यांचे शेंडे खुडून ताम्रयुक्त कवकनाशकात बुडवून नंतर लावणी करतात.

 

लावणी केव्हा केली जाते याचा उत्पादनावर फार परिणाम होतो. हंगामात लवकर लावणी केल्यामुळे उत्पन्न वाढते परंतु प्रत्यक्षात लावणी केव्हा करावयाची ते पावसावर अवलंबून असते. महाराष्ट्रात लावणीसाठी जून महिना सर्वात उत्तम असून त्याखालोखाल जुलै महिना असतो. ऑगस्टच्या पहिल्या आठवडयानंतर लावणी केल्यास उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होतो. गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या मुखाशी असलेल्या प्रदेशांत पहिल्या पिकाची लावणी जूनमध्ये आणि दुसऱ्या पिकाची लावणी जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात करतात.

 

(इ) दुबार लावणी पद्धत:आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व आसाम या राजांच्या काही भागांत दुबार लावणी पद्धत प्रचलित आहे. या पद्धतीत वाफ्यामध्ये नेहमीप्रमाणे बी पेरण्यात येते आणि रोपे ३०-४० दिवसांची झाल्यावर त्यांच्या जुडया करून त्या दुसऱ्या वाफ्यात दाटीने लावतात. त्यानंतर एक महिन्याने ती रोपे शेतात नेहमीच्या अंतरावर लावण्यात येतात. या पद्धतीचा पुढील निरनिराळ्या परिस्थितींत अवलंब करण्यात येतो. (१) पाण्याअभावी योग्य वेळी रोपाची लावणी करणे शक्य होत नाही. (२) खताचा अंश पुष्कळ प्रमाणात असलेल्या खाचरात गरव्या प्रकारांच्या रोपांची लवकर लावणी केल्यास पीक फार वाढते, फुटवे पुष्कळ येतात, पीक जमिनीवर लोळते व लोंब्या आल्याच, तर त्यांत दाणे भरत नाहीत. (३) पीक लवकर फुलावर यावे या उद्देशाने या पद्धतीचा अवलंब करतात. तसेच या पद्धतीत पेरणीसाठी लागणाऱ्या बियांमध्ये पुष्कळ बचत होते. ज्या भागात काही कारणांमुळे लावणी वेळेवर करणे शक्य नसते. अशा भागासाठी या पद्घतीची शिफारस करतात.

 

लावणीनंतर पिकाची देखभाल:पाणीपुरवठा: लावणीनंतर खाचरात पाण्याची पातळी योग्य प्रमाणात ठेवणे फार महत्त्वाचे असते. लावणीच्या वेळी साधारणपणे १.२५ ते २.५ सेंमी. पाण्याची पातळी असते. सुमारे एक पंधरवडयापर्यत पाण्याची ही पातळी कायम ठेवतात. या मुदतीत रोपे जीव धरतात. या मुदतीनंतर लोंब्यांत दाणा भरेपर्यत शेतात ५ ते ७.५ सेंमी. खोली पर्यत पाण्याची पातळी कायम ठेवतात. मात्र तण काढण्यासाठी व खताची मात्रा देण्यासाठी शेतातील पाणी काही दिवसांसाठी कमी करणे अथवा संपूर्णपणे काढून टाकणे आवश्यक असते. पीक फुलावर येण्याच्या वेळी आणि लोंबीत दाणा भरत असताना शेतात जास्तीत जास्त पाण्याची खोली ठेवणेही तितकेच आवश्यक असते. पुरेसा पाणीपुरवठा असल्यास पाणी संथपणे व सतत वाहत राहील अशी तजवीज करतात. यासाठी शेताच्या वरच्या बाजूस एक आणि खालच्या बाजूस एक अशा दोन मोऱ्या ठेवतात. सर्वसाधारपणे कापणीपूर्वी सु. एक आठवडा शेतातील पाणी पूर्णपणे काढून टाकतात परंतु पाणी केव्हा काढून टाकावयाचे हे जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. हलक्या व सच्छिद्र जमिनीत जवळजवळ कापणीपर्यत खाचरात पाणी राहू देतात. भारी जमिनीत ते कापणीपूर्वी १० दिवस काढून टाकतात. भात खाचरे सम पातळीत नसल्यास काही भागात जास्त पाणी व काही भागात ते मुळीच नाही अशी परिस्थिती असते. जास्त पावसाच्या दिवसांत वरच्या खाचरातून खालच्या खाचरात पाणी येत असल्यामुळे बहुतेक खाचरे १५ सेंमी. पासून ४५ सेंमी.पर्यत पाण्याने भरलेली आढळतात. ज्या ठिकाणी पाटाचे पाणी घेतात तेथेही हीच परिस्थिती आढळते. भात पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता असली, तरी इतके साचलेले पाणी निश्चित हितावह नाही. कारण त्यापासून मुळांना पुरेशी खेळती हवा मिळत नसल्यामुळे त्यांची अन्न व पाणी शोषून घेण्याची क्रिया मंदावते आणि पीक पिवळे पडते. भात पिकाला लावणीनंतर १५ दिवसांपर्यत आणि फुलावर येण्यापूर्वी २५ दिवसांपासून दाणे टणक व्हावयास सुरुवात होईपर्यत पाण्याची जास्त आवश्यकता असते. या काळात पाऊस पडण्याचा संभव नसेल, तर खाचरातील पाणी वाहून जाण्याची मोरी बंद करून पाणी अडवून ठेवणे योग्य ठरते. परंतु हे पाणी पाच ते सहा दिवसांपेक्षा जास्त काळ तुंबून ठेवणे योग्य नसते.

 

खतांचा वापर:बव्हंशी शेतकरी खत वापरण्याच्या बाबतीत उदास असतो. काही शेतकरी मिळेल तेवढे शेणखत चिखलणीपूर्वीच्या नांगरटीत खाचरात टाकतात. परंतु या परिस्थितीत बदल होत असून हिरवळीच्या खताचा वापर आणि अमोनियम सल्फेट व यूरिया यांसारख्या वरखतांचा वापर वाढत्या प्रमाणावर होत आहे. लागवडीच्या सुधारलेल्या पद्धतीप्रमाणे खाचरात खताचा वापर पुढे दिल्याप्रमाणे करण्याची शिफारस करण्यात येते: (अ) हेक्टरी २५ ते ३५ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट पाऊस सुरू होण्यापूर्वी अथवा (आ) हेक्टरी ५,००० ते ६,००० किग्रॅ. हिरवळीचे खत किंवा पाला चिखलणीपूर्वी. यासाठी ताग, धैंचा, विलायती शेवरी (सेसबॅनिया), ग्लिरिसिडिया, मोगली एरंड, चवळी, गवार अथवा रूई यांचा वापर करण्यात येतो. (इ) स्थानिक प्रकारांना चिखलणीच्या वेळी हेक्टरी १२५ किग्रॅ. अमोनियमसल्फेटव १२५ किंग्रॅ. सुपर फॉस्फेट आणि लावणीनंतर एक महिन्याने १२५ किग्रॅ. अमोनियासल्फेट देतात. (ई) तायचुंग स्थानिक-१ अथवा आय. आर. ८ यांसारख्या भाताच्या जास्त खत पचविणाऱ्या निरनिराळ्या निरनिराळ्या प्रकारांना जिल्ह्यांत वा विभागांत कोष्टक क्र. ४ प्रमाणे खतांची शिफारस केली जाते.

कोष्टक क्र.४ भाताच्या सुधारित प्रकारांना द्यावयाची खते  

जिल्हा/ विभाग 

शेणखत/ 

कंपोस्ट खत 

(हेक्टरी गाड्या) 

हेक्टरी खताचे प्रमाण 

प्रमाण (किग्रॅ.) 

   

नायट्रोजन 

फॉस्फरस

पोटॅश 

ठाणे जिल्हा रायगड व 

२५-३० 

१००

५६

३७

रत्नगिरी जिल्हे  भंडारा व

२५

१००

७५

७५

चंद्रपूर जिल्हे सह्याद्रीचा पूर्वेकडील जास्त

३०

१२५

७५

७५

पावसाच्या प्रदेश पाटाच्या पाण्याखालील काळ्या

३०

१२५

७५

३७

जमिनी

३०

१२५

७५

७५