बेळगाव : कर्नाटक राजयातील याच नावारूचया जिल्ह्याचे आणि प्रशासकीय विभागाचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या छावणीसह ३,००,२९० (१९८१). हे मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर वसते असून दक्षिण-मध्य लोहमार्गावरील स्थानक आहे. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांच्या सामेवरील हे शहर पश्चिम घाटाच्या उतारावर सस. पासून सु. ७६० मी उंचीवर वसले आहे. येथील हवा जवळजवळ थंड असल्यामुळे `गरिबांचे महाबळेश्वर’ म्हणूनही ते ओळखले जाते.
|
बांबूच्या विपुलतेमुळे `वेळुग्राम’ असा उल्लेख फार पूर्वीपासून आढळतो. गोवा आणि पश्चिम किनारपट्टीकडे जाण्याच्या मार्गावरील वेळगाव हे प्रवेशद्वार असल्याने राजकीय दृष्ट्या याला महत्व होते. इसवी सन १२०५ च्या सुमारास होयसळांकडुन रट्टांनी हे जिकून घेतले व येथेच आपली राजधानी केली. १२५० मध्ये हे रट्टांकडून यादवांकडे आले आणि पुढे १३७५ मध्ये विजयानगर साम्राज्यात सामील झाले. त्यानंतर येथे काही काळ मुसलमानी राजवट होती. १७५४ मध्ये पेशव्यांनी याचा ताबा घेतला, तर १८१८ मध्ये ते इंग्रजांनी जिंकले. १८३८ पासून हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. स्वातंष्यपूर्व काळात हे मुंबई इलाख्यात आणि नंतर प्रथम मुंबई प्रांतात व १९५६ सालच्या भाषिक पुनर्रचनेनंतर त्यावेळच्या म्हैसूर (आता कर्नाटक) राज्यात गेले. शहरास लागूनच सभोवतालची खंदक असलेला सोळाव्या शतकातील प्रचंड भुईकोट किल्ला सध्या भग्नावस्थेत आहे. इंग्रजी अंमलापासून येथे लष्करी छावणी आहे. हे शहर पूर्वेकडील किल्ला आणि पश्चिमेकडील डावणी यांदरम्यान पसरले असून याची वाढही मोठ्या झपाट्याने होत आहे. जवळच सांबरे येथे विमानतळ आहे.
आसमंतातील कृषि-उत्पननाची बेळगाव ही प्रमुख बाजारपेइ असून येथे मुख्यतः तांदूळ, ऊस, कापूस, तंबाखू, तेलबिया, तसेच लाकूड व दुग्धजन्य पदाथ्र (लोणी, कुदा इ.) यांचा मोठा व्यापार चालतो. कोकणातुन (वेंगुर्ला बंदरातुन) येणाऱ्या नारळ, मीठ, सुके मासे, खजूर इत्यादींची ही बाजारपेठ आहे. गोवा व कोकण विभागाची ही एक महत्वाची बाजारपेट असून येथे दर शनिवारी बाजार भरतो. हातमागाच्या कापडउद्योगासाठी बेळगाव प्रसिद्ध असून येथील `याहापूर साडी’ प्रसिद्ध आहे. शहरात मोटारबांधणी, फर्निचर, काड्यापेट्या, रसायने, साबण, चर्मोद्योग, तांब्या-पितळेची भांडी, मृत्यूपात्री इ. उद्योग विकसित झालेले आहेत. शहापूर हे उपनगर हातमागावरील कापडासाठी तसेच सोन्या-चांदीच्या कामासाठी विख्यात आहे. शहराजवळच ऍल्युमिनियमचा प्रचंड कारखाना आहे.
शहरात मानव्यविद्या, विज्ञाने, तंत्रविद्या, आयुर्वेद, अभियांत्रिकी, वैद्यक, वाणिज्य, विधी इ. विषयांच्या उच्च शिक्षणसंस्था असून तया सर्व कर्नाटक विद्यापीठाशी (धारवाड-स्था. १९४९) संलग्न आहेत. शालेय शिक्षणत मराठी, कन्नड, उर्दू, इंग्रजी अशा भाषा माध्यमांची सोय आहे. तसेच `किंग जॉर्ज पब्लिक स्कूल’ ही सैनिकी शिक्षण देणारी निवासी संस्था येथे आहे. शहराला पाणीपुरवठा प्रामुख्याने सु. १८ किमी. वरील मार्कंडेय नदीवर बांधण्यात आलेल्या धरणातून केला जातो. येथील ग्रंथसंग्रहालय समृद्ध असून अनेक मराठी आणि कन्नड भाषिक साहित्यसंस्थाही आहेत.
शहरातील प्रेक्षणीय स्थळांत १६ व्या शतकांतील मशीद आणि किल्ल्यातील दोन सुंदर जैन मंदिरे उल्लेखनीय आहेत.
हे शहर महाराष्ट्रात विलीन व्हावे म्हणून दीर्घकाळ वाटाघाटी चालू आहेत. या बाबतीत महाजन अहवाल (१९६७) प्रसिद्ध झाला आहे. बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत दीर्घकाळ आंदोलनही चालू आहे पण हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
कापडी, सुलभा
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..