बेलीझ सिटी : नवजात वेलीझ देशाची जुनी राजधानी, कॅरिबियन सुमद्रकिनारी वेलीझ नदीमुखाजवळ असलेल्या या शहरी इ.स. १६३८ च्या सुमारास ब्रिटिश चाच्यांनी वसाहत केली. लोकसंख्या ४९,७४९ (१९७८ अंदाज). मॅहॉगनी व पतंगी यांच्या लाकडाच्या निर्यातीचे हे जगातील पहिल्या क्रमांकाचे बंदर होय. याशिवाय ओक वृक्षाच्या लाकडाची येथून निर्यात केली जाते. शहरात काही छोटे कारखानेही आहेत.

हे शहर जवळजवळ ‌समुद्रसपाटीवर असल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व सांडपाणी निस्सारण हे प्रश्न तेथे उद्‌भवतात. १९३१ व  १९६१ मध्ये झालेल्या वादळांत शहराचे प्रचंड नुकसान झाले होते. शहरापासून वायव्येस १६ कि.मी. अंतरावर स्टॅन्ली फील्ड हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.  

  शहाणे, मो.झा. पंडित, अविनाश