बेल्लारी : कर्नाटक राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या २,०१,०१४ (१९८१). हे शहर रस्त्याने होस्पेटच्या पूर्वेस ६१ किमी. सून हुबळी-गुंटकल या दक्षिणमध्य लोहमार्गावरील स्थानक आहे.
विजयानगर साम्राज्याच्या अस्तानंतर (१५६५) ही नगरी १६३१ अखेर पाळेगारांच्या ताब्यात व त्यानंतर १६९२ पर्यंत मुस्लिम अंमलाखाली होती. १६७८ या एकाच वर्षी ती मराठ्यांकडे होती १६९२ च्या सुमारास पुन्हा पाळेगारांकडे आली. १७७५ च्या सुमारास हैदरअलीने ती जिंकून घेतली. टिपू सुलतानाचा पाडाव करून (१७९२) निजामाने हे शहर जिंकले. इंग्रजी अंमलात येथे लष्करी छावणी होती. शहरात सोळाव्या शतकातील किल्ला असून त्याला भक्कम तटबंदी केलेली आढळते. किल्ल्याचा घेर सु. ३ किमी. असून नवे बांधकाम हैदर अलीने का फ्रेंच अभियंत्याकडून करून घेतले होते. हल्ली किल्ल्यात अनेक शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, चर्च इ. आहेत. त्यांपैकी ‘होली ट्रिनिटी चर्च’ १८११ मध्ये बांधलेले आहे. येथील दुर्गाम्माचे मंदिर प्रसिद्ध सून तिची प्रतिवर्षी फेब्रुवारी महिन्यात जत्रा भरते. येथे शिवानुभव मंडपही आहे.
वेल्लरीजवळ लोहखनिज आणि मँगॅनीजचे साठे मिळाल्यामुळे आणि तोरणगळ येथे पोलाद कारखाना सुरु होत असल्याने या शहराची वाढ झपाट्याने होईल असे वाटते. शहरात कापसाचा मोठा व्यापार चालत असून कापडगिरण्या, तेलगिरण्या, साखर, दारु गाळणे, पितळी भांडी बनविणे, शेती-अवजारे तयार करणे इ. अनेक व्यवसाय चालतात. येथील एम्. जी. ऑटोमोबाईल्स कारखाना कर्नाटक सर्वांत मोठा आहे. शहरातील वैद्यकीय व इतर महाविद्यालये धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाशी संलग्न असून अनेक माध्यमिक शाळा, तंत्रनिकेतन इत्यादींची येथे उत्तम सोय आहे.
कापडी, सुलभा
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..