बेलडोंगराइट : खनिज. या खनिजाचा रंग काळा व चमक डांबरासारखी असून याचे रा. सं. ६ Mn३O५.Fe२O३.८H२O असे आहे. मॅंगेनिजाच्या इतर खनिजाचे अपघटन होऊन (रेणूचे तुकडे होऊन) हे तयार होते. नागपूर जिल्ह्यातील बेलडोंगरी येथे प्रथम आढळल्यामुळे याला बेलडोंगराइट हे नाव देण्यात आले आहे.
ठाकूर, अ. ना.