बालिक पा पान : इंडोनशियाच्या कालीमांतान (बोर्निओ) बेटावरील बंदर. लोकसंख्या १,३७,३०० (१९७१). हे कालीमांतान बेटाच्या पूर्व किनारी माकॅसर सामुद्रधुनीवर वसले आहे. तेलशुद्धीकरण कारखान्यांसाठी ते विशेष प्रसिद्ध आहे. या शहराच्या ईशान्येस सु. १०० किमी. वर असलेल्या सॅमारिंडा या तेलक्षेत्रातून १८९९ पासून तेल काढले जाते व नळांद्वारे शहरातील कारखान्यांत आणले जाते. आयात तेलाचेही शुद्धीकरण येथे केले जाते. दुसऱ्या महायुद्धात या कारखान्यांचे अतोनात नुकसान झाले होते.

खांडवे, म. अ.