मरमत : (हिं. पहाडी किकर लॅ. अँकेशिया एबर्निया कुललेम्युमिनोजी) सुमारे ४ ते ६ मी. उंचीचा व खरखरीत, गडद करड्या सालीचा हा लहान पानझडी वृक्ष भारतात दख्खन (कोरड्या व खडकाळ जागी), पूर्व हिमालय ते पश्चिम द्विपकल्प, शिवाय पाकिस्तान (सिंध), अरबस्तान, अफगाणिस्तान, एडन इ. प्रदेशांत आढळतो. ⇨बाभूळ, ⇨खैर व हिवर ॲकेशिया या वंशातील असल्याने त्यांची अनेक लक्षणे सारखी आहेत. ॲकेशिया वंशातएकून सु. ७०० जाती असून पैकी भारतात सु. २५ आढळतात. कोवळ्या फांद्यांवर जांभळट व पिंगट लव असते. पाने संयुक्त व पिसा सारखे पण दोनदा विभागलेली दले ४-१४, दलके १० -१६, चिवट, भुरकट व लवदार काटे (उपपर्णे ) सरळ, तीक्ष्ण, पांढरे व कमीजास्त लाबीचे फुले पार लहान, पिवळी जर्द आणि गोळीसारख्या फुलोर्यात [ स्तबकात पुष्पबंध⇨असून त्यांचा वास चांगला नसतो. पानांच्याबगलेत एक किंवा अनेक फुलोरे असतात. शेंग पातळ, चपटी (८-१५सेंमी. लांब) व वाकडी असून तिच्या कडा दातेरी व बिया ६-१० असतात. याची इतर सामान्य लक्षणे ⇨लेग्यूमिनोजीत (शिंबावत कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. याचे लाकूड कठीण व जळणास उपयुक्त असते. कवकांमुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे) कधीकधी फांद्यांवर गाठी येतात त्या गरीब लोक खातात.
परांडेकर, शं. आ.
“