भिरा : महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेले टाटा वीज कंपनीचे एक प्रमुख विद्युत्‌निर्मिती केंद्र (१९२८). हे मुंबईच्या नैर्ऋत्येस आहे. टाटा वीज कंपनीने निळ-मुळा या नदीवर धरण बांधलेले असून त्या धरणातील पाणी किरावाडीजवळील भिरा येथील १,५०,००० किवॉ. क्षमतेच्या (१९८३) विद्युत्‌निर्मिती केंद्रास पुरविले जाते. येथील वीज मुंबईस, विशेषतः गिरण्यांना, पुरविली जाते.

गाडे, ना. स.