बहुऋतुजीविता : (पेरिनेशन). प्राप्त परिस्थितीत दीर्घकाळ जगण्याकरिता भिन्न वनस्पतींत आढळणारी क्षमता. अत्युत्तम परिस्थितीतही काही वनस्पती (उदा., तुळस, सूर्यफूल) फक्त एकच वर्ष (किंवा वाढीस अनुकूल असा एक ऋतू) जगतात, त्यांना वर्षायू म्हणतात. काही वनस्पती दोन वर्षे (किंवा दोन अनुकूल ऋतू) जगतात (उदा., गाजर, मुळा), त्यांना द्विवर्षायू म्हणतात. या जीवनकालात बी रूजण्यापासून ते पुन्हा बी तयार होऊन सुटे होईपर्यंतच्या सर्व अवस्था पूर्ण होतात. याखेरीज इतर कित्येक (उदा., आंबा, नारळ, कर्दळ इ.) या दोन्हींपेक्षा अधिक वर्षे जगतात त्यांना बहुवर्षायू म्हणतात. त्या काळात काही (उदा., बांबू, कारवी इ.) एकदाच फुलतात, तर इतर कित्येकांना दर वर्षी फुले, फळे व बिया येतात.

अँझोरेला सेलॅगो : (अ) उशीसारखी वनस्पती लेल्या फांद्या एकत्र येऊन (तल्पपादप) (आ) फांद्यांची मांडणी.

वर्षातील हवामान बहुधा ऋतुपरत्वे बदलते हा बदल कधी फार तीव्र असून (उदा., उन्हाळ्यात व हिवाळ्यात) वनस्पतिजीवनास तो फार प्रतिकूल ठरतो. अशा वेळी वर्षायू वनस्पती प्रतिकूल ऋतूपूर्वीच सर्व जीवनचक्र पूर्ण करते त्या वेळी तयार झालेली बीजे किंवा बीजुके (प्रजोत्पादक घटक) त्या प्रतिकूल हवामानात आतील जीव सुरक्षित ठेव-तात परंतु द्विवर्षायू व काही बहुवर्षायू वनस्पती अशा प्रतिकूल ऋतूत आपला जमिनीवरचा बराचसा किंवा सर्व भाग नाश पावू देतात व जमि-नीत फक्त आरक्षित अन्नाचा संचय, खोडात किंवा मुळात राहतो (उदा., कर्दळ, हळद, आले, गुलबुश, बीट, गाजर इ.). त्या अन्नाचा उपयोग अ-नुकूल काळी पुढील वाढीस होतो. जमिनीतील ज्याच्या पृष्ठभागावर वि-श्रामी कळ्या संरक्षित राहतात त्यांना ‘गूढ पादप’ म्हणतात ज्यांच्या कळ्या जमिनीच्या पृष्ठालगतच्या खोडावर राहून त्यांचे संरक्षण हिमाच्छ-दनाने किंवा पालापाचोळ्यामुळे होते, त्यांस ‘अर्धगूढ पादप’ म्हणतात. ह्याऐवजी बहुतेक बहुवर्षायू वनस्पतींची फक्त पानेच प्रतिकूल ऋतूत गळून जातात (उदा., निंब, सीताफळ इ.) व इतर भागांवर संरक्षक आवरणे निर्माण होतात (उदा., जाड साल कळ्यांवर खवले, केस, उपपर्ण, पर्ण-तल इ.) त्यांना ‘पानझडी’ म्हणतात. काही वनस्पतींच्या बाबतीत मात्र पाने, खोड इ. सर्वच भागांवर संरक्षक आवरणे व इतर ⇨उपत्वचा, जाड ⇨ अपित्वचा, जलसंचयी ऊतक (समान रचना आणि कार्य असलेल्या कोशिकांचा – पेशींचा – समूह) इ. संरचना असल्यामुळे प्रतिकूल हवामानात त्या टिकून राहतात त्यांना ‘सदापर्णी’ म्हणतात (उदा., आंबा, रबर, लोखंडी इ.) प्रतिकूल हवामानाशी जमवून घेण्यास व अनेक वर्षाचे घेण्यास व अनेक वर्षाचे जीवन मिळविण्यास आवश्यक त्या अनुयोजनांचा अंतर्भाव ‘बहुऋतुजीविता’ या संज्ञेत होतो. जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींपैकी द्विवर्षायू व बहुवर्षायू वनस्पतींच्या भूमिस्थित अवयवांत अन्नसंचय झाल्यास ती जाड (मांसल) बनतात. उदा., आले, हळद, कर्दळ ह्यांची मूलक्षोडे [→ खोड] सुरणाचे दृढकंद कांदा, निशिगंध व लसूण यांचे कंद् बटाट्याचे ग्रेथिक्षोड डेलिया, गाजर व शतावरी ह्यांची ग्रंथिल मुळे इत्यादी.  गोराडू, कारंदा व धा य पा त    यांच्या वायवी  (जमिनीच्या  वर वाढणाऱ्या)     खोडावर ज्या कंदिका (प्रजोत्पादक कळ्या)  येतात, त्यांचेही कार्य  या  सदरात  येते. पाण्यात   सदैव  अंशतः किंवा  पूर्णतः  वाढणाऱ्या वनस्पतींतही   शरीराचा एखादा   भाग   (खोड, मूळ इ.)  कडक   थंडीत किंवा उन्हाळ्यात, बहुधा तळाशी   किंवा  पृष्ठावर तरंगत   पण   सुरक्षित राहतो व  अनुकूल  काळी पुन्हा   नवीन वनस्पती त्यापासून  वाढते   [उदा., कमळ, पोटॅमोजेटॉन (म्हणजे      पाँडवीड), डकवीड →जलवन- स्पति]. उ.  ध्रुव  प्रदेशा- जवळ    व   आल्प्स पर्वतावर    वाढणाऱ्या काही      वनस्पतींच्या गुच्छासारख्या     वाढ- त्यांची  टोके  अर्धवर्तुळा- कार  उशीसारखी  संरचना .बनवितात हाच प्रकार काही मरूस्थलातील वनस्पतींतही आढळतो. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य व उच्च तापमानामुळे होणारे बाष्पीभवन यांपासून संरक्षण मिळते या वनस्पतींना ‘तल्पपादप’ म्हणतात. शेवाळीसारखा नाजूक व कायक (प्रारंभिक, साधे व लहान श-रीर असलेल्या) वनस्पतींत वर सांगितलेली घटना आढळते, कारण वर्षा-तील काही काळ त्यांनाही प्रतिकूल असतो. काही ⇨ यकृतकांत सपाट कायकाम शरीराच्या कडेने असलेला भाग जिवंत पण सुप्तावस्थेत राहतो परंतु इतर भाग सुकून जातो पुढे अनुकूल परिस्थितीत त्या जिवंत भा-गापासून नवीन वाढ होते. कित्येक जातींच्या मूलकल्पांच्या (मुळाचे का-र्य करणाऱ्या तंतूंच्या) टोकास बनणाऱ्या अनेककोशिका ‘कलिकां’-चेही कार्य हेच असते. अँथोसिरॉस ह्या शृंगकाच्या (एक प्रकारच्या यकृत-काच्या) सपाट कायकावर काठाजवळ अपार्य आवरणाने वेढलेले गाठीसारखे कोशिकासमूह (ग्रंथिक्षोड) बनतात. रूक्ष हवेमुळे इतर सर्व भाग सुकून गेला, तरी या अवयवांपासून नवीन कायक बनतात. रिस्किया व पेलिया ह्यांसारख्या यकृतकांमध्ये खालच्या पृष्ठभागांपासून गाठीसारखे अवयव बनून जमिनीत सुप्तावस्थेत राहतात व अनुकूल परिस्थितीत त्यापासून नवीन निर्मिती होते. अँड्रियाचे शंवालक (बीजुक रूजल्यावर प्रथम निर्माण होणारे साधे तंतुयुक्त शरीर) जरूर तेव्हा सुप्तावस्थेत जाऊन पुढे नवीन कायक निर्मितीत. बहुसंख्य ⇨हरितांमध्ये पर्णयुक्त फांद्यांच्या मूलकल्पांच्या किंवा शंवालकांच्या टोकापासून हरितद्रव्यहीन, वीस ते तीस कोशिकांनी बनलेल्या ‘मुकुलिका’ (कळ्या) निर्माण होतात व सुप्तावस्थेनंतर त्यांपासून नवीन पर्णयुक्त फांद्या बनतात.

 वाहिनावंत अबीजी वनस्पतींच्या [नेचाभ पादपांच्या →वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग] भिन्न गटांत व वंशांत बहुऋतुजीवितेची उदाहरणे आढळतात. लायकोपोडियमाच्या [→लायकोपोडिएलीझ] काही जातींत प्रतिकूल ऋतूत वनस्पती मरते परंतु टोकांचे भाग सुप्त कळ्यांप्रमाणे जिवंत राहून पुढे वाढीस लागतात ह्या वंशातील काही जातींत गर्भविकासात गाठीसारखा मांसल भाग (आद्य दृढकंदः प्रथम निर्माण होऊन प्रतिकूल परिस्थितीत सुप्तावस्थेत असतो परंतु पुढे त्यापासून नवीन वनस्पती बनते [→आयसॉएटिस एक्किसीटम]. सिलाजिनेलाच्या [→सिलाजिनेलेलीझ] एका जातीत (सि. लेपिडोफायला) प्रतिकूल ऋतूत सर्व शरीर चेंडूप्रमाणे गुंडाळले जाते व पुढे पाण्याच्या सान्निध्यात ते पुन्हा प्रसरण पावते हीच योजना काही प्लीओपेल्टिस नेचांतही [→नेचे] आढळते शुष्क ऋतूत याची पाने मिटून सुकतात परंतु पावसाने पुन्हा पूवर्वत होतात व बीजुकांना पुढील वाढ करण्यास संधी मिळते [→गुलाब, जेरिकोचा]. ⇨ जल नेचांमध्ये आढळणारी बीजुकेफले (एक किंवा दोन प्रकारचे बीजुककोश समाविष्ट करणारे फळासारखे अवयव) वर्षातील काही काळ (पाणी नसल्या वेळी) त्या वनस्पतींच्या फक्त प्रजोत्पादक अवयवांस संरक्षण  देऊन कळ्या, कंदिका व खोडांची रूपांतरे इत्यादींपासून बहुऋतुजीविता साधली जाते.

संदर्भ : Harder, R. and others,Trans. Bell, P. Coomber, D. Stras- burger’s Textbook of Botany, London, 1965.

 

परांडेकर, शं. आ.