फ्रिश (फ्री श ) , कार्ल फोन : (२० नोव्हेंबर १८८६ – ). ऑस्ट्रियन प्राणिवैज्ञानिक . मधमाश्या दिशा कशा ठरवितात व एकमेकी त संदेशाची देवाणघेवाण कशी करतात यांविषयी , तसेच माशांविषयी त्याचे महत्त्वाचे संशोधन केले आहे . प्रा ण्यांच्या वैयक्तिक व सामाजिक वर्तनाच्या तऱ्हा शोधून काढणे व त्यांचे संघटन ( सुसू त्रीकरण ) करणे यांबद्दल त्यांना ⇨ नीकोलस टीनबर्जेन व ⇨ कोनरॅड लोरेन्ट्स यांच्याबरोबर १९७३ सालचे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञान विषयाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले . मधमाश्या , इतर कीटक व मासे यांच्या फ्रिश यांनी केलेल्या व पक्ष्यांच्या इतर दोघांनी केलेल्या अभ्यासामुळे प्राणिवर्तनासंबंधीच्या शास्त्राचा पाया घातला गेला . फ्रिश यांच्या कार्यामुळे प्राण्यांचे वर्तन व संवेदन ( जाणिव ) यांविषयीच्या माहितीत भर पडून त्यांच्याकडे इतरांचे लक्ष वेधले गेले .
फ्रिश यांचा जन्म व्हिएन्नाला आणि शिक्षण व्हिएन्ना व म्यूनिक विद्यापीठांत झाले . म्यूनिक विद्यापीठाची पीएच् . डी . पदवी मिळवि ल्यानंतर (१९१० ) ते तेथेच प्राणिविज्ञानाचे प्राध्यापक झाले . १९२१ साली रॉस्टॉक ( जर्मनी ) विद्यापीठा त , तर १९२३ साली ब्रेस्लौ ( पोलंड ) विद्यापीठात ते प्राणिवैज्ञानिक संस्थेचे संचालक झाले . १९२५ साली म्यूनिकला परतल्यावर त्यांनी रॉकफेलर फाउंडेशनच्या साहाय्याने तेथे अशीच एक संस्था उभारली (१९३१ – ३२ ). दुसऱ्या महायुद्धात ही संस्था नष्ट झाल्यानंतर ते ग्रात्स ( ऑस्ट्रिया ) विद्यापीठात गेले व युद्ध समाप्तीनंतर त्यांनी ब्रन्नविंकल ( ऑस्ट्रिया ) येथील खाजगी प्रयोगशाळेत काम केले . १९५० साली ते म्यूनिक विद्यापीठात परतले , तेथे ते १९५८ साली सेवानिवृत्त झाले व शेवटी म्यूनिकमध्येच स्थायिक झाले .
फ्रिश यांनी मासे , मधमाश्या व इतर किटक यांचा अभ्यास केला . माशांचे त्यांनी १९१० च्या सुमारास संशोधन केले . विसाव्या शतकारंभी मासे रंगांध असतात , असा समज होता परंतु काही मासे तेजस्विता व रंग यांच्यातील फरक ओळखू शकतात व त्यां नुसार परि सराशी जुळवून घेतात , असे त्यांना आढळले . रंगीत अन्न किंवा तशा प्रकारचे उद्दीपक वापरून माशांना रंग – संवेदन असल्याचे त्यांनी दाखवून दिले . माशांना ऐकू येते आणि काही माशांची आवाजातील फरक ओळखण्याची क्षमता व श्रवणशक्ती असामान्य असून यांबाबतीत मासे मानवाहून श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सुचविले . माशांना वासाची जाणीव होऊ शकते असे त्यांना आढळले . १९३८ साली त्यांनी एक जखमी मि न्नाऊ मासा त्याच्याच जातीच्या इतर माशांत सोडला. तेव्हा इतर माशांत घबराट निर्माण झाली . ज ख मेतून बाहेर पडलेल्या रासायनिक द्रव्याच्या वासाची जाणीव झाल्यावर घबराट पसरल्याचे त्यांनी प्रयोगाद्वारे दाखवून दिले .
इ . स . १९२० ते १९५० या काळात अतिशय कष्ट घेऊन त्यांनी मधमाश्यां चा प्रयोगांद्वारे अभ्यास केला . त्यावरून त्यांनी मधमाश्या नाचाच्या ( लयबद्ध हालचालींच्या ) भाषेद्वारे एकमेकींशी कसा संपर्क साधतात व संदेशा ची देवाणघेवाण कशी करतात , हे शोधून काढले . हे नाच दोन प्रकारचे आहेत . जिला नवा अन्नसाठा ( उदा . फुले ) आढळतो , ती मधमाशी स्वतः भोवती उलटसुलट वर्तुळाकर गिरक्या मारून अन्नसाठा पोळ्यापासून सु . ७५ मी . पेक्षा कमी अंतरावर असल्याचे सुचविते . उलट पोट मागेपुढे हलविण्याचा इंग्रजी आठाच्या ( 8 ) आकाराचा दुसरा नाच करून ती अन्नसाठा सु . ७५ मी . पेक्षा अधिक अंतरावर असल्याचे सुचविते . नाचाच्या वेगावरून अन्नसाठा किती आहे , हेही सुचविले जाते , कारण अन्नसाठा जसजसा घटतो तसतसा नाच मंद होत जाऊन थांबतो . अशा तऱ्हेने पोळ्या तील मधमाश्यांना फुलांचे अंतर व दिशा कळते . मधमाश्यांच्या प्रत्येक उपजातीच्या नाचाची भाषा वेगळी असते ( उदा . ऑस्ट्रियातील मधमाश्या वर्तुळाकार नाचा ने अन्नसाठा सु . ८० मी . च्या आत असल्याचे , तर इटलीतील मधमाश्या याच नाचाने अन्नसाठा सु . ३६ मी . च्या आत असल्याचे सुचवितात ) व तिचा अर्थ इतर उपजातींना लावता येत नाही . यावरून हा नाच उपजतपणे या आनुवंशिकतेने येत असावा , शिक्षणाद्वारे नव् हे , असे त्यांचे मत आहे . त्या सूर्याचा होकायंत्राप्रमाणे उपयोग करून घेतात . ढगाआड असलेल्या सूर्याचे स्थान मधमाश्या आकाशातील ध्रुवित ( एकाच प्रतलात कंप पावणाऱ्या ) प्रकाशाच्या दिशेवरून ठरवू शकतात , हे त्यांनी दाखवून दिले (१९४९ ). दिवसाच्या निरनिराळ्या वेळीच्या ध्रुवित प्रकाशाची तऱ्हा व आधीच पाहूल ठेवलेली भूवैशिष्ट्ये यां च्याद्वारे त्या पोळ्याकडे परत येऊ शकतात , असेही त्य नी सुचविले . मात्र मधमाश्यांचा नाच व अन्नाचा शोध यांमध्ये वरील प्रकारचा संबंध नसावा तसेच नाच खरा असला , तरी अन्नाच्या शोधासाठी त्या वासाचा अधिक वापर करतात , असे अलीकडचे मत आहे . तथापि फ्रिश यांच्या अभ्यासामुळे मधमाश्यांच्या वर्तनासंबंधीच्या काही गैरसमजुतीचे निराकरण झाले . कीटक रंगीत पाक ळ्यांकडे आकर्षित होतात व मधमाश्या रंगांध असतात यांतील विरोधाभास उघड करून मधमाश्यांना रंगविषयक संवेदन असते मात्र वर्णपटातील तांबड्या भागातील प्रकाश त्या पाहू शकत नाहीत , हे मत प्रस्थापित झाले मात्र त्या जंबु पार ( दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडे अदृश्य ) प्रकाशही पाहू शकतात . मधमाश्यांना सुवासांतील फरक कळतो व त्यांचे गंधज्ञान माणसासारखे असते आणि त्या अगदी जवळच्या वासांतील फरक ओळखू शकतात तसेच त्यांचे चवीचे ज्ञान माणसाहून कमी असते , असे फ्रिश यांचे मत आहे . मधमाश्यांना विविध वास व चवी यांतील फरक ओळखण्याचे शिक्षणही देता येते , असेही त्यांनी प्रतिपादिले होते (१९१९ ).
फ्रिश यांचा आचारशास्त्रीय वा वर्तनशास्त्रीय ( नैसर्गिक स्थितीमध्ये प्राण्यांच्या वर्तनाचा तुलनात्मक करणाऱ्या शास्त्राचा ) अभ्यास हा कीटक व प्राणी यांचा असला , तरी त्यातून निघालेले निष्कर्ष मानवी वर्तनाला ही लावता येतील , असे मत आहे .
फ्रिश यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यांपैकी पुढील महlत्त्वाची आहेत : द डान्सिंग बीज (१९५५ ), ऑन द लाइफ द बी (७ वी आवृत्ती , १९६४ ), मेम्वॉर्स ऑफ अ बायॉलॉजिस्ट ( दुसरी आवृत्ती , १९६२ ), डान्स लँग्वेज ॲ न्ड ओरिएंटेशन ऑफ बीज (१९६५ ) आणि बीज : देअर व्हिजन , केमिकल सेन्सेस ॲ न्ड लँग्वेज (१९७१ ).
बाल्झान फाउंडेशन पारितोषिक (१९६३ ), अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्यत्व (१९५१ ), रॉयल सोसायटीचे सदस्यत्व (१९५४ ) इ . सन्मान त्यांना मिळाले आहेत .
पहा : प्राण्यांचे वर्तन .
ठाकूर , अ . ना.