फ्रॉइड ,  सिग्मंड :  (६  मे  १८५६  –  २३  स प्टें बर  १९३९ ).  प्रख्यात ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ ,  वैद्य व मनोविश् ‍ लेषणाचे प्रणेते .  त्यांचा जन्म सध्याच्या चेकोस्लोव्हाकियातील पर्झीबॉर  ( पूर्वीच्या ऑ स्ट्रि यातील फ्रायबर्ग ,  मोरेव्हिया )  येथे एका ज्यू कुटुंबात झाला .  त्यांचे वडील व्हिएन्ना येथे येऊन स्थायिक झाले होते .  व्हिएन्ना येथेच सिग्मंड फ्रॉइड यांचे शिक्षण झाले . १८८१  मध्ये फ्रॉइड यांनी व्हिएन्ना विद्यापीठातून एम् .  डी .  ही पदवी घेतली आणि तेथेच ते  १८८३  पासून अध्यापन करू लागले . १८८२  मध्ये ते त्यांच्या बहिणीची हँबर्ग येथील मैत्रीण मार्था बेर्नाइस हिच्या प्रमात पडले  पण अपुऱ्‍या उत्पन्नामुळे  १८८७  पर्यंत ते तिच्याशी विवाहबद्ध होऊ शकले नाहीत .  ह्या दरम्यानच्या काळात त्यांनी आपल्या प्रेयसीला लिहिलेल्या व पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालेल्या सु . ९००  पत्रांतून त्यांच्या व्यक्तिमत्वावर चांगला प्रकाश पडतो . १८८७  ते  ९५  ह्या काळांत त्यांना तीन मुलगे व तीन मुली झाल्या .  त्यांपैकी सर्वात धाकटी ॲना फ्रॉइड ही असून तिनेही मनोविश् ‍ लेषणज्ञ म्हणून कीर्ती संपादन केली . १९०२  मध्ये त्यांनी व्हिएन्ना येथे केलेल्या संशोधनास मान्यता मिळाली आणि त्यांची व्हिएन्ना विद्यापीठात तंत्रिकाचिकित्सा  ( न्यूरॉलॉजी )  विभागाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली . १९३८  पर्यंत त्यांनी याच जागेवर काम केले . १८८४  मध्ये त्यांनी ब्रॉ इअरसमवेत उन्माद झालेल्या रोग्यांवर संमोहन निद्रेच्या साह्याने उपचार केले . १८८५ – ८६  मध्ये त्यांनी फ्रेंच तंत्रिकातंत्रविशारद ⇨ झां मार्‌तँ शार्को  (१८२५ – ९३ )  यांच्या समवेत पॅरिस येथे तसेच नॅन्सी येथे बर्नहाईम यांच्या समवेत काम केले व  १८८६  मध्ये व्हिएन्ना येथे परत येऊन तंत्रकाविकृतितज्ञ  ( न्यूरोपॅथॉलॉजिस्ट )  म्हणून स्वतंत्र व्य वसाय सुरू केला  १८९५  मध्ये त्यांनी ब्रॉइअर मिळून स्टडीज इन हिस्टेरिआ हा ग्रंथ प्रसिद्ध केला .  उपचारासाठी संमोहन निद्रेची पद्धत फ्रॉइड यांना पुढेपुढे समाधान कारक वाटली नाही म्हणून  १८९०  मध्ये त्यांनी ती सोडून दिली आणि तिच्याऐवजी मुक्त साहचर्याची  ( मनात जे येईल ते रोग्यास अनिर्बंधपणे बोलावयास लावण्याची )  म्हणजे भावविरेचनाची  ( कॅ थर्सिस )  पद्धती अवलंबिली .

  

सिग्मंड फ्रॉइड

 उन्माद झालेल्या रोग्यांचे भावविरेचन घडवून आणताना वारंवार येणारे अडथळे किंवा विस्मृती यांच्या अवलोकावरून फ्रॉइड यांनी निरो ध न सिद्धांत मांडला आणि त्यातूनच त्यांनी मनोविश् ‍ लेषणाचे तंत्र विकसित केले. रुग्णाची ⇨ स्वप्ने तसेच त्याला होणाऱ्‍या तात्पुरत्या विस्मृती ,  त्याच्याकडून अभावितपणे होणाऱ्‍या लिहिण्याबोलण्यातील चुका आणि हावभाव इत्यादींचा   उपयोग त्यांनी निरोधित केलेल्या किंवा दडपलेल्या सुप्त इच्छांना ⇨ अबोध मनातून बोध मनात आणणे व वाट मोकळी करून देणे यांसाठी करून घेतला .  त्यांच्या मते लहानपणी दडपल्या गेलेल्या लैगिंक इच्छांमध्ये मज्जाविकृतींचे मूळ असते .  लहानपणी सामाजिक निषेधनि र्बधां मुळे लैंगिक इच्छांना व अनुभवांना मोकळी अभिव्यक्ती मिळत नाही  त्यामुळे त्या इच्छा अबोध मनात दडपल्या जातात  तेथून त्या प्रतीकरुपाने पुन पुन्हा आपल्या बोधजीवनात अवतीर्ण होण्याच्या यत्न करतात आणि त्यामुळेच अनेक ⇨ मज्जाविकृती निर्माण होतात .  मनोविश् ‍ लेषणाचे तंत्र वापरून , अशा प्रकारच्या ⇨ निरोधना ने निर्माण झालेले ⇨ गंड व विकृती बऱ्‍या होऊ शकतात ,  असे त्यांनी अनेक मज्जाविकृत रोग्यांना बरे करून दाखवून दिले .  या तंत्रास बुद्धिगम्य स्वरूप देण्यासाठी फ्रॉइड यांनी अनेक संकल्पना ,  संज्ञा ,  उपपत्ती यांची विस्तारपूर्वक मांडणी केली व आपली मनोविश् ‍ लेषण उपपत्ती प्रतिपादिली .  या उपपत्ती चे  अखेरपर्यंत विविध संकल्पना व सिद्धांत प्रतिपादन करून तसेच नवीन ग्रंथरचना करून ते विवेचन कर त होते .  मनोविश् ‍ लेषणास सुसंगत स्वरूप देण्यात आणि मानवी मनाचे स्वरूप स्पष्ट करण्यात त्यांनी आपले आयुष्य वेचले .

 त्यांनी व त्यांच्या सहका ऱ्‍यां नी  १९०८  मध्ये मनोविश् ‍ लेषणाची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली . १९१०  मध्ये त्यांनी अमेरिकेतील क्लार्क विद्यापीठात मनोविश् ‍ लेषणावर एक व्याख्यानमालाही गुंफली .  या मालेत त्यांनी दिलेली व्याख्याने पुढे इन्ट्रोडक्टरी लेक्चर्स ऑन सायकोॲनॅलिसिस नावाने प्रसिद्ध झाली . (१९१७ ).  १९१०  नंतर फ्रॉइडप्रणी त मनोविश् ‍ लेषणाकडे सर्व जगाचे लक्ष वेधले गेले .  सुरुवातीस फ्रॉइडच्या उपपत्तीला जरी वैद्यकातील गतानुगतिक व्यक्तींकडून कडवा विरोध झाला ,  तरी त्यां तील काही सिद्धांतांचा अनेक मान्यवर मानसशा स्त्रज्ञांकडून आणि मानसो पचारज्ञांकडून फार मोठ्या प्रमाणावर स्वी कार करण्यात आला .

  

 रुग्णालयात प्रत्यक्ष काम करताना त्यांनी ‘ कोकेन ’  या स्थानी य वेदनाहारक गुणधर्म असलेल्या औषधाबाबत एक माहितीपूर्ण निबंध प्रसिद्ध केला .  काही मित्रांनाही त्यांनी डोळ्यां वरील इलाजासाठी कोकेन हे औषध सुचविले . त्यां पैकी कार्ल कोलर यांनी ते वापरून त्याबाबत माहिती प्रसिद्ध केली .  त्यामुळे कोलर यांनाच कोकेन शोधण्याचे श्रे य दिले जाते .

  

    फ्रॉइड यांच्या ⇨ ॲल्फ्रेड ॲड्लर आणि ⇨ कार्ल युंग ह्या दोन प्रमुख सहका ऱ्‍यां नी  १९११  मध्ये फ्रॉइडप्रणीत मनोविश् ‍ लेषण सं प्रदाय सोडून दिला .  फ्रॉइड म्हणतात तसे प्रत्येक प्रेरणेकडे लैंगिक संकल्पनेतून पाहणे योग्य नाही , असे त्यांचे मत होते .  पुढे ॲड्लर यांनी ⇨ व्यक्तीमानसशास्त्र आणि युंग यांनी ⇨ विश् ‍ लेषणात्मक मानसशास्त्र अशा दोन स्वतंत्र प्रणाली प्रवर्तित केल्या .


  

 शास्त्रीय प्रयोगां द्वारे स्वतःची उपपत्ती व सिद्धांत पडताळून पाहण्याचा प्रयत्न फ्रॉइड यांनी कधीच केला नाही . असे असले , तरी त्यांनी मज्जा विकृतीच्या उपचारतंत्रात आणि मानसशास्त्रात आपल्या मनोविश् ‍ लेषणाद्वारे फार मोलाची भर घातली हे निर्विवाद आहे .  शेवटी शेवटी फ्रॉइड यांनी धर्म ,  पुराणकथा ,  विनोद ,  साहित्य ,  कला , इतिहास इ त्यादींची मीमां साही मनोविश् ‍ लेषणसिद्धांतांना अनुसरून केली .  विसाव्या शतकातील जागतिक कला – ज्ञानक्षेत्रांवर मनोविश् ‍ लेषणाचा खोल ठसा उमटलेला आहे .

  

    विसाव्या शतकातील एक थोर विचारवंत म्हणून फ्रॉइड यांचे स्थान कायम राहील .  त्यांनी मानवी मनाबाबत मांडलेल्या संकल्पनां मुळे मानवी स्वभावाबाबतच्या पारंपारीक कल्पनां मध्ये फार मोठी उलथापालथ झाली . त्यांच्या संशोधनाने प्रभावित होऊन ॲड्लर ,  युंग ,  ऑइगेन ब्लॉइलर ,  कार्ल अब्राहम ,  सँडोर फेरेंत्सी ,  अर्नेस्ट जोन्स , ⇨ व्हिल्हेल्म श्टेकेल  (१८६८  –  १९४० ),  अब्राहम ए .  ब्रिल  (१८७४ – १९४८ ) ह्यांसारख्या ख्यातनाम व्यक्ती त्यांच्या अनुयायी झाल्या .  इंग्लिश लेखक ⇨ डी .  एच् .  लॉरेन्स  (१८८५ – १९३० )  आणि जर्मन लेखक ⇨ टोमास मान  (१८७५ – १९५५ ) यांच्या साहित्यावर फ्रॉइडचा गहिरा प्रभाव पडलेला आढळतो .  वस्तुतः विसाव्या शतकातील आधुनिक कला संप्रदायां वर –  उदा . ,  अतिवास्तवा द –  फ्रॉइडच्या मनोविश् ‍ लेषणाचा फार मोठा परिणाम आहे . शेवटीशेवटी त्यांच्या कार्यास पुरेपूर मान्यता मिळाली . साहित्यासाठी असलेले गटे पारितोषिकही त्यां ना मिळाले  (१९३० ).  हे पारितोषिक मिळाल्याचे त्यांना विशेष समाधान वाटत असे .

  

 फ्रॉइड यांनी मानसशास्त्रीय विचारात निर्माण केलेल्या प्रवाहाचे महत्व थोडक्यात असे सांगता येईल  :  त्यांच्या आगेमागेच शुद्ध वैज्ञानिक पद्धतीचा अंगीकार करून मानसशास्त्र रचणारा ‘ वर्तनवाद ’  स्थिरावला होता आणि मानसशास्त्रा चे वैज्ञानिक सांगाडे तयार होत होते .  परंतु एकीकडे तांत्रिक सुक्ष्मता वाढत असताना दुसरीकडे त्यातून माणसाचे माणूसपण निसटते आहे की काय ,  अशी शंका निर्माण होत होती .  धर्म ,  कला ,  सत्वजाणीव , आत्मोन्नती ,  स्वप्न व जा णि वेच्या इतर पातळ्या यांच्याबद्दल सर्वसामान्य विचारी माणसाला असणाऱ्‍या जिज्ञासेला व्यूहमार्गात उंदीर कसे धावतात ,  त्यांची अध्ययन प्रक्रिया ,  अशाबद्दलच माहिती मिळू शकत होती .  माणूस म्हणजे प्रतिक्षेप हे उत्तर नुसते अपुरेच नव्हे ,  तर अनेकांना अधिक्षेप करणारे वाटत होते .  फ्रॉइड यांच्या विचारात मानवी गुंतागुंतीला स्थान मिळाले .  स्वतःतील अंतर्विरोधांचाच बळी होण्याचा माणसाचा ललाटलेख त्यांनी वाचला . संस्कृतीच्या नावाने दडपल्या जाणाऱ्‍या कामप्रेरणेला त्यांनी लखलखीत उजेडात आणले .  एका अर्थी मानसशास्त्राच्या अंतर्गत एकांति कते ला त्यांनी दुसरा ध्रु व दिला ,  त्याचबरोबर समाजांतर्गत जखडलेपणातून बाहेर येण्यासाठी दिशाही दिली. आधुनिक समाजाच्या वाटचालीसाठी मानवाच्या स्वतःच्या आकलनाची एक चौकट त्यांनी उपलब्ध करून दिली ,  हे महत्वाचे आहे .

  

 क लां च्या क्षेत्रातील त्यांचा प्रभाव एका अर्थी निर्मितीपेक्षा समीक्षेच्या अंगानेच आहे ,  हे लक्षात घ्यायला हवे .  त्यांनी दिलेली चौकट ‘ रहस्य ’ वादी  ( मिस्टिक – ओरिएंटेड )  होती .  कलावंतांना कामुकतेची विविध रूपे पूर्वापार वेगवेगळ्या प्रकारे जाणवत आलेली हो ती .  परंतु कलावस्तूंचा अर्थ लावताना एक संपूर्ण नवी व्यवस्था फ्रॉइड यांनी उपलब्ध करून दिली .  अव्यक्त जाणिवांच्या कलारूपांच्या रचनेतील शोध घेण्यासाठी तिचा उपयोग मोठ्या प्रमाणावर झालेला आहे .

  

 विसा व्या शतकात समाजजीवन ढवळून टाकणाऱ्‍या अनेक घटना ,  पंथ ,  संप्रदाय उदयास आले .  वैचारिक क्षेत्रात ज्यांच्याशी कडाडून भिडावे असे सिद्धांत मांडले गेले .  फ्रॉइड यांच्या बाजूने आणि विरोधात उभे राहून अजूनही वाद झडतात हेच त्यांच्या हातून घडलेल्या विचारजागृतीचे लक्षण मानावे लागेल .

  

 जर्मनीत  १९३३  मध्ये नाझींनी फ्रॉइड यांच्या ग्रंथांची होळी केली . १९३८  मध्ये ऑस्ट्रिया पादाक्रांत केल्यावर नाझींनी फ्रॉ इडला व्हिएन्ना सोडून जाण्यास भाग पाडले .  तेथून ते लंडन येथे गेले आणि तेथेच कर्करोगामुळे कालवश झाले .

  

 त्यांनी लिहिलेल्या प्रमुख मूळ जर्मन ग्रंथांची विविध भाषांत भाषांतरेही झाली आहेत .  इंग्रजीत भाषांतरित झालेल्या त्यांतील काही उल्लेखनीय ग्रंथांची नावे पुढीलप्रमाणे  :  स्टडीज इन हिस्टेरि आ  ( जोसेफ ब्रॉइअरसमवेत –१८९५ ),  द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स  (१९०० ),  द सायकोपॅथॉ लॉ जी ऑफ एव्ह्‌रीडे लाइफ  (१९०४ ),  थ्री एसेज ऑन द थिअरी ऑफ सेंक्झुआलिटी  (१९०५ ),  टोटेम अँड टाबू  (१९१३ ),  लिओनार्दो दा व्हिंची  (१९१६ ),  बियाँ ड द प्ले झर प्रिन्सिपल  (१९२० ),  एगो अँड द इड  (१९२३ ),  सिव्हिलिझेशन अँड इट्स डिसकन्टेट्स  (१९३० ),  न्यू इंट्रोडक्टरी लेक्चर्स ऑन सायकोॲनालिसिस  (१९३३ ),  मोझेस अँड मॉनाथीइझम  (१९३९ )  इ त्यादी .  जेम्स स्ट्रेची यांनी चोवीस खंडांत संपादित केलेल्या द स्टँडर्ड एडिशन ऑफ द कम्प्लीट सायकॉलॉजिकल वर्क्स ऑफ सिग्मंड फ्रॉइड  (१९५३ – ६ ४ )  मध्ये फ्रॉइड यांचे सर्व मानसशास्त्रीय लेखन संगृहीत आहे .

  

पहा : मनोविश् ‍ लेषण .

संदर्भ  : 1. Freud, Sigmund Trans. Strachey, James, An Autobiographical Study, London, 1959.

           2. Fromm, Erich, Sigmund Freud’s Mission : An Analysis of His Personality and Influence, London, 1959.

           3. Hutchins, R. M. Ed. Great Books of the Western World : Freud  (Major Works of Sigmund Freud), Chicago,1952.

           4. Jones, Ernest, Life and Works of Sigmund Freud, 3 Vols., New York, 1953–57.   

           5 .  हरोलीकर ,  ल .  ब .  सिग्मंड फ्रॉइड ,  जीवन व कार्य ,  पुणे  १९७२ .

  

 सुर्वे ,  भा .  ग .