फ्रॅंकिन्सेंन्स : ( ओलिबॅनम ). सामान्यपणे बर्सेरेसी कुलातील बॉ स्वे लिया वंशातील काही जातींच्या वनस्प तीं पासून मिळणाऱ्या सुवासिक गम रेझिनाला फ्रॅंकिन्सेन्स म्हणतात . कधीकधी हिराबोळ , गुग्गुळ , सालई , इसेस , फर ( ॲबीस ए क्से ल्सा ) इ . वनस्पतींपासून मिळणाऱ्या अशा पदार्थालाही हेच नाव दिले जाते . बॉस्वेलिया वंशातील पाच जातींपासून फ्रॅंकिन्सेन्स मिळते . मध्य भारताचा डोंगराळ भा ग , कोरोमंडल , किनारा व इथिओपिया येथे बॉस्वेलिया च्या अशा दोन जाती आढळतात व त्यांपैकी बॉस्वेलिया थुरिफेरा ही महत्त्वाची आहे . मात्र या दोन्हींपासून मोठ्या प्रमाणवर फ्रँ किन्सेन्स मिळविण्यात येते की नाही , याविषयी माहिती उपलब्ध नाही . बॉ . फ्रेरिआना , बॉ . मुआ – डॅजिआना व बॉ . कार्टेरी या जातींपासून खरे फ्रॅंकिन्सेन्स मिळविण्यात येते . बॉ. कार्टेरी ही जाती पूर्व आफ्रिकेतील सोमालीलॅंड भागात , तसेच तिचा एक प्रकार अरबस्तानातील हाड्रामौंट येथे आढळतो .
प्राचीन ग्रीक लोक याला ‘ लिबनॉस ’, रोमन ‘ ओलिबॅनम ’ व अरब ‘ लुबान ’, या नावांनी ओळखत असत . हे तिन्ही शब्द ‘ दूध ’ अर्थाच्या ‘ सेबोनाह ’ या हिब्रु शब्दा पासून आले असावेत . फ्रॅंकिन्सेन्स हा शब्द मात्र Franc ( मु क्त वा शुद्ध ) आणि ensens ( सुगंध ) या फ्रेंच शब्दांवरून तयार करण्यात आला असून बहुधा हे जाळल्यावर पसरणाऱ्या सुगंधाला उद्देशून तो आला असावा . फ्रॅंकिन्सेन्स मिळविण्यासाठी झाडाच्या खोडावर खोल छेद घेतात व त्याच्या खालची अरुंद व सु . १४ सेंमी . लांब साल काढून टाकतात . छेदातून दुधासारखा रस स्रवतो व हवेने तो घट्ट होतो. रस घट्ट होण्यास सु. तीन महिने लागतात. रस हवा तेवढा घट्ट झाल्यावर याचे गोलसर , अंडाकृती तसेच अश्रूच्या वा अनियमित आकाराच्या गोळ्या बनतात व त्या मे – सप्टेंबर या काळात खरवडून काढून गोळा केल्या जातात. अधिक खोलवर छेद घेऊन मिळणारे कमी प्रतीचे फ्रॅंकिन्सेन्स स्वतंत्रपणे गोळा केले जाते . गोळा केलेले फ्रॅंकिन्सेन्स एडन व इतर अरबी बंद रां तून यूरोप , चीन इ . ठिकाणी पाठविले जाते . मुंबई बंदरातून याची बऱ्याच प्रमाणात आयात – निर्यात होते . फ्रॅंकिन्सेन्स हे काहीसे अपारदर्शक , अस्फटिकी व कडवट चवी चे असून शुद्ध प्रकार रंगहीन वा किं चित हिरवट असतो . मात्र सामान्यपणे याचा रंग पिवळा, पिवळसर करडा व उदसर असतो. तापविले असता याला बाल्समासारख मधुर वास येतो . हे जाळल्यास धूर निर्माण हो तो आणि याची ज्योत अतिशुभ्र असते . अल्कोहॉलात टाकल्यास हे अपारदर्शक बनते , तर पाण्यात टाकल्यास पायस [ एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांचे मिश्रण ⟶ पायस ] बनते . याच्यात सु . ७२ % रेझीन तसेच थोड्या प्रमा णा त बाभळीच्या डिंकाशी साम्य असलेला डिंक व बाष्पनशील ( बाष्परूपात उडून जाणारे ) तेल ही असतात . पांढरा रंग , विशिष्ट गोलसर आकार , ठिसूळपणा व शीघ्र ज्वालाग्राहीप णा ही चांगल्या फ्रॅंकिन्सेन्सची वैशिष्ट्ये होत , असे थोरले प्लिनी यांचे मत होते . पूर्वीच्या अनेकदेवतावादी धर्मांमध्ये ( उदा . प्राचीन ग्रीक व रोमन ) देवतांना अर्पण करण्यासाठी व अंत्यसंस्कारामध्ये फ्रॅंकिन्सेन्स वापरले जाई . प्राचीन ईजिप्शियन लोक याचा धार्मिक कृत्यांत वापर करीत असत . पूर्वी ज्यू लोक पवित्र ठिकाणी जाळावयाच्या धूपात जे चार पदार्थ वापरीत त्यांपैकी एक फ्रॅंकिन्सेन्स हा असे. जुन्या करारातील पहिल्या पाच पुस्तकांमध्ये (पेटॅटूकमध्ये) याचा बऱ्याच वेळा उल्लेख आलेला आहे, तर तीन ज्ञानी पुरुषांनी बाल येशूला अर्पिलेल्या वस्तूंमध्ये फ्रॅंकिन्सेन्सही होते , असा उल्लेख नव्या करारात आहे . थोरले प्लिनी यांनी हेमलॉक वनस्पतीच्या विषबाधेवर उतारा म्हणून याचा उल्लेख केला आहे , तर ॲव्हिसेना यांनी व्रण , ताप , उलटी , आमांश इ . विविध विकारांवर फ्रॅंकिन्सेन्स वापरण्याची शिफारस केली होती. पौर्वात्य देशांत गळवे, जखमा यांवर लावण्यासाठी व परमा झाल्यास पोटात घेण्यासाठी फ्रॅंकिन्सेन्स वापरले जात असे . चीनमध्ये हे गलगंड व कुष्ठरोगावर वापरीत तसेच हे शक्तिवर्धक , उत्तेजक व शामक असल्याचे मानीत . आधुनिक वैद्यकात मात्र याला औषध म्हणून महत्त्व दिले जात नाही . आता फ्रॅंकिन्सेन्स उदबत्त्या , धूपासारखी धूम्रकारी चूर्णे व इतर सुगंधी पदार्थांमध्ये वापरले जाते . तसेच अत्तरामध्ये ते स्थिरीकारक ( द्रव उडून जाण्यास प्रतिबंध करणारे द्रव्य ) म्हणून वापरतात . फ्रॅंकिन्सेन्सपासून मिळणारे बाष्पनशील तेल रंगहीन वा पिवळसर व आल्हाददायक वासाचे असून त्याचा औषधात व सुवासिक द्रव्यांत उपयोग केला जातो .
पहा : रे झिने सुवासिक द्रव्ये .
चंदाराणा, प्रतिमा न.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..