फैजाबाद – २  : अफगाणिस्तानातील बदक्शान प्रांताची राजधानी लोकसंख्या ७७,०००  ( १९७५ ) . हे काबूलच्या ईशान्येस ३१४ कि . मी .  कोकचा नदीकाठी ,  समुद्रसपाटीपासून १,२०० मी .  उंचीवर वसले आहे .  ईशान्य भागातील महत्त्वाचे व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र म्हणून हे प्रसिद्ध आहे . अफगाणिस्तानातीलच कुंडुझ शहराच्या मोराद बेग याने १८२१ मध्ये फैजाबाद उद् ‌ ध्वस्त केले .  पुढे अफगाणिस्तानचा अमीर अब्दुर रहमान खान  ( १८८० – १९०१ )  याने बद क्शा न प्रांत जिंकला .  त्यानंतर या शहरास पुन्हा महत्त्व प्राप्त झाले .  १९५५ सालच्या भूकंपामुळे फैजाबाद उद् ‌ ध्व स्‍त झाले .  १९७० पासून शहराचे आधुनिकीकरण करण्यास प्रारंभ झाला आहे . हिवाळ्यात अधूनमधून बर्फवृष्टीमुळे फैजाबादचा इतर भागांशी संबंध तुटतो ,  तर उन्हाळ्यात येथील हवामान आल्हाददायक असते .  याच्या आसमंतात तांदूळ ,  गहू ,  तेलबिया ,  कापूस ही पिके होत असून शहरात भातगिरण्या आहेत .  फैजाबादला लष्करी ठाणे म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे .

 उपाध्ये ,  मु .  कृ .