आगामी प्रेषित : ज्यू आणि ख्रिस्ती धर्मातील एक समजूत. ईश्वराने पाठविलेले एक प्रेषित भविष्यात राजा म्हणून अवतरेल आणि तो ज्यूनां परकीयांनपासून मुक्त करील तसेच त्याच्या राज्यात ज्यूंना सुखासमाधानाने नांदता येईल, असे भविष्य जुन्या करारा आढळते. जुन्या करारातील ह्या भविष्याचा फायदा घेऊन स्वत:स आगामी प्रेषित म्हणविणारे अनेक खोटे प्रेषित ज्यू धर्मात झाले. येशू ख्रिस्त आल्यानंतर तोच आगामी प्रेषित (मसाय) आहे, असे ज्यांना वाटले ते ख्रिस्तांचे अनुयायी झाले. ख्रिस्ती कल्पनेनुसार येशू ख्रिस्त हाच जुन्या करारात उल्लेखिलेला आगामी प्रेषित होय. ज्यू धर्मातील सुधारणावाद्यांनी आगामी प्रेषितांची कल्पना त्याज्य मानली तथापि काहींची या कल्पनेवर दृढ श्रद्धा आहे. बौद्ध धर्मातील मैत्रेय बुद्ध व हिंदू धर्मातील कल्की अवतार ह्या कल्पना आगामी प्रेषित कल्पनेशी काही प्रमाणात मिळत्याजुळत्या आहेत.

संदर्भ : Silver, A H, A History of Messianic Speculation in Isral, 1958.

फरांडे, वि. दा.