ख्रिस्तविरोध : (अँटी – क्राइस्ट). येशू ख्रिस्ताच्या पवित्र कार्याचा नाश करणाऱ्यांना उद्देशून ही संज्ञा वापरण्यात आली आहे. आपणच ‘ख्रिस्त’ अथवा ‘मेसिआ’ आहोत, असा दावा करून काही दुष्ट व्यक्ती अनेकांची फसवणूक करतील, असे भाकीत येशू ख्रिस्ताने केले होते. ह्या भाकितास उद्देशून सेंट योहानने ‘अँटी क्राइस्ट’ ही संज्ञा नव्या करारातील आपल्या दोन पत्रांत (पहिले पत्र – २ : १८, २२ ४ : ३ दुसरे पत्र – ७) वापरली. इतरत्र मात्र ही संज्ञा आढळत नाही.

संदर्भ : Bousset, Wihlem, The Antichrist Legend, London, 1896.

आयरन, जे. डब्ल्यू. (इं.) साळवी, प्रमिला (म.)