अँकेराइट : खनिज. स्फटिक समांतर षट्फलकीय, कधीकधी प्रचिनाच्या आकाराचे [ → स्फटिक – विज्ञान]. सामान्यत: सूक्ष्मकणी घट्ट राशीच्या व कधीकधी कणमय किंवा मातीसारख्या राशीच्या स्वरूपात आढळते. चमक काचेसारखी, रंग पांढरा, करडा, लालसर, पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. कठिनता ३·५. वि.गु.  २·९५–३·१. रा. स. CaCO3·(Mg, Fe, Mn) CO3. अँकेराइट हे डोलोमाइटासारखे खनिज असून ते पुष्कळदा डोलोमाइटाच्या जोडीने किंवा लोही धातुपाषाण्यांच्या जोडीने आढळते. त्याची संरचना डोलोमाइटासारखी असते परंतु डोलोमाइटातील मॅग्नेशियमाच्या काही अंशाच्या जागी फेरस लोह असते.

पहा : डोलोमाइट.

ठाकूर, अ. ना.