अदिति : एक वैदिक देवता. ⇨आदित्यांची माता, दक्षप्रजापतीची कन्या व कश्यपप्रजापतीची पत्नी. आठ पुत्रांपैकी आठव्या सूर्याला तिने टाकल्याने तो नभस्थ झाला. ही तपस्येमुळे विष्णुमाता व सर्वदेवमाता झाली, असे पुराणे सांगतात. नरकासुराने नेलेली हिची कुंडले कृष्णाने नरकासुरमर्दन करून परत आणून दिली. ही अनेक वेदमंत्रांची देवता व काही वेदमंत्रांची ऋषी आहे.

केळकर, गोविंदशास्त्री