ॲकीया : ग्रीसच्या पेलोपनीझ द्वीपकल्पाच्या उत्तर भागातील एक प्राचीन राज्य. इ.स.पू. २००० वर्षांआधी ॲकीयन लोक ग्रीसमध्ये आले असावेत. यांच्या बारा शहरांची मिळून ‘ॲकीयन लीग’ झाली होती. ट्रोजन युद्धात यांनी गाजविलेल्या कामगिरीचे वर्णन होमरने इलियडमध्ये चिरंतन करून ठेवले आहे. पट्रॅस ही त्यांची राजधानी होती. रोमन साम्राज्याच्या उदयानंतर हे राज्य नष्ट झाले.

जोशी, चंद्रहास