अश्विनीकुमार : व्यक्तिद्वयात्मक अशी ऋग्वेदातील अनेक सूक्तांची देवता. त्यांना वेदांत ‘अश्विन्’ अशी संज्ञा आहे. घोड्याचे व घोडीचे रूप घेतलेल्या सूर्य व संज्ञा यांचे ते जुळे पुत्र होत. वडवा (घोडी) ही संज्ञेहून वेगळी सूर्यपत्‍नी होती, असेही एक मत आहे. त्यांचा जन्म नाकातून झाला म्हणून, किंवा असत्य न बोलणारे म्हणून, त्यांना ‘नासत्य’ असेही नाव आहे. एकाचे

अश्विनीकुमार

नाव नासत्य तर दुसऱ्याचे ‘दस्त्र’ असेही मत आहेत. प्राचीन कोशांत दोन्हीही नावे दोघांना दिलेली आढळतात. ते देवांचे वैद्य मानले आहेत. त्यांनी विश्पलेला लोखंडाचा पाय बसविला. गुरु-शुक्रांवरून किंवा ध्रुवप्रदेशातील नाक्षत्रप्रकाशावरून ही देवता कल्पिली असावी, अशी आधुनिक मते आहेत.

केळकर, गोविंदशास्त्री