अधिवृत्त : (एपिसायकल). ज्या वर्तुळाचा मध्यबिंदू दुसऱ्या एका वर्तुळाच्या परिघावरून भ्रमण करतो, त्या वर्तुळास ‘अधिवृत्त’ म्हणतात व दुसऱ्या वर्तुळास ‘अधिवृत्त-कक्षा’ म्हणतात. प्राचीन काळी पृथ्वी हा मध्य धरून ग्रहांचे भ्रमण पृथ्वीभोवती बरोबर वर्तुळाकार कक्षेत ठराविक गतीने होते अशी समजूत दृढ होती. नंतर ग्रहांच्या गतीत दिसून आलेला कमी-अधिकपणा व त्यांचे ⇨व्रकी जाणे यांची कारणमीमांसा करण्यासाठी टॉलेमी यांनी ग्रह अधिवृत्तावरून फिरतात अशी कल्पना बसविली. परंतु या कल्पनेला आधार नाही, असे नंतर दिसून आले.
काजरेकर, स. ग.
“