अमाप्रदक्षिणाकाल : (सांवासिक आवर्तकाल). एक ज्योतिषशास्त्रीय संज्ञा. एखाद्या ग्रहाची सूर्याशी   युती होते तेव्हा ग्रहातून काढलेल्या शरवृत्ताचा क्रांतिवृत्ताशी छेदनबिंदू (कदंबपात) व रविमध्य हे पृथ्वीवरील   निरीक्षकाच्या डोळ्यापाशी शून्य अंशाचा कोन करतात [→क्रांतिवृत्त ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति युति]. हे शून्यांतर होय. तसेच प्रतियुतीच्या वेळी १८०°अंतर असते. ग्रहांच्या कक्षीय परिभ्रमणामुळे कदंबपाताचेही क्रांतिवृत्तावर परिभ्रमण होते. त्यामुळे क्षणाक्षणास सूर्य आणि कदंबपातयांतील अंतर बदलेले. अशा प्रकारे रवी व एखाद्या ग्रहाचा कदंबपात यांच्यात एकदा शून्यांतर झाल्यापासून लगेच पुन्हा शून्यांतर होण्यास जो कालावधी लागतो त्यास अमाप्रदक्षिणाकाल म्हणतात. म्हणजेच हा दोन लागोपाठ होणाऱ्या युतींमधील कालावधी होय. पृथ्वी व ग्रह एकाच प्रतलात (पातळीत) फिरतात, असे गृहीत धरून अमाप्रदक्षिणाकाल काढतात (अमा=एकत्र किंवा सान्निध्य).

मंगळ २ वर्षे ४९ दिवस, गुरू १ व. ३४ दि., शनी १ व. १३ दि., प्रजापती (यूरेनस) १ व. ४/ दि., वरुण (नेपच्यून) १ व. २/ दि., कुबेर (प्‍लुटो) १ व. १/ दि., असे बहिर्ग्रहांचे अमाप्रदक्षिणाकाल आहेत. बुध ११६ दि. आणि शुक्र १ व. २१९ दिवस असे अंतर्ग्रहांचे अमाप्रदक्षिणाकाल आहेत.

चंद्राच्या अमाप्रदक्षिणाकालास ‘चांदमास’ म्हणतात. अमावस्येला चंद्र-सुर्य भोगांशांतर (खगोलीय रेखांशांतील फरक) शून्य असते. यालाच ‘अमा’ किंवा ‘दर्श’ म्हणतात. चांद्रमास सरासरीने २९ दिवस १२

ता. ४४ मि. ७·८ से. एवढा असतो. पण चंद्राच्या संमिश्र गतीमुळे यात १३ तासांचा फरक पडतो. नाक्षत्रमास (त्याच नक्षत्रापाशी चंद्र पुन्हा येण्यास लागणारा काल) सरासरीने २७ दि. ७ ता. ४३ मि. ११·४० से. असतो. ग्रहांचे प्रदक्षिणाकाल नेहमी सूर्यसापेक्ष घेतात.

अमाप्रदक्षिणाकालाची दोन सुत्रे आहेत. जर ग्रहाचा सूर्यप्रदक्षिणाकाल  दिवस, अमाप्रदक्षिणाकाल  दिवस आणि पृ = ३६५/दि. धरले

तर,

१ 

=

१ 

– 

१ 

हे सुत्र अंतर्ग्रहांकरिता आणि 

१ 

१ 

– 

१ 

स 

प 

पृ 

स 

प 

पृ 

   हे सूत्र बहिर्ग्रहांकरिता अमाप्रदक्षिणाकाल काढण्यासाठी वापरतात.

फडके, ना. ह.