सॉल्झबरी, लॉर्ड रॉबर्ट आर्थर टॅलबट गॅसकॉइन सेसिल : (३ फेब्रू वारी १८३०–२२ ऑगस्ट१९०३). इंग्लंडचा एक मुत्सद्दी राजनीतिज्ञ, पंतप्रधान आणि साम्राज्यवादी नेता. त्याचा जन्म सरंजामदार घराण्यात दुसरा मार्क्विस ऑफ सॉल्झबरीआणि फ्रान्सिस गॅसकॉइन यादांपत्यापोटी हॅटफील्ड (हार्टफर्डशर)या गावी झाला. आई फ्रान्सिसगॅसकॉइन हिचा वारसा हक्कानेमिळालेला मोठाजमीनजुमलाहोता. त्याच्या मोठ्या भावासग्लानीच्या आजाराने बेजार केलेहोते. त्यातच त्याचे अखेर निधनझाले (१८६५). त्यामुळे आई-वडिलांच्या संपत्तीचा तो एकमेववारस झाला होता. 

 

लॉर्ड रॉबर्ट सॉल्झबरीरॉबर्टला नैसर्गिक बुद्घिमत्तालाभली होती पण शारीरिकदृष्ट्या तो फारच अशक्त होता. त्याच्याआईचे १८४० मध्ये निधन झाले.त्यामुळे त्यास एकाकी वाटू लागले. ईटनला शाळेत पाच वर्षे काढल्यानंतर त्याचे अध्ययन खासगी रीत्या घरीच झाले. नंतर त्याने ऑक्सफर्डविद्यापीठाच्या क्राइस्ट चर्च महाविद्यालयात प्रवेश घेतला परंतु प्रकृतिअस्वास्थ्यामुळे तोघरीच राहिला. दोन वर्षे त्याने डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन शुद्घ व मोकळ्या हवापाण्यासाठी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचादौराकेला. यात त्याची प्रकृती सुधारली आणि आत्मविश्वास बळावला.त्याच्यापुढे चर्च किंवा राजकारण असे दोन पर्यायहोते. त्याला स्टॅमफर्डमतदारसंघातून हाउस ऑफ कॉमन्सवर जाण्याची संधी मिळाली (१८५३)आणि तो राजकारणातप्रविष्ट झाला. या सुमारास तो जॉर्जिना ॲल्डर्सनया युवतीच्या प्रेमात पडला, परंतु त्यांच्या विवाहास वडिलांनी विरोधकेला कारण त्यांच्या मते ती सामान्य कुटुंबातील आणि गरीब घरातीलहोती. तरी सुद्घा एक-दोन वर्षे थांबून रॉबर्टने तिच्याशीच लग्न केले(१८५७). त्यांना पाच मुलगे व दोन मुली झाल्या.सॉल्झबरीची पत्नीहुशार व मनमिळाऊ होती. त्यामुळे हॅटफील्ड येथील राहते घर हेसेसिल कुटुंबीय व प्रतिष्ठित पाहुणेंडळींचे मध्यवर्ती केंद्र बनले.

रॉबर्ट याने ब्रिटिश शासनात भारत मंत्र्यासारखी ( सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया ) काही प्रतिष्ठित पदे भूषविली. बेंजामिन डिझरेलीविषयीत्याच्या मनात सुरुवातीस अढी होती. तो सॅटरडे रिव्ह्यू  आणि द क्वार्टर्ली  रिव्ह्यू यांसारख्या नियतकालिकांतून त्याविरुद्घ सातत्याने लिहीत असे.शिवाय हाउस ऑफ कॉमन्समधून प्रसंगोपात्त शासनावर टीका करी. पुढे१८७४ मध्ये बेंजामिन डिझरेलीने त्यास आपल्या मंत्रिमंडळात स्थानदिले आणि पुन्हा एकदा त्याची भारत मंत्री म्हणून नियुक्ती केली. याकाळात डिझरेली विषयीच्या त्याच्या मतात बराच फरक पडला. लॉर्डडर्बीनंतर त्याची परराष्ट्र मंत्रीम्हणून निवड झाली. या वेळी (१८७८)बाल्कन द्वीपकल्पात युद्घजन्य परिस्थिती उद्‌भवली होती. कॉन्स्टँटिनोपलच्या (इस्तंबूल ) नियंत्रणावरुन इंग्लंड आणि रशिया यांत युद्घाचाभडका उडण्याची स्थिती निर्माण झाली होती परंतुसॉल्झबरीच्या धूर्तडावपेचांमुळे आणि मुत्सद्दीगिरीमुळे जून-जुलै १८७८ च्या बर्लिनपरिषदेत ( काँग्रेस ) रशिया सहभागीझाला. त्याच्या संयमी वकाळजीपूर्वक अवलंबलेल्या धोरणामुळे अखेर समझोता झाला. याबद्दलडिझरेली आणिसॉल्झबरी यांना व्हिक्टोरिया महाराणीने ‘ ऑर्डर ऑफद कार्टर’ या बहुमानाने सन्मानित केले.

डिझरेलीच्या मृत्यूनंतर (१८८१) सॉल्झबरी हुजूर पक्षाचा नेता आणिहाउस ऑफ लॉर्ड्‌समधील विरोधी पक्षाचा नेता झाला. त्याच्या हुजूरपक्षातील अल्पशा अमदानीत ( जून १८८५– जानेवारी १८८६) पंतप्रधानम्हणून त्याची निवड झाली. त्यावेळी आयर्लंडचा प्रश्न गहन होता. त्यानेग्लॅडस्टनच्या आयर्लंडला होमरुल देण्याच्या तत्त्वाला विरोध केल्यामुळेपुढेत्याची सलग तीन वेळा पंतप्रधानपदी (१८८६–९२, १८९५–१९००आणि १९००–०२) निवड झाली. या काळात त्यानेपरराष्ट्र सचिवआणि पंतप्रधान ही दोन कार्यालये एकत्र करुन सर्व सूत्रे आपल्या हातीघेतली. त्याने शक्यतो यूरोपीयराष्ट्रांतील दक्षिण आफ्रिका प्रश्नातीलसंघर्ष टाळला. त्याच्या काळात आफ्रिकेचे वसाहतिक विभाजन पूर्णझाले. फ्रान्सनेनाईलच्या बाबतीत ब्रिटिशांचे वर्चस्व मान्य केले. तोपूर्णतः साम्राज्यवादीआणि वसाहतवादी होता. त्याला ऑटोमनसारख्या जुन्या साम्राज्यांविषयीसहानुभूती नव्हती तथापि तुर्कस्तानमधीलआर्मेनियन संघर्षात (१८९५-९६) त्याला यूरोपीय राष्ट्रांचे सहकार्यमिळविण्यात अपयश आले. त्याने अमेरिकनांच्या व्हेनेझुएलाविषयीच्याधाकाला भीक घातली नाही किंवा जर्मनीच्या कैसर विल्यमने पॉलक्रूगरला पाठविलेल्या तारेमुळे (१८९६) विचलित होऊन आपल्याधोरणात फरक केलानाही. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकातयूरोपीय राष्ट्रांनी मैत्रीचे तह केले तथापि त्याच्या नेतृत्वाखालील ब्रिटननेस्वतःचे धोरण राबविले. एवढेच नव्हे, तर चेंबरलिनच्या प्रयत्नांनाही( जर्मनीबरोबर मैत्रीचा तह ) प्रतिसाद दिला नाही.

उत्तर आयुष्यात त्याच्यावर गुप्त समझोते केल्याचा आरोप झाला मात्र त्याची मुत्सद्दीगिरी उघड होती आणि तिचा हेतू ब्रिटनचा विकास वकल्याण हा स्पष्ट होता. अखेरच्या काळात त्याने परराष्ट्र खाते वृद्घावस्थेमुळे तसेचप्रकृतिअस्वास्थ्यामुळे लॉर्ड लॅन्सडाऊनकडे सुपूर्त केले होते.त्यावेळी ब्रिटनने जपानबरोबर मैत्रीचा तह केला (१९०२). आपल्यामतांना किंमत नाही असे दिसताच तो निवृत्त झाला (१९०२). त्यानंतरएक वर्षाने त्याचे वृद्घापकाळाने हॅटफील्ड येथे निधन झाले. लॉर्ड्‌स सभागृहातील नेत्याला पंतप्रधान करण्याची प्रथा त्यानंतर केव्हाही उद्‌भवलीनाही, म्हणून त्यास अखेरचा शाही ( ॲरिस्टॉकॅटिक) मुत्सद्दी मानतात.

संदर्भ : 1. Cecil, Lady Gwendolen, Life of Robert, Marquis of Salisbury, 4 Vols., London, 1921–32.

     2. Taylor, Robert G. Lord Salisbury, London, 1975.

देशपांडे, सु. र.