सॉलोमन बेटे : पॅसिफिक महासागराच्या दक्षिण-पश्चिमभागातील एक स्वतंत्र द्वीपसमूह. ऑस्ट्रेलियापासून ईशान्येस सु. १,६००किमी.वर, तर न्यू गिनी बेटाच्या पूर्वेस सु. ४८५ किमी.वर हा द्वीपसमूहआहे. या देशात ⇨ ग्वॉदल कॅनल,मालेता, न्यू जॉर्जिया, सॅन क्रिस्तोबल( माकीरा ), सांता इझाबेल व श्वाझल ही प्रमुख ज्वालामुखीबेटे आहेत.त्याशिवायफ्लॉरिडा व रसेल हा लहान गट शॉर्टलंड, मोनो, व्हेलालाव्हेला, कॉलॉम्बांगारा, रानाँग्गा, गीझो व रेंदोव्हा बेटे पूर्वेकडील सांता क्रूझ, टिकोपिया, रिफ व डफ गट दक्षिणेकडील रेनल व बलोनाउत्तरेकडील आँटाँग जावा ( लॉर्ड होवे) व अनेक लहान लहान बेटांचासॉलोमनमध्ये समावेश होतो. सॉलोमन द्वीपसमूहातील अगदी वायव्यभागात असलेल्याबूगनव्हिल ( द्वीपसमूहातील सर्वांत मोठे बेट ), बुका वकाही छोट्या बेटांचा समावेश पापुआ न्यू गिनी देशात होतो. सॉलोमनचाअक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ५°  द.ते १२° ३′ द. अक्षांशव १५५°  ३०′ पू. ते १६९°  ४५′पू. रेखांशयांदरम्यान आहे. याद्वीपसमूहाचा आग्नेय-वायव्य विस्तार १,६८८ किमी. तर ईशान्य-नैर्ऋत्य विस्तार ४६८ किमी. आहे.याचे भूक्षेत्र सु. २८,३७० चौ. किमी. असले,तरी पॅसिफिक महासागराच्या ६,००,००० चौ. किमी. क्षेत्रात ही बेटेविस्तारलेली आहेत. लोकसंख्या ५,५२,२६७ (२०११ अंदाज ) आहे.ग्वॉदल कॅनल ( क्षेत्रफळ ५,६६८ चौ. किमी.) या देशातील सर्वांतमोठ्या बेटावरील होनीआरा ( लोकसंख्या ७९,५४२–२०११ अंदाज )हे राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : सॉलोमनमधील प्रमुख बेटे वायव्य-आग्नेय दिशेत परंतुएकमेकांना समांतर अशा रांगांमध्ये पसरली असून ती आग्नेयीस सॅनक्रिस्तोबल बेटात एकत्रित आलेली दिसतात. यातील प्रमुख बेटेओबडधोबड, पर्वतीय व ज्वालामुखीयअसून अनेक लहान बेटे कमीउंचीची प्रवाळ कंकणद्वीपे आहेत. मोठ्या बेटांवरील पर्वतश्रेण्यांमध्ये अनेकठिकाणी तुटलेलेकटक व सोंडी असून त्यांदरम्यान खोल व अरुंद दऱ्या आहेत. पर्वतश्रेण्यांमधील अनेक शिखरे सस.पासून १,२०० मी. पेक्षाअधिक उंचीची आढळतात. ग्वॉदल कॅनल बेटावरील काव्हो पर्वतश्रेणीतील पोपमनासीऊ ( उंची २,४४० मी.) हेसर्वोच्च शिखर आहे.याच बेटावर सर्वाधिक सपाट किनारी मैदान आहे. अनेक जागृत ज्वालामुखी येथे आहेत. मोठ्याबेटांवरील नद्या नेहमीच पूरक असून त्यांचीऊर्जानिर्माणक्षमता मोठी आहे.

सॉलोमन बेटाचे हवामान विषुववृत्तीय प्रकारचे आहे. एप्रिल ते नोव्हेंबरया कालावधीत कोरड्या आग्नेय व्यापारी वाऱ्यांमुळे येथील हवामान शीतराहते, तर डिसेंबर ते मार्च या कालावधीत वायव्य विषुववृत्तीय वाऱ्यांमुळेतापमान वाढून मोठ्या  प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. पावसाळ्यातकधीकधीविनाशकारी चकीवादळे येथे येऊन धडकतात. सरासरी पर्जन्यमान २००ते ३०० सेंमी.च्या दरम्यान, तर तापमान २०º ते३२ ºसे. यांदरम्यानअसते. येथील ७७·६ टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे.विशेषतः अंतर्गतभागातील शिखरे घनदाट अरण्यांनी व्यापलेली आहेत. बेटांच्या किनारीभागांत विस्तृत दलदली प्रदेश, कच्छ वनश्री व नारळाचे वृक्ष आढळतात.

इतिहास : सॉलोमन बेटांवर इ. स. पू. २००० च्या दरम्यानऑस्ट्रोनियन भाषिक लोकांनी वस्ती केली असावी. बायबल च्याजुन्याकरारातील सॉलोमन राजाचे नाव या बेटांना देण्यात आले. स्पॅनिश नाविकव समन्वेषक अल्व्हारो दे मेंडाना दे नेईरा हा सॉलो न बेटांपर्यंतपोहोचणारा पहिला यूरोपियन असावा (१५६८). त्याने १५९५ मध्येपुन्हा येथे येऊन सांता क्रूझ द्वीपसमूहात वसाहत स्थापन करण्याचाअयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर डच, फ्रेंच व ब्रिटिशांनी या बेटांचेसमन्वेषण करुन त्यांवर आपले हक्क सांगितले. त्यानंतर दोनशे वर्षांनीइ. स. १७६७ मध्ये ब्रिटिश मार्गनिर्देशक सॅम्युएल वॉलिस याच्यासफरीतील दुसऱ्या जहाजाचा कमांडर फिलीप कार्टेरेट याने पुन्हा ही बेटेशोधली. फ्रेंच समन्वेषक ल्वी आंत्वान देबूगँव्हील याने १७६८ मध्येउत्तर सॉलोमन बेटांचा शोध लावला. ब्रिटिश मिशनरींनी १८५० च्यादशकात या बेटांवरस्थानिक लोकांबरोबर आपल्या कार्यास सुरुवातकरुन १८७० च्या दशकात येथे वसाहत स्थापन केली. जर्मनांनी उत्तरसॉलोमनवर आपला हक्क सांगितला (१८८५). १८९३ मध्ये ब्रिटननेदक्षिणेकडील काही बेटे ब्रिटिश रक्षित राज्येम्हणून घोषित केली.ब्रिटन व जर्मनी यांच्यात झालेल्या करारानुसार १८९८-९९ मध्ये जर्मनांनीपश्चिमसामोआवरील आपला हक्क मान्य करुन घेऊन त्याच्या बदल्यातआपल्या ताब्यातील सॉलोमन बेटे ब्रिटनला हस्तांतरित केली.

दुसऱ्या महायुद्घकाळात जपानी सैन्याने १९४२ मध्ये सॉलोमनबेटांवर हल्ला करुन त्यांवर ताबा मिळविला होता. त्यानंतरपुढील तीनवर्षे सॉलोमन बेटांवर–विशेषतः ग्वॉदल कॅनल बेटावर–युद्घ लढले गेले.दुसरे महायुद्घ संपुष्टात आल्यानंतर १९४६–५० या कालावधीत याबेटांवर ‘मार्चींग रुल’ नावाची स्वातंत्र्य चळवळ उदयास आली. ब्रिटनने१९७० मध्ये या बेटांना नवीन संविधान दिले. त्यात काही स्थानिकलोकप्रतिनिधींसह अधिशासक परिषद स्थापण्याची तरतूद होती. १९७५मध्ये ब्रिटनच्या रक्षित राज्यालाअंतर्गत स्वयंशासनाची मान्यतामिळाली. तसेच ब्रिटिश सॉलोमन रक्षित बेटेयाऐवजी सॉलोमन बेटेअसे नाव बदलण्यात आले. त्यानंतर ७ जुलै १९७८ रोजी सॉलोमनबेटांना संपूर्ण स्वातंत्र्य बहालकरण्यात आले.

या देशात संसदीय शासनपद्घती आहे. एकसदनी राष्ट्रीय संसद असूनत्यात सार्वत्रिक प्रौढ मतदानपद्घतीने चार वर्षांसाठी निवडून दिलेले ६०सदस्य असतात. संसद सदस्यांमधून पंतप्रधानांची निवड केली जाते.गव्हर्नर-जनरल हा देशाचाप्रमुख असून त्याची निवड संसदेच्यासल्ल्यानुसार पाच वर्षांसाठी केली जाते. पंतप्रधानांच्या शिफारशीनुसारगव्हर्नरजनरल इतर मंत्र्यांची नेमणूक करतात. सॉलोमन बेटाची विभागणीनऊ प्रांतांमध्ये करण्यात आलेली आहे.


आर्थिक स्थिती : सॉलोमन हा विकसनशील देश आहे. येथेखुली अर्थव्यवस्था असून ती प्रामुख्याने कृषी, मासेमारी, लाकूड कापकामयांवर आधारित आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या फक्त २ टक्के क्षेत्रलागवडीखाली आहे. सुके खोबरे, नारळ, पामतेल व कोको ही प्रमुखनगदी पिके असून, रताळी, तारो, पाम, तांदूळ, केळी व भाजीपाला हीउदरनिर्वाहक पिकेघेतली जातात. सन २००३ मधील अंदाजे कृषीउत्पादने पुढीलप्रमाणे (उत्पादन हजार टनांत ) : नारळ ३३०, रताळी८३, तारो ३८, पामतेल ३४, याम २८, सुके खोबरे ३०, पाम मगज८. पशुपालनात प्रामुख्याने डुकरे व गुरे पाळली जातात.डुकरे ६८,०००व गुरे १३,००० असे पशुधन होते (२००३ अंदाज ). मासेमारीव्यवसायही महत्त्वाचा असून मुख्यतः ट्यूना माशांची पकड केली जाते.सन २००५ मध्ये एकूण २८,५२० टन मत्स्योत्पादन झाले. पामतेलनिर्मिती, प्रक्रियाकृतमत्स्योत्पादने, भात सडणे, मासे डबाबंदीकरण,मासे गोठविणे, लाकूड चिरकाम, अन्न व तंबाखू प्रक्रिया, सौम्य पेये,फर्निचर निर्मिती इ. उद्योग येथे चालतात. लाकूड उद्योगातील बहुतांशउत्पादनांची निर्यात केली जाते. लाकूड उत्पादन६,९२,००० घ. मी.होते (२००३). १९९७ मध्ये वनसंसाधनांपासून ३०९·४ द. ल.सॉलोमन आयलंड डॉलर इतके उत्पन्नमिळाले. सोने उत्पादन ३,४५६किग्रॅ . तर चांदी उत्पादन २,१३८ किग्रॅ. होते (१९९९). पर्यटन व्यवसायही महत्त्वाचा असून समुद्र पर्यटन व दुसऱ्या महायुद्घकाळातीलयुद्घस्थळे ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. २००२ मध्ये ३७,०००पर्यटकांनी या बेटांना भेट दिली.

सॉलोमनमधून मासे, खोबरे, लाकूड व पामतेल यांची निर्यात प्रामुख्यानेजपान, ग्रेट ब्रिटन, फिलिपीन्स व दक्षिण कोरियाला केली जाते. अन्नपदार्थ,जिवंत प्राणी, खनिज इंधन व वंगण, यंत्रसामग्री व वाहतुकीची साधनेयांची आयात प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, न्यूझीलंड या देशांकडूनकेली जाते. एकूण आयात व निर्यात मूल्य अनुक्रमे २१६·९ द. ल. व१२१·६ द. ल. अमेरिकी डॉलर होते (२००६).

पर्वतीय व जंगलमय प्रदेशांमुळे रस्तेबांधणी व त्यांची देखभालकरणे जिकिरीचे ठरते. सॉलोमन बेटांवर एकूण १,३६० किमी. लांबीचेरस्ते असून त्यांपैकी ३४ किमी. लांबीचे रस्ते फरसबंदी आहेत (२००२).सर्व बेटांदरम्यान तसेच ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन व जपानशी नियमितजलवाहतूक चालते. होनीआरा, यानदीना, नॉरो ही प्रमुख बंदरे आहेत.होनीआरा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सॉलोमन आयलंड डॉलरहे येथील अधिकृत चलन आहे. सेंट्रल बँक ऑफ सॉलोमन आयलंड्सही मध्यवर्ती बँक आहे.

लोक व समाजजीवन : सॉलोमनच्या एकूण लोकसंख्येत ९३ टक्केलोक मेलानीशियन वंशाचे आहेत. त्याशिवाय पॉलिनीशियन, मायक्रोनीशियन, यूरोपियन व चिनी वंशाचे लोक येथे राहतात. इंग्रजी ही अधिकृतभाषा आहे. इंग्रजीवरआधारित ‘पिजन इंग्लिश’ ही भाषा सर्वत्र बोललीजाते. सुमारे ८५ टक्के लोक मेलानीशियन भाषा बोलतात. एकूण सु. १२० स्थानिक भाषा बोलल्या जातात. सुमारे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक लोकख्रिस्ती धर्मीय व प्रामुख्याने प्रॉटेस्टंट पंथीय आहेत. ग्रामीण भागात सु. ८०टक्क्यांपेक्षा अधिक लोक राहतात. आरोग्यविषयक चांगली काळजीघेतली जाते. क्षयरोगाचे निर्मूलन होत आले असले, तरी हिवतापाचीसमस्या अद्याप टिकून आहे. दरहजारी जन्मप्रमाण ३३ व मृत्यूमान ४·६होते(२००२ अंदाज ). १९९२–२००२ या दशकातील वार्षिक लोकसंख्या वाढीचा वेग ३·२ टक्के होता. सरासरी प्रसूतिमान प्रति स्त्री ४·२अपत्ये असे होते (२००४). सरासरी आर्युमान ७१ वर्षे आहे. येथे ११रुग्णालये, ३१ डॉक्टर व ४६४ नोंदणीकृतपरिचारिका होत्या (१९९७).

शिक्षण सक्तीचे नाही. विशिष्ट वयाच्या मुलांना शासकीय व चर्चसंचालित शाळांमधून औपचारिक शिक्षण दिले जाते. २००२मध्ये प्राथमिकशाळांत ८२,३३० विद्यार्थी तर माध्यमिक शाळांत २१,७०० विद्यार्थीशिक्षण घेत होते. महाविद्यालयीनस्तरावर शिक्षक प्रशिक्षण, व्यापार वव्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. होनीआरा येथे साऊथ पॅसिफिकविद्यापीठ आहे. प्रौढ साक्षरतेचे प्रमाण ६२ टक्के होते (१९९८). टिकोपियाहे सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले बेट असून होनीआरा हे सर्वांत मोठे शहर आहे. ( चित्रपत्र ).

चौधरी, वसंत


सॉलोमन बेटे