साऊँ टोमे ई प्रीन्सिपे : अधिकृत नाव डेमॉक्रॅटिकरिपब्लिक ऑफ साऊँ टोमे ई प्रीन्सिपे. पोर्तुगीज नाव रिपब्लिकडेमॉक्रॅ टिक दी साऊँ टोमे ई प्रीन्सिपे. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यालगतचाएक द्वीपरूप डेमॉक्रॅ टिक देश व पोर्तुगालचा भूतपूर्व सागरपारप्रांत. आफ्रिकेच्या मुख्य भूमीवरील गाबाँच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस सु.२०० किमी., अटलांटिक महासागरातील गिनीच्या आखातात ही बेटेआहेत. साऊँ टोमे व (ई) प्रीन्सिपे या दोन प्रमुख बेटांव्यतिरिक्तकारोको, पेद्रास, तिन्होसास व रोलास या लहान द्वीपकांचा यांत समावेशहोतो. देशाचा अक्षवृत्तीयविस्तार ०°ते ०°३०’ उत्तर अक्षांश वरेखावृत्तीय विस्तार ६°२५’ पू. ते ६°५०’ पूर्व रेखांश आहे. एकूणक्षेत्रफळ १,००१ चौ. किमी. असून त्यांपैकी साऊँ टोमे बेटाचे क्षेत्रफळ८३७ चौ. किमी. व प्रीन्सिपे बेटाचे १२७ चौ. किमी. आहे. साऊँ टोमे बेट लंबवर्तुळाकार असून त्याची लांबी ४९ किमी. व रुंदी३२ किमी., तर प्रीन्सिपे बेटाची लांबी १६ किमी. व रुंदी ८ किमी.आहे. साऊँ टोमे बेटाच्या ईशान्येस १४५ किमी.वर प्रीन्सिपे बेट असूनदेशाला २६६ किमी. लांबीचा किनारा लाभला आहे. देशाचीलोकसंख्या १,६५,००० (२०१० अंदाज) होती. साऊँ टोमे (लोकसंख्या ६०,०००–२०१०) हे राजधानीचे ठिकाण आहे.
भूवर्णन : साऊँ टोमे व प्रीन्सिपे या दोन्ही बेटांची निर्मिती ज्वालामुखीक्रियेतून झालेली आहे. मात्र अलीकडच्या काळात येथे ज्वालामुखीउद्रेक झाल्याची नोंद नाही. दोन्ही बेटांचे ईशान्य भाग सखल असूनमध्यवर्ती भाग ज्वालामुखीउच्चभूमीचे आहेत. साऊँ टोमे बेटावरीलपश्चिमेकडील पर्वतीय प्रदेशात साऊँ टोमे (उंची २,०२४ मी.) हे सर्वोच्चशिखर आहे. या बेटाचा पूर्वेकडील उतार मंद आहे. प्रीन्सिपे बेटाचाउत्तरेकडील अर्धा भाग मैदानी, तर दक्षिणेकडील पर्वतीय असून तेथीलप्रीन्सिपे (उंची ९४८ मी.) हे या बेटावरील सर्वाधिक उंचीचे शिखरआहे. दोन्ही बेटांवर शीघ्रवाही ओढे आहेत. एकही मोठी नदी नाही.
येथील हवामान उष्णकटिबंधीय असून त्यावर प्रदेशाची उंची वबेंग्वेला थंड सागरी प्रवाहाचा परिणाम झालेला दिसून येतो. दोन्हीबेटांच्या सखल भागात हवामान उष्ण व दमट असून अधिकउंचीवर तापमान कमी व पर्जन्यमान अधिक असते. वार्षिक सरासरीतापमान सखल भागात २७° से. आणि ६०० मी. पेक्षा अधिक उंचीच्याप्रदेशात ते २०° से. आढळते. ऑक्टोबर ते मे पावसाळा, तर जून तेसप्टेंबर कोरडा ऋतू असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान सखल भागात१०० सेंमी. तर पर्वतीय प्रदेशात ३८० ते ५१० सेंमी. असते.
पूर्वी या बेटांचा बहुतांश भाग उष्णकटिबंधीय वर्षारण्यांनी व्यापलेलाहोता. अलीकडे ९०० मी. पेक्षा कमी उंचीच्या बऱ्याचशा प्रदेशातीलअरण्ये तोडून ते क्षेत्र शेतीखाली आणले आहे. दोन्ही बेटांच्या उत्तरेकडीलव ईशान्येकडील सखल प्रदेशात काही प्रमाणात गवत व जंगल आढळते.
इतिहास : पोर्तुगीज समन्वेषक पेद्रो एस्कोबार व जोआँ दे सांतारेम यांनी प्रथम १४७० मध्ये साऊँ टोमे बेटाचा तर १४७१ मध्ये प्रीन्सिपेबेटाचा शोध लावला. त्यावेळी ही बेटे निर्मनुष्य असावीत. पोर्तुगीजांनीयावर वसाहत स्थापन केली. गुन्हेगार व पोर्तुगालमधून हद्दपार केलेल्याज्यूलोकांना ठेवण्यासाठी पोर्तुगालकडून या बेटांचा वापर केला जाऊलागला. तसेच आफ्रिकेतून गुलाम आणून त्यांच्याकडून या बेटांवर ऊसलागवड केली. काही काळ साऊँ टोमे हे दक्षिण अमेरिकेकडे पाठवावया च्या गुलामांच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. १५२२ मध्ये त्यासपोर्तुगीज शासनाने वसाहतीचा अधिकृत दर्जा दिला. सतराव्या शतकाच्यामध्यात डचांनी अल्पकाळ त्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली होती.एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कोकोच्या यशस्वी लागवडीमुळे हीवसाहत भरभराटीस येऊ लागली. पोर्तुगालने अधिकृत रीत्या येथीलगुलामगिरी नष्ट केली असली तरी, या बेटांवरील मळ्याच्या शेतीत कामकरण्यासाठी अंगोला, मोझँबीक, केप व्हर्द येथून करारावर आणलेल्याकामगारांना प्रत्यक्षात गुलामांसारखीच वागणूक दिली जात होती. त्यामुळेब्रिटिश व जर्मन चॉकोलेट उत्पादकांनी १९०९ मध्ये साऊँ टोमेच्याकोकोवर बहिष्कार घातला. इतर वसाहतींप्रमाणेच साऊँ टोमे ई प्रीन्सिपे वसाहतीला १९५१ मध्ये पोर्तुगीजांच्या सागरपार प्रांताचा दर्जा देण्यातआला. मळ्याच्या शेतीतील कामगारविषयक जाचक अटींच्या विरोधात१९५२ ते १९७३ या काळात अनेकदा संप करण्यात आले. १९५३मध्ये पोर्तुगीज सत्तेविरोधात येथे बंड करण्यात आले होते. १९६० पासूनसाऊँ टोमे ई प्रीन्सिपेच्या स्वातंत्र्यासाठीलगतच्या मुख्य आफ्रिकन भूमीवरुन अनेक चळवळी उभारल्या गेल्या. मॅन्युएल पिंटो दा कॉस्टा यांनीया स्वातंत्र्य चळवळींचे नेतृत्व केले. १९६० व १९७० च्या दशकातीलआफ्रिकन राष्ट्रवादी व पोर्तुगीज वसाहतवादी यांच्यातील वादात साऊँ टोमे ई प्रीन्सिपे बेटावरील लोकांनी अगदी नगण्य भूमिका बजावली होती.१९७० मध्ये पोर्तुगालने १६ सदस्यीय विधानमंडळ व प्रांतीय सल्लगारमंडळ स्थापन केले. १९७४ मध्ये पोर्तुगालच्या क्रांतिकारी शासनानेआफ्रिकेतील त्यांच्या ताब्यातील प्रदेशांना स्वातंत्र्य देण्याचे आश्वासनदिले. १२ जुलै १९७५ रोजी ही बेटे स्वतंत्र झाली.
सन १९९० पर्यंत मूव्हमेंट फॉर द लिबरेशन ऑफ साऊँ टोमे ई प्रीन्सिपे हाच देशातील एकमेव राजकीय पक्ष होता. सप्टेंबर १९९०मध्ये अस्तित्वात आलेल्या संविधानानुसार हा बहुपक्षीय लोकशाही देशबनला. ५५ सदस्य असलेल्या नॅशनल पीपल्स असेंब्ली या राष्ट्रीयविधान मंडळ सदस्यांची निवड चार वर्षांसाठी सार्वत्रिक प्रौढ मतदानपद्घतीने करण्यात येते. सार्वत्रिक मतदान पद्घतीने निवडण्यात आलेल्याराष्ट्राध्यक्षांची मुदत पाच वर्षांसाठी असते.
आर्थिक स्थिती : साऊँ टोमे ई प्रीन्सिपेची अर्थव्यवस्था अंशतःशासननियंत्रित व अंशतः खाजगी स्वरुपाची असून ती प्रामुख्याने शेतीव मासेमारी व्यवसायांवर आधारित आहे. ज्वालामुखीक्रियेतून याबेटांची निर्मिती झालेली असल्याने ज्वालामुखीखडकांचे विदारण होऊनत्यांपासून येथील मृदा अतिशय सुपीक बनली आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात२० टक्के वाटा कृषी उत्पादनांचा, १७ टक्के औद्योगिक उत्पादनांचा तर६३ टक्के सेवा उद्योगांचा आहे. सोळाव्या शतकात ऊसाची शेती विशेषभरभराटीस आली होती परंतु ब्राझीलमधील ऊस उत्पादकांशी स्पर्धानिर्माण झाल्याने येथील ऊसाखालील क्षेत्र घटले. त्याऐवजी एकोणिसाव्याशतकात कॉफी व कोकोची लागवड करण्यात आली. पहिल्यामहायुद्घापूर्वीच्या काळात कोको उत्पादनात साऊँ टोमे जगात अगेसरहोते. देशातील सु. ४० टक्के क्षेत्र लागवडीखाली असून ते प्रामुख्यानेकिनारी सखल भागात आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्रांपैकी ८० टक्केक्षेत्रावर मोठे राष्ट्रीयीकृत किंवा परकीयांच्या मालकीचे मळे असून उर्वरितक्षेत्रावर लहान खाजगी मालकीस परवानगी आहे. स्वातंत्र्योत्तर काळातदेशातील २०० हेक्टरांपेक्षा अधिक धारणा असलेल्या शेतजमिनींचेराष्ट्रीयीकरण करून त्यांचा समावेश १५राज्यशेतांमध्ये करण्यात आला.१९८५ मध्ये त्याचे अंशतः खाजगीकरण करण्यात येऊन परकीयकंपन्यांशी त्याच्या व्यवस्थापनाचा करार करण्यात आला. तसेच काही राज्यशेते लहान खाजगी व्यक्तींना वितरित करण्यात आली आहेत. कोकोहे प्रमुख नगदी पीक असून एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी निम्मेक्षेत्र या पिकाखाली आहे. त्याशिवाय नारळ, ताड, केळी, कॉफी, कसाव्हा, मका, भाकरीची झाडे (ब्रे ड ट्री) यांची लागवड केली आहे.सन २००३ मध्ये पुढीलप्रमाणे कृषी उत्पादने झाली (उत्पादन हजारटनांत) : केळी २७, नारळ २७, कसाव्हा ६, ताडाचा गर ४, कोकोबिया ३, मका २, पामतेल २.
देशात ५,००० शेळ्या ४,००० गुरे ३,००० मेंढ्या व २,०००डुकरे असे पशुधन होते (२००३ अंदाज). खोल सागरी प्रदेशातप्रामुख्याने ट्यू ना मासे पकडण्याचा प्रमुख व्यवसाय असून त्याचाविकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सन २००४ मध्ये ४,१४१टन मत्स्योत्पादन झाले. देशातील २७,००० हेक्टर म्हणजेच देशाच्याएकूण क्षेत्रफळाच्या २८.४ टक्के क्षेत्र अरण्यांखाली होते (२००५). सन२००३ मध्ये एकूण सु. ९,००० घ. मी. लाकूड उत्पादन झाले. क्विनीनउत्पादनासाठी सिंकोना झाडाच्या सालीचे उत्पादन घेतले जाते. स्थानिकगरजा भागविण्याच्या दृष्टीने अरण्योत्पादने कमी पडतात. दोन्ही बेटांभोवतीखनिज तेलाचे विस्तृत साठे आहेत.
राष्ट्रीय स्थूल उत्पादनात निर्मिती उद्योगाचा वाटा फक्त ४.२ टक्के आहे(२००१). मर्यादित प्रमाणात कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योगयेथे चालतात. बीअर व पामतेल निर्मिती, लाकडावरील प्रक्रिया, विटा, मृत्तिकाशिल्प, छपाई, वस्त्रोद्योग, साबणनिर्मिती इ. उद्योग येथे चालतात.स्थानिक बाजारपेठेसाठी पाव, बिस्किटे, मद्य यांचे उत्पादन घेतले जाते.१९७५ मधील स्वातंत्र्यापूर्वी पोर्तुगीज मळेमालक, मुलकी अधिकारी वव्यापारी देशातून निघून जाण्याने तसेच त्यादरम्यान अंगोलातून हद्दपारझालेले लोक येथे आल्यामुळे येथील अर्थव्यवस्था डळमळीत बनली.त्यामुळे कोकोची निर्यातही घटली. बहुतांश खाद्यपदार्थ आयात करावेलागतात. उपासमार ही सातत्याने भेडसावणारी समस्या आहे. देशाच्याएकूण निर्यातीत ८० टक्के वाटा कोकोचा असतो. एकूण निर्यातीपेक्षाआयातीचे प्रमाण अधिक राहिले आहे. कोको, कॉफी, खोबरे, पामतेल, ताडाच्या झाडाचा गर (कार्नेल), सिंकोनाची साल, केळी ह्या प्रमुखनिर्यात वस्तू आहेत. खाद्यपदार्थांच्या प्रमुख आयातीव्यतिरिक्त यंत्रे, विद्युत्साहित्य, खनिज तेल, उत्पादने यांची आयात केली जाते. जर्मनी, पोर्तुगाल, नेदर्लंड्स, स्पेन हे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत.
दोब्रा हे अधिकृत चलन असून १०० सेंटिमॉसचा एक दोब्रा होतो.बँको सेंट्रल दे साऊँ टोमे ई प्रीन्सिपे ही मध्यवर्ती बँक असून बँकोइंटरनॅशनल दे साऊँ टोमे ई प्रीन्सिपे ही प्रमुख खाजगी व्यापारी बँकयेथे आहे.
वाहतूक व संदेशवहनाच्या सुविधा मर्यादित आहेत. साऊँ टोमे शहरहवाई वाहतूक मार्गाने प्रीन्सिपे बेटाशी तसेच लिब्रव्हिल (गाबाँ), लुअँडा(अंगोला), लिस्बन (पोर्तुगाल), केप व्हर्द बेटे यांच्याशी जोडलेलेआहे. येथील रस्त्यांची एकूण लांबी ३९० किमी. होती (२००२). साऊँ टोमे हे प्रमुख बंदर असले तरी त्याची खोली कमी आहे. नेव्हेसहे प्रमुख मासेमारी बंदर असून त्यातून प्रामुख्याने खनिज तेलाची आयातकेली जाते.
लोक व समाजजीवन : साऊँ टोमे ई प्रीन्सिपेची लोकसंख्यामिश्र स्वरूपाची असली तरी आफ्रिकन वंशाचे आधिक्य आहे.आफ्रिकेच्या पश्चिम किनारी भागातून पूर्वी आणण्यात आलेले गुलाम, दक्षिण यूरोपातील (प्रामुख्याने पोर्तुगीज) वसाहतकरी तसेच अंगोला, केप व्हर्द बेटे वमोझँबीकमधून करारावर आणलेले कामगार यांचे वंशजयेथील लोकसंख्येत आढळतात. सु. ८१ टक्के लोक रोमन कॅथलिकपंथाचे होते (२००१). एकूण लोकसंख्येपैकी ९५ टक्के लोक साऊँ टोमे बेटावर राहत असून उर्वरित प्रीन्सिपे बेटांवर राहतात. लोकसंख्येची घनतादर चौ. किमी.ला १६३ आहे. येथील जन्मप्रमाण जास्त असून मृत्युमानकमी आहे. सरासरी आयुर्मान पुरुषांच्या बाबतीत ६३.५ वर्षे व स्त्रियांबाबत ६८.५ वर्षे होते (२००६). पोर्तुगीज ही देशाची अधिकृत भाषाआहे. त्याशिवाय फांग, बांतू, पोर्तुगीज क्रीओल तसेच क्रीओलप्रकारातील इतर भाषा बोलल्या जातात. सहा वर्षांवरील सर्वांना शिक्षणमोफत व सक्तीचे आहे. देशातील ९० प्राथमिक शाळांत ३२,६१६विद्यार्थी व १० माध्यमिक विद्यालयांत ८,३८० विद्यार्थी शिक्षण घेतहोते (२००७–०८). उच्च शिक्षण देणाऱ्या दोन शैक्षणिक संस्था आहेत.सन २००६ मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या वयोगटातील ९६ टक्के मुलेशाळेत जात होती. साक्षरतेचे प्रमाण ५७ टक्के होते (१९९८). देशातीलसर्व नागरिकांना वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध आहे. बहुतांश आफ्रिकनदेशांच्या तुलनेत येथे दरडोई डॉक्टरांची संख्या अधिक आहे. येथे ८१वैद्यक, ११ दंतवैद्यक व ३०८ परिचारिका होत्या (२००४). आफ्रिकेतील सर्वांत कमी बालमृत्युमान येथे आहे. साऊँ टोमे हे देशातीलएकमेव मोठे शहर आहे. सन २००२ मध्ये ९,००० पर्यटकांनी याबेटांना भेट दिली. (चित्रपत्र).
चौधरी, वसंत
“