सं क्र मणी मूलद्रव्ये : (ट्रँझिशन एलेमेंट्स). लोह-त्रयी व प्लॅटिनम-त्रयी गटांतील मूलद्रव्यांना ⇨दमित्री इव्हानव्ह्यिच मेंडेलेव्ह या रशियन रसायनशास्त्रज्ञांनी प्रथम संक्र मणी मूलद्रव्ये असे नाव दिले [⟶ आवर्त सारणी]. संक्रमणी या संज्ञेस विशिष्ट रासायनिक गर्भितार्थ नाही. ती एक सोयीची संज्ञा असून तिच्यामुळे मूलद्रव्यांच्या आणवीय संरचनेतील व गुणधर्मांतील साम्य ओळखता येते [⟶ अणु व आणवीय संरचना]. आधुनिक इलेक्ट्रॉन विन्यासान्वये ज्या मूलद्रव्यांच्या अणूंमधील इलेक्ट्रॉनांची d अगर f कक्षा अंशत: भरलेली आहे, त्यांना संक्र मणी मूलद्रव्ये म्हणतात. मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीत मध्यभागी असलेला ३ ब, ४ ब, ५ ब, ६ ब, ७ ब, ८, १ ब आणि २ ब हा धातूंचा गट साधारणपणे संक्र मणी मूलद्रव्ये म्हणून ओळखतात. ॲक्टिनियम (८९) तेलॉरेन्सियम (१०३) या ॲक्टिनाइड श्रेणीचाही संक्र मणी मूलद्रव्यांत समावेश करतात. उच्च घनता, उच्च वितळबिंदू आणि नीच बाष्प दाब ही संक्र मणी मूलद्रव्याची वैशिष्ट्ये आहेत. (नोंदीमध्ये मूलद्रव्यानंतर कंसात दिलेली संख्या अणुक्र मांक दर्शविते).

संक्र मणी मूलद्रव्यांच्या प्रमुख श्रेण्या तीन आहेत. पहिल्या श्रेणीची सुरूवात स्कँडियम (२१) या मूलद्रव्याने होते आणि शेवट जस्त (३०) ह्याने होतो. दुसऱ्या श्रेणी मध्ये इट्रि यम (३९) ते कॅडमियम (४८) या मूलद्रव्यांचा समावेश होतो. तिसऱ्या श्रेणीचा विस्तार लँथॅनम (५७) ते पारा (८०) असा आहे. तिसऱ्या श्रेणीत विरल मृत्तिका द्रव्यांचा म्हणजे सिरियम (५८) ते ल्युटेशियम (७१) या मूलद्रव्यांचा समावेश आहे. स्कँडियम, इट्रि यम आणि लँथॅनम ही मूलद्रव्ये इतर संक्र मणी मूलद्रव्यांसारखी समधर्मी संयुगे तयार करीत नाहीत, म्हणून ही मूलद्रव्ये प्रमुख संक्र मणी मूलद्रव्यांमधून वगळतात. जस्त, कॅडमियम व पारा यांच्या अणूंमधील इलेक्ट्रॉनांची d कक्षा पूर्ण भरलेली असते, त्यामुळे आधुनिक इलेक्ट्रॉन विन्यासाप्रमाणे केलेल्या संक्र मणी मूलद्रव्यांच्या व्याख्येतही मूलद्रव्ये बसत नाहीत. म्हणून पहिल्या श्रेणीतील टिटॅनियम ते तांबे, दुसऱ्या श्रेणीतील झिर्कॉन ते चांदी आणि तिसऱ्या श्रेणीतील हाफ्नियम ते सोने ही २४ मूलद्रव्ये प्रमुख संक्र मणी मूलद्रव्ये म्हणून मानली जातात. मराठी विश्वकोशात सर्व संक्र मणी मूलद्रव्यांवर स्वतंत्र नोंदी असून त्या यथास्थळी दिलेल्या आहेत. तसेच इलेक्ट्रॉन विन्यासासंबंधी चे वर्णन ‘अणु व आणवीयसंरचना’ या नोंदीत दिले आहे.

शोध आणि गुणधर्म : लोखंड, तांबे, चांदी आणि सोनेही नेहमीची चार संक्र मणी मूलद्रव्ये पुरातन काळापासून माहीत आहेत. इतर संक्र मणी मूलद्रव्ये अठराव्या शतकानंतर शोधली गेली. १९२५ मध्ये ही नियम हे संक्र मणी मूलद्रव्य प्लॅटिनम धातुकामध्ये आणि निओबियमाचे खनिज कोलंबाइट यांमध्ये आढळले. टेक्नेशियम (४३) हे मूलद्रव्य पृथ्वीच्या कवचामध्ये आढळत नाही. या मूलद्रव्याची सर्व समस्थानिके किरणोत्सर्गी असून ती अणुकेंद्रीय विक्रि यकातील द्विभंजन विक्रि येतील उत्पादित पदार्थांपासून मिळतात. महत्त्वाची आणि उपयुक्त अशी काही संक्र मणी मूलद्रव्ये पृथ्वीच्या कवचात फार कमी प्रमाणात आढळतात (उदा., टंगस्टन, प्लॅटिनम, सोने आणि चांदी).

पुष्कळशी संक्र मणी मूलद्रव्ये अनेक संयुजी आहेत. एका संयुजा स्थितीतून दुसऱ्या संयुजा स्थितीत जाण्याच्या क्षमतेमुळे संक्र मणी मूलद्रव्यांची संयुगे उत्प्रेरक म्हणून चांगली उपयोगी पडतात. उदा., कोबाल्टाची संयुगे विरंजक चूर्णाचे अपघटन घडवून आणण्यास उत्प्रेरक म्हणून काम करतात.

संक्रमणी मूलद्रव्ये आंतरकोशिकीय संयुगे तयार करतात. हायड्रोजन, कार्बन व नायट्रोजन यांसारख्या अधातवीय मूलद्रव्यांचे लहान अणू संक्र मणी धातूंच्या जालकामध्ये घुसू शकतात आणि हायड्राइडे, कार्बाइडे व नायट्राइडे अशी संयुगे तयार होतात. संक्रमणी मूलद्रव्ये वायूंचे शोषण करून संयुगे तयार करतातच परंतु वायूंचे मोठया प्रमाणात पृष्ठशोषण करतात. त्यामुळे वायुविक्रियेत त्यांचा उत्तम उत्प्रेरक म्हणून उपयोग होतो. या बाबतीत निकेल, पॅलॅडियम व विशेषत: प्लॅटिनम सर्वाधिक कार्यक्षम आहेत. संक्रमणी मूलद्रव्ये एकमेकांबरोबर आणि इतर धातवीय मूलद्रव्यांबरोबर उपयुक्त अशा मिश्रधातू तयार करतात.

बहुतेक सर्व संक्रमणी मूलद्रव्ये समचुंबकीय आहेत. ज्या मूलद्रव्यात अयुग्मी इलेक्ट्रॉन असतात, ती समचुंबकीय असतात आणि ज्यात युग्मी इलेक्ट्रॉन द्वय असते, ती प्रतिचुंबकीय असतात. लोह, कोबाल्ट व निकेलही मूलद्रव्ये लोहचुंबकीय आहेत. लोहचुंबकत्व हा आणवीय गुणधर्म नाही.

संक्र मणी-धातू उत्प्रेरके : संक्रमणी मूलद्रव्यांचे अणूबंध तयार करण्याकरिता सर्वांत बाहेरील कवचामधील इलेक्ट्रॉनांचाच केवळ वापर करीत नसून, आतील d कक्षातील इलेक्ट्रॉनांचाही वापर करतात. रिक्त d कक्षामध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची क्षमता संक्रमणी धातू आणि त्याची स्थिर संयुगे यांच्यामध्ये असल्यामुळे ती वारंवार उत्प्रेरकी गुणधर्म दाखवितात. यांचा वापर विविध प्रकारच्या औदयोगिक प्रकियांमध्ये उत्प्रेरक म्हणून करतात. खनिज तेल आणि बहुवारिक उदयोगांमध्ये वापरण्यात येणाऱ्या या उत्प्रेरकांमुळे कार्बनी रेणूंचे समघटकीकरण, ऑक्सिडीकरण, हायड्रो जनीकरण किंवा बहुवारिकीकरण होण्यास मदतहोते. लोह असलेल्या उत्प्रेरकांचा सर्वांत जास्त वापर नायट्रोजन आणि हायड्रोजन यांपासून अमोनिया तयार करण्यासाठी होतो.

पहा : अणु व आणवीय संरचना मूलद्रव्ये विरल मृत्तिका.

घाटे, रा. वि.