एकलव्य : निषादराज हिरण्यधनू याचा पुत्र. हा द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकण्याकरिता गेला असता, द्रोणाचार्यांनी अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होऊ नये म्हणून, तो हीन जातीचा आहे असे निमित्त करून त्याला धनुर्विद्या देण्याचे नाकारले. त्याने श्रद्धेने मातीची द्रोणमूर्ती बनवून तिच्या ठिकाणी गुरूत्वभावना करून स्वतःच धनुर्विद्येचा अभ्यास केला. द्रोणाचार्य व त्यांचे शिष्य वनात मृगयेकरिता गेले असता, भुंकणार्‍या कुत्र्याच्या तोंडात सात बाण मारून एकलव्याने त्याचे तोंड बंद केले. अर्जुनाला त्याचा हेवा वाटला. अर्जुनाच्या विनंतीवरून द्रोणाचार्यानी एकलव्याजवळ उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितला, तो त्याने दिला. त्यामुळे धनुर्विद्येत त्याचे हस्तकौशल्य अर्जुनापेक्षा कमी पडले. हा भारतीय युध्दात कौरवांच्या बाजूने लढला.

केळकर, गोविंदशास्त्री