एकदांडी : (दगडी लॅ. ट्रॉयडॅक्स प्रोकंबेन्स कुल-कंपॉझिटी). ओसाड व बहुधा रुक्ष जागी आढळणारी एक तणासारखी, बहुवर्शायू (अनेक वर्षे जगणारी), अर्धवट जमिनीसरपट वाढणारी, सु. ३०–६० सेंमी. उंचीची व केसाळ अशी ही ⇨ ओषधी मूळची मध्य अमेरिकेतील तथापि श्रीलंकेत व भारतात (विशेषत: महाराष्ट्रात) तिचा प्रसार सर्वत्र आहे. पाने साधी, जाड, समोरासमोर, अंडाकृति-दीर्घवृत्ताकृती, टोकदार, दातेरी काठाची व प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त) असतात. लहान फुलोरे (स्तबक) एक एकटे असून लांब व बारीक दांड्यायर वर्षभर येतात. हिरवट छदांची दोन मंडले, त्यांमध्ये बाहेर पिवळी, जिव्हिकाकृती, स्त्रीलिंगी, किरण-पुष्पके व आत अनेक, लहान, द्विलिंगी, बिंब-रस कापणे, खरचटणे व जखमांवर लावल्यास चांगला उपयुक्त असतो
परांडेकर, शं. आ.