एकचक्रा : महाभारतकालीन उत्तर भारतातील प्राचीन नगर. चक्रनगर हे याचे आधुनिक नाव असून, उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात कांपिल्य गावापासून हे सु. १६० किमी. आग्‍नेयीस आहे. एकचक्र, हरिगृह व शंभुपुरी अशी याची नामांतरे आढळतात. महाभारतानुसार लाक्षागृहाच्या दहनप्रसंगानंतर पांडव एकचक्रा नगरीत येऊन राहिले, या गावाजवळ असलेल्या वेत्रकीय वनात भीमाने बकासुराचा वध केला.

जोशी, चंद्रहास