ऊरूमची : वायव्य चीनमधील शिंजिआंग (सिक्यांग) या स्वायत्त प्रांताची राजधानी. लोकसंख्या ५,००,००० (१९७० अंदाज). १९५४ पर्यंत शहराला डीहवा म्हणत; चिनी भाषेत याला वूलूमूची म्हणतात. रशियातून व भारतातून येणाऱ्या व्यापारी मार्गावरील हे पूर्वीपासूनचे महत्त्वाचे ठाणे आहे. लोखंड,गंधक, फॉस्फरस, कोळसा, तांबे इ. खनिजे ऊरुमचीच्या आसमंतात मिळतात याशिवाय ऊरुमचीजवळच कारामाई येथे तेलक्षेत्र मिळाले असल्याने ऊरुमचीला औद्योगिक महत्त्व आले. मध्य चीनमधील लानजो शहराशी ऊरुमची लोहमार्गाने जोडले आहे.

ओक, द. ह.