उत्तरप्राप्त : जे विधान सत्य आहे, की असत्य आहे हे केवळ निरीक्षणाच्या किंवा अनुभवाच्या आधारे ठरविता येते, अशा विधानाला ‘उत्तरप्राप्त’ विधान म्हणतात. उदा., ‘पृथ्वी गोल आहे’. उलट जे विधान सत्य आहे की नाही, हे ठरवायला अनुभवाचा आधार घ्यावा लागत नाही किंबहुना घेताही येत नाही, अशा विधानाला  ‘पूर्वप्राप्त’ विधान म्हणतात. उदा., गणितातील विधाने आपण निरीक्षणाच्या आधारे सत्य ठरवीत नाही ती आपण सिद्ध करतो. ⇨ पूर्वप्राप्त  विधानाचे ज्ञान आपल्याला कसे होते, हा ज्ञानमीमांसेतील एक कूटप्रश्न आहे. 

रेगे, मे. पु.