ऑग्बोमोशो: पश्चिम नायजेरियातील प्रमुख शहर. लोकसंख्या ३,८६,६५० (१९७१ अंदाज). हे ईबादानपासून ८८ किमी. व लागोसपासून २४६ किमी. ईशान्येस आहे. कापूस, शीनट, याम, कसावा, मका, बीन, ताडतेल, तंबाखू वगैरे मालाची ही बाजारपेठ असून येथे विणकाम, शीनट प्रक्रिया, कापड रंगविणे, लाकूडकाम इ. उद्योग आहेत. पारंपरिक ‘योरूबा’ वस्त्रे व रेशमी ‘सन्यन’ वस्त्रे ही येथील विणकामाची वैशिष्ट्ये होत. हे शिक्षणाचे केंद्र असून येथे कुष्ठरोगनिवारण केंद्र व अनाथ बालकाश्रम आहे.
शाह, र. रू.