ऑस्टरलिट्झची लढाई : चेकोस्लोव्हाकियातील बर्‌नॉ शहराच्या आग्नेयीस २४किमी. अंतरावरील ऑस्टरलिट्झ या लहानशा गावाच्या परिसरात ऑस्ट्रिया व रशिया यांची संयुक्त सेना आणि फ्रान्सच्या नेपोलियनचे सैन्य यांच्यामध्ये २ डिसेंबर १९०५ रोजी झालेली सुप्रसिद्ध लढाई. या लढाईत नेपोलियनने त्याच्या सैन्यापेक्षा प्रबळ व ताज्या दमाच्या ऑस्ट्रो-रशियन सैन्याचा पराभव केला. आपल्या आधिपत्याखालील प्रत्येक सैनिकाच्या गुणावगुणांचे अचूक व पूर्ण ज्ञान आणि त्याचा योग्य वेळी योग्य प्रकारे उपयोग करुन घेण्याचे नेपोलियनचे कौशल्य, याचे उदाहरण म्हणून या लढाईला युद्धशास्त्रीय दृष्ट्या महत्त्व आहे.

टिपणीस, य. रा.